Monday, March 22, 2010

आयपीएल, पुणे टीम आणि पुणेरी पाट्या ...

शेवटी येणार येणार म्हणता पुण्याची 'आय पी एल टीम' आली.
आता आम्ही वाट पहातो आहे ती टीमच्या नावाची आणि त्यातल्या खेळाडुंची.
ते येईल तेव्हा येईल पण एक (भविष्यातले) पुणेकर ह्या नात्याने आम्ही काही "पुणेरी पाट्या" लागोलाग तयार करुन ठेवत आहोत, पुढे त्याची अर्थातच गरज पडेल ह्याविषयी आमच्या मनात अजिबात संदेह नाही.

* ह्या पाट्या आहेत त्या 'मैदानावरच्या' .....
१. सामन्याची वेळ तुमच्या तिकिटावर छापलेली आहे, उगाच कधीही येऊन गर्दी करु नये.
२. सामन्याच्या वेळेच्या आधी ३० मिनिटे मैदानात प्रवेश दिला जाईल, तुम्ही गडबड केल्याने सामना लवकर सुरु होणार नाही.
३. खुर्चीचा वापर फक्त बसण्यासाठीच करावा ... एका खुर्चीवर एकच !
४. मैदानात पिण्यासाठी (साध्या) पाण्याची व्यवस्था केली आहे, थंड तसेच फिल्टर्ड पाणी आपण दिलेल्या तिकिटाच्या पैशात मिळणार नाही, उगाचच आयोजकांकडे हट्ट धरु नये.
५. मैदानावरचे कॅमेरे हे सामन्याच्या हालचाली टिपण्यासाठी आहेत, उगाच हिडीस चाळे करुन त्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करु नये.
६. आपण पुण्यासारख्या एका सुसंस्कृत शहरात एका सार्वजनिक ठिकाणी सामना पहात आहोत ह्याचे भान ठेऊन चियरलिडर्सना खाणाखुणा करु नये किंवा त्यांच्याकडे डोळे फाडुन बघुन लाज आणु नये. अश्लील चाळे कराल तर नुसतीच पोलीस कारवाई नाही तर धिंड काढण्यात येईल.
७. फुंके ( सिगारेट, बिड्या, चिलीम ), थुंके ( तंबाखु, गुटका, मावा, पान ) आणि शिंके ( तपकीर आणि स्वाईन फ्ल्युग्रस्त ) ह्यांना मैदानात मज्जाव.
८. मैदानात दारु विक्री केली जात नाही, मैदानात दारु पिऊ दिली जात नाही, मैदानात बाहेरुन दारु पिऊन आल्यास प्रवेश मिळणार नाही.
९. मैदानात विकत मिळणार्‍या खाद्यपदार्थांची आवरणे, पिशव्या तसेच पाणी किंवा शितपेयाच्या बाटल्या मैदानात फेकु नयेत, बाटलीवरुन खेळाडु घसरुन पडुन जखमी होऊ शकतो ह्याची किमान जाण ठेवावी.
१०. सामन्याच्या वेळी खेळाडुंना पाठिंबा देताना हळु आवाजात आरडाओरड करावी. हा क्रिकेटचा सामना आहे, तमाशाचा फड नव्हे !
११. अनोळखी वस्तुंना स्पर्श करु नये ... व्यक्तींसह !
१२. मैदानातील मोठ्ठे पंखे फक्त दुपारी आणि गर्दी असलेल्या ठिकाणीच लावण्यात येतील. पंख्याखाली बसण्यासाठी मोठ्ठ्या आवाजात भांडण करुन आयोजकांना त्रास देऊ नये.
१३. स्त्रियांचे स्वच्छतागॄह, खेळाडूंचे पॅव्हेलियन, चियरलिडर्स पोडियम, व्हीआयपी गॅलरी, पत्रकार कक्ष इत्यादी ठिकाणी उगाच जास्त घुटमळु नये.
14. सामन्यातील कसल्याही घटनेचा ( सामना हरणे, षटकार मारणे, धावबाद होणे, झेल टाकुन देणे वगैरे ) राग खुर्च्यांवर काढु नये.
15. सामना पहायला आलेल्या प्रेक्षकांचे खेडाळु, चियरलिडर्स, व्हीआयपी यांच्याबरोबर अथवा खेळपट्टी, पत्रकारकक्ष, समालोचन खोली, पॅव्हेलियन, व्हीआयपे बॉक्स इथे 'फोटु काढुन मिळणार नाहीत' किंवा त्याला परवानगी दिली जाणार नाही.
16. सामन्याच्या वेळेदरम्यान तुटलेल्या चपला, कापलेले खिसे, मोडलेला चष्मा, हरवलेली पर्स, गायब झालेला मोबाईल ह्यांची जबाबदारी आयोजकांकडे राहणार नाही. समोरच पोलीस स्टेशन आहे, तिकडे जाऊन तक्रार करावी.
17. हे पुणं आहे, शिमला नव्हे, उन्हाळ्यात गरम होणारच, पण म्हणुन मैदानात सामना पहायला शर्ट काढुन बसु नव्हे. अशा निर्लज्ज प्रेक्षकांना बाहेर काढले जाईल.
18. पाऊस पडल्यास पैसे परत मिळणार नाहीत, कॄपया हवामानखात्याशी सल्लामसलत करुन मगच तिकिट काढावे.
19. परदेशी खेळाडुंच्या अंगचटीला जाऊ नये तसेच त्यांना स्थानिक भाषेत गलिच्छ आणि अश्लील शिव्या देऊन वेडावुन दाखवु नयेत. ते आपले अतिथी आहेत, आपण घरात पाहुण्यांशी असे वागतो का ?
20. राजकीय नेते, सरकारी अधिकारी, स्थानिक दादा ह्यांचा वशिला लाऊन फुकट पास मागु नये. परवडत नसल्यास झाडावर चढुन सामना पहावा.
21. वरील सुचना ह्या चेष्टेचा विषय नव्हे ह्याची नोंद घ्यावी, ह्याची चेष्टा करणार्‍या प्रेक्षकांना संपुर्ण सामना संपोस्तोवर अंधार्‍या खोलीत बळजबरीने बसवुन ठेवले जाईल.

*** ह्या पाट्या आहेत त्या ' आयपीएल-पुणे संघाच्या कार्यालयातल्या" ....
१. फक्त दिवसाचे सामने खेळले जातील, त्यातही दुपारी १-३ असा विश्रांतीचा वेळ राखुन ठेवावा लागेल.
२. रात्रीच्या सामन्याचा चार्ज वेगळा पडेल, कुठल्याही परिस्थीत रात्री ८ वाजता सामना संपवण्याची जबाबदारी आयोजकांची राहिल, सवड मिळाल्यास उरलेला सामना दुसर्‍या दिवशी खेळता येईल.
३. सोमवारी सुट्टी घेतली जाईल.
4. सर्व लोकांना जाहीर निवेदन देण्यात येते की "आयपीएल-पुणे संघ ( पुण्याचा अभिमान, महाराष्ट्राची शान ) " ही आमचा पुर्णपणे स्वतंत्र संघ असुन "मुंबई इंडियन्स, महाराष्ट्र" ह्या संघाशी आमचा कसलाही संबंध नाही. त्या संघाशी केलेल्या व्यवहाराची जबाबदारी केवळ तो मराठी आहे ह्या कारणाने घेतली जाणार नाही. तसेच त्या संघाच्याविषयी आमच्याकडे कसलीच चौकशी करु नये.
5. हा क्रिकेटचा संघ आहे. उगाच गाण्याच्या स्पर्धा, नाचकामाचे कार्यक्रम, पाणपोईचे उद्घाटन, नव्या दुकानाची चित्रफीत कापणे ह्या आणि अशाच इतर कामांसाठी खेळाडुंची चौकशी अथवा मागणी करु नये.
6. क्रिकेट हा एक खेळ आहे ह्याचे भान ठेवावे, आम्ही मॅचफिक्सींग करत नसल्याने जिंकण्याची कसलीच गॅरेंटी देता येणार नाही.
7. देणग्या मागणारे, गौरवनिधी सामने आयोजीत करणारे, सर्व्हे करणारे, फुकटात जाहीरातीसाठी कार्यक्रमाला हजरी लावण्याची विनंती करण्याची शिष्ठमंडळे आदी तत्सम व्यक्ती किंवा संस्था ह्यांना सक्त प्रवेश बंदी आहे, ह्यात कोणत्याही कारणास्तव बदल होणार नाही.
8. आमचे प्रतिस्पर्धी संघ कमी किमतीत खेळत असल्याच्या बढाया आमच्यासमोर मानु नये. आमचे इथे क्वालिटीला प्राधान्य असल्याने कमी किमतीत सामना खेळवण्याचा विचार केला जाणार नाही.
9. आपण आमच्या खेळाबद्दल समाधानी असाल तर इतरांना सांगा, नसताल तर योग्य आणि सभ्य शब्दात आम्हाला सांगा, योग्य दखल घेतली जाईल.
10. आमचेकडे शाळकरी संघांना ट्रेनिंग दिले जात नाही
11. आमच्याशी ठरलेल्या करारानुसार सामना झाल्यावर आमच्याकडुन सदिच्छा म्हणुन खेळाडुंचे टी-शर्ट्स, ट्रॅक सुट्स, टोप्या, बॅटी, चेंडु अथवा तत्सम कुठलेही किमती सामान भेट मिळणार नाही. उगाच हावरटपणा करु नये.

ता.क.: बाकी सुचतील तशा नंतर अ‍ॅड करुच ...
तुर्तास एवढेच.

प्रेरणा : काही फॉर्वर्डेड मेल्स आणि पुणेरीपाटी.कॉम

55 comments:

Yogesh said...

मस्त....जबर्‍या झाली आहे पोस्ट!!!

Ajit Ghodke said...

छान लिहिले आहेस रे .. एकदम पुणेरी!!

FrostBite said...

Ati uttam!

Unknown said...

Sahi Donrao
tumhala bangalorat rahun masta suchate buwa

amrutlagoo said...

Sundar!! Aparatim

Anonymous said...

हरी,
मला कालपासून तिनदा हे मेलने आले.. आणि वाचताक्षणीच वाटले के हे छोटा डॉन सोडून कुणी लिहू नाही शकणार.. आज तुझा ब्लॉग चेक केला !!!
बघ बाबा, लोक तुझ्या नावाशिवाय ही मेल दणकून फॉरवर्ड करत आहेत.

छोटा डॉन said...

@ विक्रांत :
हा हा हा, अरे मीच हसतो आहे कालपासुन नुसता. आर्टिकल टाकुन ३० तास व्हायच्या आत ते मलाच २ वेळा फॉर्वडेड मेलमधुन आले, जस्सेच्या तसे पण अर्थात माझे किंवा माझय ब्लॉगवरचे नाव वगळुन.
कमीत कमी ५-६ ब्लॉग्सवर आणि अशाच २-३ साईटवर पण हे पोहचले ... माझे नाव वगळुन.

असो, आजचा फॉर्वर्डेड मेल काऊंट आहे "७".
मी त्यातल्या एकाला विचारले "काय भौ, कुणी लिहले आहे एवढे बेक्कार ? " तर त्याचा रिप्लाय पहा " आपल्याला काय करायचे भेंडी, आपन नुसते फॉर्वर्ड करायचे, काय ? ".
मी फक्त "सहमत आहे" म्हणुन रिकामा झाला ...

जाऊ दे, प्रतिक्रिया आणि माहितीसाठी आभार ...

अवांतर : ह्या किश्श्यावर मी "छोटा डॉनच्या ब्लॉगवरच्या पाट्या ..." हा नवा लेख टाकायच्य विचारात आहे सगळ्या उचल्यांची खेचणारा ! ;)

@ अजित, अम्रुत, अमितदादा, मनमौजी आणि फ्रोस्टबाईट : प्रतिक्रियेसाठी आभार ...

Milind Gadre said...

खूप कल्पक लेख!
'आपण आमच्या खेळाबद्दल समाधानी ' : इथे "असाल" हवे ..

Milind Gadre said...

खूप कल्पक लेख!
'आपण आमच्या खेळाबद्दल समाधानी असताल : इथे "असाल" हवे ..

ओहित म्हणे said...

हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा !!!!!

लयी भारी!!

हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा

Anonymous said...

HAHAHAHAHAHA.....Baryach diwsat punyavishayi evdhe nemke ani achuk shabdat tipan vachle nachte...
Apla,
Ek Punekar (Tohi Pethetla..)

छोटा डॉन said...

धन्यवाद मिलिंद,
योग्य ते बदल केले आहेत, माला वास्तविक पाहता "असाल" हेच लिहायचे होते पण ते लिहताना "असताल" असे झाले. ;)

अनामिक आणि sangram : धन्यवाद मित्रांनो !

Anonymous said...

ह्म्म.."छोटा डॉनच्या ब्लॉगवरच्या पाट्या ..." येवू द्यात लवकर.. ही उचलेगिरी आणि चोर्‍या हा एक खुप मोठा शाप आहे यार ब्लॉगिंगला.. माझ्या ब्लॉगवरची विडंबने लोकांनी अशीच नाव वगैरेचा उल्लेख न करता कैक ठिकाणी फॉरवर्ड केली होती.
फार वाईट वाटते मग !!

esudip said...

तुझ्या विनोदबुद्धीला सलाम...........हे माझेही बोल आहे आणि सकाळ पेपरवाल्यांचे सुद्धा.....मी माझ्या ब्लोगवर सुद्धा ही पोस्त टाकली आहे पण तेव्हा मला वाटले कि हा एक मेल आहे........पण असो त्याने सर्वांचे मनोरंजन होत आहे....धन्यवाद आणि आपणाकडून अजून अश्याच मनोरंजक गोष्टी मिळाव्यात ही अपेक्षा.

सकाळ ची लिंक http://72.78.249.126/esakal/20100325/5527044589325227788.htm

(ता.क. मी आपला ब्लोग फॉलो करीत असून नवीन लिखाणांची वात पाहत आहे )

Unknown said...

sahi na bhau...

ek number...

Anonymous said...

हाय छोटा डॉन हरि

या पुणेरी आयपीएल पाट्यांचे जनक आपण आहात तर... काही नाही... छान लिहिलंय...

लिहित चला

आम्ही स्टार माझा या न्यूज चॅनेलवर या पाट्यांची एक बातमीही करतोय. सध्या ऑनएअर आहे... starmajha.com वरही व्हिडिओ क्लिप मिळेल.

तुमचं नाव गाव कळालं तर क्रेडिट द्यायला आम्हाला काही त्रास नाही

छोटा डॉन said...

श्री. अनामिक ,

स्टार-माझावर क्लिपिंगचे प्लान्स वाचुन आनंद झाला.
माझा संपर्क, पत्ता, नाव वगैरे ऑलरेडी 'स्टार-माझा' कडे आहे, श्री. प्रसन्न जोशी आणि अश्विन ह्यांना त्यची कल्पना आहे.
खुद्द मी जानेवारीमध्ये स्टार-माझा स्टुडियोत येऊन गेलो होतो एका शुटसाठी ( ब्लॉग-माझा एपिसोडच्या निमित्ताने ).

असो.
ह्या इथे असे ओपन फोरमवर मला माझे डिटेल्स देणे योग्य वाटत नाही, 'छोटा डॉन' ह्या ब्लॉगकर्त्यांचा मेल-आयडी ऑलरेडी स्टारमाझाकडे आहे, त्यावरुन संपर्क करु शकतो.
एक 'संपर्क ई-मेल आयडी' दिलात तर मी त्यावर डिटेल्स पाठवु शकेन.

कळावे.
धन्यवाद !

- छोटा डॉन

Samrat Phadnis said...

नमस्कार,
ई सकाळमधल्या तुमच्या लेखनावर तुम्ही दिलेली प्रतिक्रिया वाचली.
बोलू शकाल का तुम्ही माझ्याशी?...
- सम्राट फडणीस, 9922419135.

Sanhita / Aditi said...

सकाळला पाठवलेली प्रतिक्रिया:

हा लेख असाच्या असा, आमचे मित्र श्री. छोटा डॉन यांनीच लिहीलेला आहे. लेखाच्या वर लाल अक्षरात 'अनामिक लेखकाला' श्रेय देऊन खाली छोटा डॉन यांच्या ब्लॉगची लिंक का? लेखकाला लेखनाचं श्रेय अव्हेरण्याचा प्रकार सकाळकडून अपेक्षित नव्हता.

डॉन्या, लेख पुन्हा एकदा वाचला आणि पुन्हा एकदा पोटभर हसले.

Soni said...

donrao lay bhaari..
aamhipan sadhya bangalorich aahot... aaplyashi sampark karnyasathi aapla mailid milek ka?

Anonymous said...

तू आहेस खरा पुणेकर ! फारच मस्त ...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे said...

हहपुवा झाली. लै भारी....!!!

Deepak Iyer said...

Hi,
Are you the original author of this list ?
Please let me know how many of these you have created. I got these via en a-mail forward, and since I wanted to share it with everyone, I posted this at my blog, with an attempt at English translation here : http://iyerdeepak.wordpress.com/2010/03/23/ipl-pune-team-rules/

If you are in fact the one who came up with the list :
1. Please let me know if I have the permission to use the list. It wouldn't be an exact copy, since I am trying to add some value to it, to share it with everyone.
2. Please let me know whom I should credit the list to (your name or just this blog).

Thanks,
Deepak

Unknown said...

Donya, I didn't know you are so famous!
I am following your blog from start you are really awesome man!

छोटा डॉन said...

@ Deepak Iyer :

Hi,
I am the ONLY original author of this post. I have created this article on 22nd March Night.
There no other person / group / website is involved in the craetion of this article.

This article was first FIRST published on net on 22/03/2010 at 9.30 PM. After some 30 mins I only posted this article at http://www.yuvaadda.com/mimarathi/node/949

Other than this I have NOT PASTED the copy of this article on any forum / media.

he link what u have given was posted on next day with english translation, but credit of ORIGINAL MARATHI creation goes only to me as per my knowledge.

The point to be noted is that after publishing article on my own blog it got circulated via CHAIN MAILS like anything. U will be surprised to listen that on 23rd march I got 2 FORWARDED MAILS of same article but offcourse without my name.
So I think the sourse of post on the link u have pasted could be such CHAIN MAIL.

I think i am sufficient clear, right ?

Credits & Uses at other places :
As it is already circulated by CHAIN MAILS so in that case i don;t have any objection to use this lists for ur use. U can assume my permission.
But my sincere expectations is that u r supposed to mention name of original author i.e. me & my BLOG.
Otherwise no objection.
Go ahead ...

Thanks ...

- Chhota Don

Sushant Danekar said...

ADDED YOUR OWNERSHIP THERE :)
lets shake the HAND :)
Good Luck

Sushant
I am now your follower your doing good work man

अनामिक said...

मी खालची प्रतिक्रिया ई-सकाळवर दिली, पण सकाळवाल्यांनी प्रतिक्रियेला कात्री लावली.

"हा लेख 'छोटा डॉन' या ब्लॉगरनेच सर्वप्रथम लिहिला असताना लाल भडक अक्षरात 'अनामिक लेखक' लिहिने म्हणजे मुळ लेखकाचा अपमान करणे होते. 'सकाळ'ला हा लेख प्रकाशित करण्यापुर्वी छोटा डॉनची परवानगी तर सोडाच, पण खर्‍या-खोट्याची शहानिशाही करता येऊ नये याची खंत वाटते".

-अनामिक

Nile said...

साक्षात टीव्हीवर (या ना त्या कारणाने) सतत झळकणार्‍या (आमच्या) डानराव चेल्सी लंडनवालेंची बातमी पेप्रात, तेही सकाळ सारख्या रद्दड, छापुन आली त्यात नवीन ते काय?

जिथे सगळे पेपर वगैरे संपतात तिथे आमचे डानराव (आणि त्यांचे प्रतिसाद) सुरु होतात.

अवांतरः डान्याचे अभिनंदन

Aditya said...

Brilliant! I'm sharing this!

esudip said...

धन्यवाद छोटा डॉन......मी माझ्या ब्लोगवरील पोस्टमध्ये आपले नाव टाकले आहे.....झालेल्या त्रासाबद्दल क्षमस्व !!!

http://esudip.blogspot.com/2010/03/blog-post_24.html

विक्रम एक शांत वादळ said...

लयच भारी
बोले तो एकदम पुणेरी :)

shruti khadkikar said...

Post are excellent..but a kind request to change the theme for the blog...it will be more readable then....thanks

Anonymous said...

I received one of the 'chain' mails. Thought it was funny and forwarded it to my friends who, I thought, would laugh and enjoy the same. I did not know the source myself and naturally could not communicate the same to others.
I think you should be content with the fact that people like my found it amusing, wished to share the joy with others, and forgive the chain mailers!

www.thanthanpal.blofspot.com said...

या पुणेरीपानातून जरा बाहेर पडा. जग बदलले आहे . जगाबरोबर राहायचे तर मराठी भाषा तांत्रिक, वैद्यानिक आधुनिक भाषेने नवीन शब्द निर्माण करून मराठीचा विकास करा.

विशाल कुलकर्णी said...

डानराव, लै भारी ! लै हासलु प्गा आज ! झ्याक वाटलं वाचुन..

विशाल

thewhiz01 said...

cool post

Chetan Somwanshi said...

छोटा डॉन....मी पण काही पाट्या तयार केल्या आहेत त्या पण टाका ..तुमची इच्छा असेल तर... यापैकी दोन मी "ई सकाळ" वर पण पोस्ट केल्या आहेत

"आम्ही फक्त क्रिकेट च्या सामन्यांची तिकिटे विकतो ..इतर तिकिटांची विचारपूस आमच्या जवळ करू नये ...हि पाटी वाचून देखील विचारपूस करावयाची असल्यास, तशी इच्छा झाल्यास अपमान सहन करण्याची मानसिक तयारी व दंड सहन करण्याची शारीरिक तयारी ठेवावी..नंतर कोणत्याही प्रकारची तक्रार ऐकून घेतली जाणार नाही .!!! "

चेतन सोमवंशी

Swapnil Kolhe said...

mastach lihil aahes re
apratim . .

Anonymous said...

Hawa zali aahe..jaude nako... chuck norris.. mahiti aaselach ...

baki majet... ;)

-tinku

Vivek said...

ही आणखी एक कॉपी.

http://gauravsv.blogspot.com/2010/03/blog-post_27.html

तिथं मूळ पोस्टची लिंक कॉमेंटवर टाकलीय.

Unknown said...

Thanks for informing

removed it at once!!!!

अनामिका!! said...

डॉनराव!
नेहमीप्रमाणे जबरा लेखन....तुमच्या विनोदबुद्धिला सलाम.....चार दिवस आंतरजालावरुन रजा घेतली होती त्याचाच परिणाम आज आपले ताजे लेखनच वाचायला मिळाले याचा आनंद जास्त आहे.......
"हसुन हसुन मुरकुंडी वळणे" म्हणजे काय ते आज पुणेरी पाट्या वाचुन व्यक्तिशः अनुभवले...
अनामिका

Anonymous said...

mast re

Unknown said...

Mi shabdat aabhar manu shaknar naahi...Pan its is something..that is extremely nice.... :) ...Thanks for all your efforts to keep others Laugh ;)

ऋयाम said...

lol lol lol

JAbaryach lihile ahes Donz :)

ShubhechChaa!!
ajun lihit raha asech !

Runa said...

Thanks for a great laugh.

Pune and Punekars for ever !

aruna said...

hello
loved your punches. pakke puneri!

Anonymous said...

Lai bhari....!!!!

Pav Kilo Khari...!!!!

Sanjay Jadhav said...

विनोदबुद्धीला सलाम. Mala pan he forward mail madhe ale hote, nantar kalale chhota donche ahe!! मी माझ्या ब्लोगवर सुद्धा ही पोस्त टाकली आहे.पण असो त्याने सर्वांचे मनोरंजन होत आहे....धन्यवाद आणि आपणाकडून अजून अश्याच मनोरंजक गोष्टी मिळाव्यात ही अपेक्षा.

shruti khadkikar said...

thanks for accepting my suggestion and changing the theme..now its quite readable..

Unknown said...

आमच्या खास कोल्हापुरी भाषेत बोलायचे झाल्यास 'छोटा डॉन'चा "नाद खुळा" ~~~ एकदम झकास !! आज सकाळीच रंकाळा तलावावर मित्रासमवेत पोहताना तुमच्या ग्रेट कल्पनाशाक्तिबाबत दिलखुलास बोललो व त्यांना जाम खुश करून टाकले. आमच्याकडून तुम्हास खास "पांढ-या रश्श्याची मेजवानी. IPL पुणे सुरु होण्याअगोदर !! ये वादा रहा !!

Anonymous said...

SIMPLY HILARIOUS ...LOLL

Chate nashik Celibrating decade of success said...

very good artical

ajay from nashik

Anonymous said...
This comment has been removed by the author.
Anonymous said...

Hi,
We have shortlisted this article for Netbhet eMagazine Nov 2010. We seek your permission for incorporating this article in magazine.
Please provide your full name and email id.
Please write to salil@netbhet.com or call Salil Chaudhary - 09819128167 for more information.

Regards,
Sonali Thorat
www.netbhet.com