Thursday, November 27, 2008

शहिदों की चिताओं पर ...


शहीदों की चिताओं पर लगेंगे हर बरस मेले,
वतन पर मरने वालों का यहीं बाकि निशां होगा"

आज ही पोस्ट लिहीत असताना अजुन "भय इथले संपत नाही" अशीच अवस्था आहे, तिकडे आपले बहादुर जवान व सर्वसामान्य जनता अजुनही ह्या अमानुष, भयंकर, राक्षसी अशा लादलेल्या परकीय दहशतवादाशी प्राणपणाने लढते आहे. च्यायला २४ तास उलटुन गेले तरी अजुन कोणीही अजुन पुर्णपणे "दहशतवाद संपवला" ह्याची हमी द्यायला तयार नाही, हा हल्ला आहे की युद्ध ?

होय, हे एक प्रकारचे "अघोषीत युद्धच" आहे भारताच्या अंतर्गत सुरक्षेवर एक ठळठळीतपणे जाणवणारे प्रश्नचिन्ह उभे करणारे. २४ तासांपेक्षासुद्धा जास्त लढा द्यायला ह्यांचाकडे एवढा मोठ्ठा शत्रसंभार आला कुठुन ह्याची मुळापासुन चौकशी व्हायला हवी. काल ऐकले होते की हे हरामी आपल्याबरोबर "सॅकमध्ये शस्त्रे" बरोबर घेऊन आले होते. कसं शक्य आहे ?

सॅकमध्ये मावतील एवढी शस्त्रे घेऊन जर कोणी अख्खी मुंबई, पोलीस यंत्रणा, सेना व खास अशा परिस्थीतीत लढण्याचे प्रशिक्षण दिलेले " नॅशनल सिक्युरीटी गार्ड्स" ह्यांना २४ तासापेक्षा जास्त वेठीस धरु शकतो हे मला तर अशक्य वाटते, ह्यामागे फ़ार मोठ्ठे षडयंत्र असण्याचा आम्हाला संशय आहे.

असो. सेना व जवान आपले काम चोख करत आहेत, सध्या त्यांना पाठिंबा व धीर देणे महत्वाचे, बाकीचा तपास व चौकशी नंतर होऊ शकते ( पण झाली पाहीजे हे नक्की ).सध्या त्याम्चे मनोधर्य विचलीत होईल असे कोणतेही पाऊल आपण उचणार नाही ह्याची दक्षता घ्यायला हवी ....

आत्तापर्यंत १०० हुन अधिक निरापराध सर्वसामान्य नागरीक व ११ पोलीस अधिकारी ह्या हल्ल्यात मरण पावले आहेत, नव्हे "शहिद" झाले आहेत. त्यांच्या बलिदानाची आम्हाला नेहमीच आठवण राहिल, त्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही अशी अपेक्षा बाळगुयात ....
शहिदों तुम्हे लाख सलाम ...
आता जबाबदारी सर्वांचीच वाढली आहे, सर्वांनी ही गोष्ट आता सिरीअसली घ्यायलाच हवी, सध्या सवंग आणि बेजबाबदार मिडीयाने तर जरुर ...
जाता जाता लतादिदींच्या एका अजरामर गाण्यातला एक तुकडा,
"ऐ मेरे वतन के लोगों ज़रा आँख में भर लो पानी,
जो शहीद हुए हैं उनकी ज़रा याद करो कुरबानी"
शिवाय आत्ता आठवलं म्हणुन एक व्हिडिओ सुद्धा, बरेच काही घेण्यासारखे आहे यातुन, पहा ..

बाकी आमच्या हातात लेख लिहणे आणि श्रद्धांजल्या वाहणे ह्याशिवाय अजुन काही तरी काय ?

असो, वेळ येईल एखाद्या दिवशी नक्की ...

ता.क. : हा "लेख" इथे संपला नाही, आज फ़क्त जास्त लिहणे उचीत नाही म्हणुन इति लेखनसीमा. बाकी वाचलेल्या आणि पाहिलेल्या घटनांवर सविस्तर (माझे ) विश्लेषण येत्या काही दिवसात जरुर लिहीन ...

Monday, October 20, 2008

दै. सामना चे आभार ...

ह्या महिन्यात म्हणजे उदाहरणार्थ ९ ऑक्टोंबरला शिवतिर्थावर शिवसेनेचा अतिभव्य व भुतो न भविष्यती असा दसरा सोहळा झाला ...
त्या सोहळ्याचा आनम्द आम्ही इथे जर्मनीत बसुन "स्टार माझा" ह्या वाहिनीवर उदाहरणार्थ इंटरनेटवर ऑनलाईन टेलीकास्ट पाहुन घेतला व तो पाहुन आम्ही धन्य झालो.
मग त्याच भारलेल्या अवस्थेत व तीरमिरीत आम्ही एक "लेख - एक भारुन टाकणारा अनुभव .... शिवसेनेचा दसरा सोहळा !" खरडुन टाकला व तो "मिसळपाव.कॉम" ह्या आम्च्या जीव की प्राण साईटवर ( व तसेच ह्या ब्लॉगवर ) टाकला, त्यावर भरपुर चर्चाही घडली.

असो। तर ह्यात दै. सामनाचा काय संबंध ?

तर दै। सामना ने ह्या लेखाची व त्यावरील चर्चेची दखल घेऊन आमच्या लेखात आम्ही व्यक्त केलेल्या भावना आहे तश्या त्यांच्या उदाहरणार्थ " १४ ऑक्टोंबरच्या अंकात" प्रसिद्ध केल्या.आम्हाला फार बरे वाटले.

आमचे बाळासाहेबांवर फार प्रेम आहे, हा लेख म्हणजे त्यांना आमची दसर्‍याची भेट म्हणुन फुल ना फुलाची पाकळी होती।सामनाने त्याची दखल घेऊन आमचाही सन्मान केला म्हणुन दै. सामनाचेही आभार !!!

हा मुळ लेख आपल्याला "इथे" पहायला मिळेल ...
दै। सामनाने त्याची घेतलेली "दखल" इथे पाहता येईल ...
मिसळपाव.कॉम वर घडलेली चर्चा व प्रतिक्रीया इथे पाहता येतील ...

धन्यवाद वाचकहो आणि दै. सामना !!!!
तसेच आम्हाला ही संधी उपलब्ध करुन देणार्‍या "स्टार माझा " वाहिनीचेही आभार !!!

Friday, October 10, 2008

एक भारुन टाकणारा अनुभव .... शिवसेनेचा दसरा सोहळा !


दिवस : रामाच्या रुपाने विश्वातल्या चांगल्या शक्तींनी रावणाच्या रुपातल्या वाईट, अमंगल शक्तींवर विजय मिळवुन आपल्या विजयी सेनेसह भारत भुमध्ये प्रवेश केला तो ... विजयादशमीचा ...
स्थळ : आर्यांचा देश .... जर्मनी !
अजुन विस्तारात सांगायचे म्हटले तर माझ्या आस्थापनाचे कार्यालय ...
वेळ : दुपारी १ वाजल्यानंतर संध्याकाळी ६ पर्यंत ....

आज सकाळपासुनच खुप उत्साहात आहे, आजचा दिवस दसर्‍याचा, सण हा "आनंदाचा, मांगल्याचा, आप्तजनांना शुभेच्छा व आपट्याची पानेरुपी सोने" देण्याचा। अतिशय उत्साहात सर्वांना शुभेच्छा देऊन झाल्या व रुटीन कामाला सुरवात झाली. हे सर्व करत असताना आठवण मात्र घरातल्या धामधुमीची, उत्साहाची व खास मराठमोळ्या डौलात साजर्‍या होणार्‍या दसर्‍याचीच होती।

आज दसरा म्हणजे विजयादशमी, अरे हा तर महत्वाचा दिवस, महाराष्ट्राच्या सन्मानाच्या शिरपेचात मोत्याचा तुरा व महाराष्ट्राच्या समाजकारणातील व राजकारणातील अजुन एक महत्वाची घटना दरवर्षी ह्याच मुहुर्ताला घडते ना? मग आज काही हालचाल आहे का नाही ? तसाच आहे का आजपण सळसळता उत्साह, डौल, सारंजाम व मराठी अभिमानाची शान ? चला, जरा पेपर चाळुयात, पाहु या काही आलयं का त्यात ? का गेल्या काही वर्षांसारखी कुठली तरी नैसर्गीक अथवा मानवी आपत्ती येऊन ही परंपरा खंडीत तर झाली नाही ?

हुश्श ! होणार आहे ह्या वर्षी, पुर्वीपेक्षा मोठ्ठ्या प्रमाणात, जरा जास्तच उत्साहात, डौलात व मुर्तीमंत मराठी टेचात हा सोहळा होणार आहे ...

पेपरात तर भरभरुन येत नाही, आपण कसे वाचले नाही ?

जाऊ दे, आता कुठे पहायला मिळते का ते पाहु , दाखवतील ना कुठेतरी ह्या प्रचंड आंतरजाल विश्वात ...कित्येक प्रसंग आपण लाईव्ह पाहिले आहे, हा जर पहायला मिळाला तर "आजी सोनीयाचा दिन असे अमॄताचा क्षण " हे अनुभवायला मिळेल ...

चायला, २ वाजले की म्हणाजे भारतात चक्क संध्याकाळचे ५,३० !!! छे, सोहळा सुरु झाला असेल, कुठे पहायला मिळेल ? जीवाची नुसती तगमग होत आहे, माहिती नसले तर ठीक होते आता संयम राखणे कठीण आहे।कुठुन तरी लिंक मिळवायला हवीच त्या टेलीकास्टची ....

च्यायला ह्या भैय्या चॅनेल्सचे काहीतरी वेगळेच चालले आहे, सारखी त्या मनमोहन आणि सोनीयाच्या दिल्लीच्या प्रगतीमैदानातल्या "रामलीलेचे क्षणचित्रे" अथवा अन्य काही फुटकळ। च्यायला अजुन एक पोरगं खड्ड्यात पडलं का? झालं आता हे लोक हीच बातमी दाखवणार, मरु दे तिच्यायला, दुसरीकडे पाहु ...

हुश्श्श !!! हुर्रे ....सापडली ,स्टार माझा लिंक मिळाली, ह्यावर आहे लाईव्ह टेलीकास्ट ...
शेवटी स्टार माझा त्याच्या किर्तीला जागला म्हणायचा ....

आयचा घो, साक्षात तोच सोहळा सुरु आहे, आता मरु दे काम , हेच पहात रहावे ....

"एकच दिवस, एकच मैदान, एकच वक्ता, गेले ४३
वर्षेशिवसेनेचा दसरा मेळावा, स्थळ : शिवाजी पार्क ;मुंबई, वक्ता : बाळासाहेब ठाकरे "

अर्रे बापरे, काय गर्दी जमली आहे, किती लोक आले आहेत साहेबांना ऐकायला व त्यांचे विचार ऐकायला, च्यायला कसली ही प्रेरणा व केवढे हे प्रेम ...गर्दीवर नजर ठरत नाही, अक्षरशः लाखांच्या संख्येने लोक येतात भौ , जबरदस्त ...अख्खे मैदान भगव्या रंगात न्हाऊन निघाले आहे, अवघा हिंदुत्वाचा जागर म्हणता येईल ....


काय पाहतो आहे मी, साक्षात "उद्धव ठाकरे" अक्षरशः प्रचंड जनसमुदायाला संबोधीत करत आहेत, थोडा लेटाच झाला साईट उघडायला, आधी कोण कोण बोलले, काय काय बोलले, कुणाला फाडले, काही कळायला मार्ग नाही, असो हे पहात रहावे ....
व्वा, भारी बोलत आहे की उद्धव, ह्याला लोक " संयमी व्यक्ती" म्हणुन बदनाम का करतात ? शोभतो खरा हा "सिंहाचा छावा" , चढ बाप्पु, जबरदस्त ...फारच वाईट मारतो आहे सगळ्यांची, सगळ्या मुद्द्यांचा परामर्ष घेत आहे. वा काय बोलतो आहे "मुंबई आमच्या बापाचीच, मुंबईत येऊन मुंबई कुणाची असे विचारण्याची हिंमत कशी होते कुणाची ?". जबरदस्त, भारी ठोकला, असेच बोलायला पाहिजे, माजलेत हे उपरे. त्याचावर होणार्‍या कमजोरपणाच्या टीकेबद्दल काय बोलतो हा ? दिले ह्याने उत्तर, म्हणे " हिंदुहॄदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे ह्यांनी मांजराची पिल्ले नव्हे वाघाचे बछडे जन्माला घातले आहेत. शिवसेनाप्रमुखांची काळजी घेण्यास आम्ही समर्थ आहोत, इतर कुणी काळजी करु नये "ये हुई ना बात, जबरदस्त उत्तर दिले. ह्या लोकांच्या भुमीका व त्यामगेचे राजकीय डावपेच गेले चुलीत, दमदार बोलतो आहे नक्की, बाकीच्याशी आपल्याला काय देणेघेणे ?

अरे सगळे हाच बोलतो आहे, "साहेब" येणार आहेत की नाही ? कुठे तशी घोषणाही होताना दिसत नाही ? नक्की काय होणार ?


बेश्ट, उद्धवने भाषण आवरते घेतले व " शिवसेनाप्रमुखांचे शिवतिर्थावर आगमन" ही घोषणा झाली ...
हुर्रे, साहेब आले। लोकांना आशांना त्यांनी ठेच पोहचु दिली नाही ....कुठे आहेत साहेब ? कुठे आहेत ? आता कसे दिसतात ? वय खुप वाढले आहे ? नुसतेच येणार की भाषण पण करणार ?

आले ... आले रे ... साहेब आले रे !!!
"साहेबांना" लिफ्टमधुन स्टेजवर आणण्यात येत आहे, अरेरे बघता बघता वार्धक्याने ह्या सिंहालासुद्धा सोडले नाही। चेहर्‍यावर वय स्पष्ट दिसत आहे ...अनेक संकटे स्वतःच्या निधड्या छातीवर झेलणारे बाळासाहेब आज शिवसैनिकांच्या आधारने पाऊले टाकत आहेत ...आले, स्टेजवर आले ते, आल्याआल्या " मॉंसाहेब, प्रबोधनकार व बिंदुमाधव" च्या प्रतिमांना हार घातला। चांगले आहे, आपल्याला साथ देणार्‍यांचे विस्मरण कधीही न होऊ देणे हे कधीही स्तुतीपरच ...शेवटी समोर आले ते, स्टेजच्या मध्यभागी आले, खरच थकले आहेत आता, त्यांना आधार देऊन खुर्चीवर बसवले व भोवती कोंडाळे आहे ....

सर्व जमाव शांत !!! एकदम चिडीचुप शांतता ...

बाळासाहेब स्वतःच्या ताकतीवर उठले, बाकीच्यांना बाजुला सारुन समोर जमलेल्या विशाल, अगणित जनसमुदायाला नमस्कार केला व खास त्यांच्या स्टाईलीत अभिवादन केले ....




आयला, अंगावर काटा आला हे पाहुन, शेर जरी म्हातारा झाला तरी अजुन आपली चाल नाही विसरला, अजुन तोच कणखरपणा ....

जिओ बाळासाहेब, जिओ ....
जनसमुदायला काय करावे कळेना, प्रचंड जयघोष सुरु " बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद , शिवसेना झिंदाबाद " !!!
उद्धव, मनोहर जोशी आणि इतर गलबलुन गेलेले दिसत आहेत। खुप सोसले साहेबांनी व अजुनही हिंमत नाही हरलेत ...

त्यांना खुर्चीवर बसवुन त्यांच्यापुढे माईक ठेवण्यात आला, साहेबांनी सुरवात केली ....
" इथे जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो .... "

जिंकले !!!! अगदी शब्दश : जिंकले .....
पुढचे सांगण्यात अर्थ नाही, माझी शब्दसंपदा दुबळी पडत चालली आहे, फक्त डोळेभरुन पाहुन घेतले आणि धन्य झालो ....
तसेही सगळे सविस्तर पेपरमध्ये आलेच आहे ...
मला मात्र दसर्‍याची उत्तम भेट मिळाली .... धन्य झालो !!!

डिस्लेमर : हे लिखाण कुठल्याही राजकीय पक्षाचा अथवा नेत्याचा "उदोउदो" करण्यासाठी लिहलेले नाही. मी पाहिलेल्या एका अभुतपुर्व घटनेचे माझ्या अतिक्षुद्र लेखणीतुन हे वर्णन. कसलाही "पक्षसापेक्षत्वाचा आरोप" आम्ही आत्ताच फेटाळतो ...

अवांतर : मी दिलेले "लेखाचे शिर्षक" मला अजुन परफेक्ट वाटत नाही. जोग्य व समर्पक शिर्षक सुचविल्यास आपला मी आभारी राहिन. धन्यवाद !!!

Wednesday, October 8, 2008

कचेरी ते कॉर्पोरेट ऑफीस : एक मनकल्लोळ !!!



बघता बघता "Germany" ला येऊन २ आठवडे झाले. सगळा वेळ सेटलमेंटमध्येच गेला. भारतातुन निघायच्या १ आठवडा आधी व इथे आल्यावर पहिला आठवडा फ़ार जोशात गेला।
नविन जागा, नवा देश, नवी भाषा, नवी संस्कॄती व राहणीमान आणि विचारसारणी व सगळ्यात महत्वाचे म्हणजे "नवे ऑफीस ". फारच फरक पडला या सर्व गोष्टीत, त्यामुळे मनात एक सुप्त आकर्षण, एक दडपण, एक उत्साह व तेवढाच नव्हर्सनेस अशा भावनांनी पार डोक्यात गोंधळ उडाला होता.
असो. त्याबद्दल पुन्हा सवडीने, आज मुख्य मुद्दा आहे ते "ऑफीस कल्चरचा" !!!

आता तसे पहायला गेले तर "बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या कार्यालयात" काम करण्याचा अनुभव हा आयुष्यात प्रथमच असा काही भाग नव्ह्ता, तिकडेही करतच होतोच की.पण इकडे सर्व वेगळे आहे, ह्याला मी म्हणेन "बहुराष्ट्रीय कंपनीचे परफेक्ट कार्यालय" ....
मस्त वाटले इथले वातावरण, या एकदम झकपक व चकचकीत वातावरणात राहताना आपला आपलीच ऐट बघुन आतुन आनंदाच्या उकळ्या फ़ुटत आहेत. आल्यावर पहिल्या दिवशी जी "Formal Welcome Ceremony " होती ती झाल्यावर ५ मिनीटे काहीच सुचेना, अरे एवढी कसली "Formality व Descency", आम्हाला नाही बाबा सवय असल्या गोष्टींची।

स्वाभावीकच मग मन प्रत्यक्षात अनुभवलेल्या व काहीच्या बोलण्या, लिहण्यातुन ओळख झालेल्या "देशी कचेरी उर्फ़ भाऊसाहेबांचे हापीस" यांचा विचार करु लागले ...
[ काळजी नका करु, कंपनीच्या कार्यालयीन वेळात नाही, अशाच निवांत वेळात हो. नाहीतर लगेच आम्हाला "नानु सारंजामे" ठरवुन मोकळे व्हाल. ]

मग माझ्या डोळ्यासमोर आपल्या "जुन्या देशी कचेरी" चे कल्पनाचित्र आले. आता "कचेरी" ह्याचा अर्थ येथे साधारणता "सरकारी कचेरी वा एखाद्या देशी कंपनीची कार्यालये" ह्या अर्थाने घ्यावा. म्हणजे तेथील वातावरण, काम करण्याची पद्धत, त्याची भाषा, तेथील काम करणारी मंडळी, त्यांचे वागणे, पेहराव व बोलचाल आठवले. नकळतच मी त्याची तुलना जराशी सध्याच्या "Corporate Office " शी करुन बघीतली. मला स्वत:शीच प्रचंड हसु आले एवढा प्रचंड फरक आहे त्यांच्यातनक्की काय फ़रक आहे ते एकामागे एक पाहु....

जुन्या कचेरीत प्रवेश करायच्या आधीच त्या इमारतीकडे एकदा पहा, ती जर अगदी जुन्या छापाची इमारत अगदी लाल कौलासह, बाहेर सायकली व मोटारींची ही गर्दी यातुन वाट काढत आत प्रवेश केल्याकेल्या समोर काही दिसु नये याची काळजी घेणारा अंधार, जागोजागी केलेले तंबाखु व पानाच्या पिचकाऱ्यांची नक्षी, दिशाभुल करणाऱ्या पाट्या [असतील तर] , जिन्याच्या मोडलेल्या पायऱ्या, मोडलेल्या फरश्या, बगलेत फ़ायले मारुन कुणाकडेही ढुंकुनही न पाहता पळापळ करणारे कारकुन, जिन्यात साहेब्याच्या पट्टेवाल्यापाशी वशिला लावण्यासाठी त्याच्याभोवती कोंडाळे केलेली सर्वसामान्य जनता असा जर सारंजाम असेल तर तुम्ही योग्य ठिकाणी पोहचला आहात हे समजायला हरकत नाही. ही झाली टिपीकल जुन्या कचेऱ्यांची मांडणी....

आता तसे नाही, आतांची ऑफीसे फार लांबुन ओळखु येतात कारण त्याच्या अलिकडे ५ किमी. पासुन "XYZ 5 Km ahead" अशा पाट्या लावतात. त्यामुळे ती जुनी "ओ पाव्हनं, ते येमीशीबी हापीस कुठशीक येतं हो?" या प्रश्नाची व त्याला "जावा की डाव्या अंगानं फर्लांगभर, चौकातनं मारा राईट टर्न, फुड गेल्यावर २० पावलात आलच की हापीस" अशा उत्तरांची मजा नाही. नव्या "Offices" ती डोळे दिपावणारी उंच इमारत, ती काचांची रेलचेल, ते गालीचे, बाहेर बाग व अनेक फुलांची झाडे हे पाहुन एखाद्या जुन्या "कचेरी कारकुना" ला भडभडुन येण्याची शक्यता नाकारता येत नाही. आत गेल्यावर [म्हणजे तुमच्याकडे परवानगी असेल तर, अन्यथा शक्यच नाही] ते मार्बलचे फ़्लोअर, ते अख्खी टाच रुतेल एवढा गालीचा, ती भिंतीवर लावलेली अगम्य चित्रे व कसे वागावे याचे आदेश देणाऱ्या पाट्या व त्या ही ६-६ भाषेत, छोटे छोटे फुलांचे गुच्छ, शिस्तीत लाऊन ठेवलेली वर्तमानपत्रे, टापटीप पोषाखात वावरणारे एंप्लोयी, सळसळ करीत पळणाऱ्या काचेच्या लिफ्ट्स, आलेल्या अभ्यांगतासाठी मांडलेल्या खुर्च्या [ हे एक आश्चर्यच, नाहीतर जुन्या कचेऱ्यात असले लाड नव्हते.] असा जर नजारा दिसला तर तुम्ही एका "आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट ऑफ़ीसात" आला आहात हे नक्की।

जुन्या कचेरीत प्रवेश करतानाच तुमच्या चेहऱ्यावर एका आगंतुकाची भावना आपसुकच येते, कारण ते वातावरण व आत्तापर्यंत न्य़ात असालेली ऐकीव माहिती. शिवाय आत गेल्या गेल्या "काय पाहिजे ? कोण पाहिजे ? काय काम आहे ? कुणी पाठवले ? परवाना हाय का ? ओ तिकडे नका जाऊ ? आधी बाहेर व्हा. " असा प्रश्नांची सरबत्ती झाली नाही [ कुणी जर तुमच्याकडे लक्ष दिले तर ] तर तुम्ही नशिबवान आहात असे समजायला हरकत नाही . आत गेल्यागेल्या आलेला माणुस गोंधळुन, घाबरुन, बावरुन गेला पाहिजे हा ह्या कचेऱ्यांचा "अलिखीत कायदा" व बाकीचे कायदे नाही पाळले तरी ह्याचे पालन मात्र एकदम इमानाने होते.

आता असे नाही, गेल्यागेल्या [ बहुतेकठिकाणी ] तुमचे स्वागत होते, जर तुम्ही आमंत्रित असाल तर तुम्हाला "Welcome" करायला कोणीतरी गेटवरच हजर असते. जर तुम्ही नवे असाल तर त्या रिसेप्शनवर बसलेली सुंदर, मनमोहक कन्यका "Yes Sir, What can i do for you ? May I help you " अशा प्रश्नोत्तरे होऊन तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन केले जाते. थोडक्यात तुमचा "कार्यालयाच्या अंतर्भागापर्यंत" चा प्रवास सुखकर होतो. आधीच्या काळात म्हणे लोक या गोष्टींसाठी नवस वगैरे बोलत, व्रतवैकल्य करत आणि ती कचेरी जर पुण्यातील असेल तर मात्र तुमच्या मागे मागच्या "शतजन्माचे पुण्य" पाहिजे, नाहीतर मामला बिकट आहे।

बाकीच्या गोष्टी जाउ दे, आता आपण कार्यालयाच्या आत व्यवहार कसा होतो हे पाहु. मी शक्यतो आतल्या कर्मचारी वर्गाच्या कामाशी संमंधीत संभाषणाबद्दल लिहतो आहे. आता "साहेब व त्याचा पट्टेवाला" ह्या दोन्ही गोष्टी कालबाह्य झाल्याने त्यांच्याशी संमंधीत गोष्टीच्या मजेला आपण मुकलो आहोत.
पुर्वीच्या काळी जर काही कारणामुळे कुणाला कचेरीत पोहचायला उशीर झाला व ते "हजेरी रजिस्टर" साहेबाच्या टेबलावर गेले असेल तर बिचाऱ्याचा जीव अर्धा होऊन जायचा. सामान्यत: हे कर्मचारी मध्यमवर्गीय व बहुसंख्य चाळीत राहणारे असल्याने त्यांना "पाणी उशीरा आले, दुध नासले, गॅस संपला, ट्राम निघुन गेली, पोराला शाळेत सोडायला गेले, सकाळी देवळात गेल्यावर तेथील गर्दी" अशा कारणामुळे उशीर होत. यामुळे कचेरीत उशीरा पोहचल्यावर व साहेबाने ते पाहिल्यावर त्या बिचाऱ्याच्या डोळ्यासमोर काजवे चमकत, एक तर ठरलेला "हाफ डे" व वरुन साहेबाची "कंपनी काय घरची समजलात का ? मी किती वेळा गप्प बसायचं ? पुढच्यावेळी मेमो देईन" वगैरे बोलणी....

आता तसे नाही, मुळात एंप्लॉयी आता "फ्लॅट" मध्ये रहात असल्याने त्यांचे प्रॉब्लेम्स जरा वेगळे असतात, म्हणजे "ट्रॅफ़ीक जाम, कार पंक्चर, कालचा ओव्हरहॅंग, वाईफबरोबर सकाळ सकाळ भांडण" वगैरे वगैरे. पण फरक असा की तो ह्या उशीराची मुळीच काळजी करत नाही. तो आपल्या मुडप्रमाणे ऑफ़ीसात पोहचतो. जर साहेबाने पाहिले व त्याने विचारले तरी ह्याला त्याचे काहीच "भ्या" नसते. उलट साहेबाकडुनच एखादी "हॅंगओव्हर लवकर कसा उतरवावा" याबद्दल टीप मि्ळण्याचे चान्सेस असतात.आता "लेटमार्क / हाफ़ डे" अशा गोष्टी कालबाह्य झाल्या आहेत.

आधी जर काही काम जास्त पेंडिंग पडले तर साहेब त्या कारकुनाला सगळ्या जनतेसमोर "काय रे, काम कोण तुझा बाप करणार का ? चल पटपट उरक, नुसते नाचुन दाखवुन दाखवुन नकोस. माजलेत साले, काम करायला नको, नुसत्या पाट्या टाकायला येतात भाडे" अशा शब्दात "झाडत". आता मुळात कल्चरच बदलल्याने तो "कडकपणा" गेला. आता फ़क्त एक "Urgency Mail" येतो व परिस्थीती हाताबाहेर चालली तर बॉस त्याला "केबीनमध्ये" बोलावुन "See, we are already running out of deadline. You have to work hard.You know meeting deadlines is very important for our corporate image. We don't have any other option than to work for overnights" असे साध्या शब्दात समजावतो.
जुन्या काळी असा प्रसंग घडल्यावर तो अभागी कारकुन आपला साहेब निघुन गेल्याची खात्री करुन जमलेल्या बघ्या सहकाऱ्यांसमोर उसन्या आवसानाने " साला आपण कुणाच्या बापाला घाबरत नाही, समजलात काय ? साहेब असेल तो त्याच्या घरी, इथं आमच्याशी गाठ आहे म्हणावं. कायस्थाचं रक्त आहे, एकवेळ शीर तोडुन देऊ पण इमानाला बोल लावलेला ऐकुन घेणार नाही" अशी सफ़ाई देत पण हे बोलताना साहेब कुठे जवळपास नाही ना याची खात्री आपल्या तिरक्या नजरेने करुन घेत. बाकीचे सहकारी पण मग " जाउ दे वसंतराव, ८ दिवसाचा पाव्हणा आहे. आपल्याला सायबाचेसगळे छक्केपंजे माहित आहेत. चला, चहा घेऊ, थोडे डोके शांत होईल" अशी मांडवली करत. आताच्या वातावरणात असे प्रसंग घडणेच शक्य नाही. जर असा प्रसंग घडलाच तर तो "एंप्लॉयी" जागेवर त्या साहेबाच्या तोंडावर राजीनामा फेकेल वा उलट साहेबालाच डोस देईल "You are crossing limits. This is not way to behave." वगैरे वगैरे।

पुर्वी कचेऱ्यांना सध्याच्या काळासारखे "Client" वगैरे असा प्रकार नसायचा त्यामुळे तिथला "साहेबच" तिथला सर्वेसर्वा. तो म्हणेल ती पुर्व दिशा. अशा परिस्थीत जर कोणी त्याच्याकडे कामाच्या "अर्जंट" असण्याची व ते लवकर करण्याची बोलणी करायला गेले तर संवाद असा घडायचा, " अरे लवकर करा म्हणजे, आम्ही काय इथे माश्या मारतोय का ? मला सांगणारा तो कोण टिकोजीराव लागुन गेला ? मला काय त्याच्या बापाचा नौकर समजला काय ? चल हकाल गाडी, जेव्हा होईल तेव्हा सांगु.". मग तो बिचारा आपला मान खाली घालुन निघुन जायचा. हा किस्सा कचेरीतल्या बाकीच्यांना ८ दिवस पुरे, मग साहेबाने त्याची कशी "बिनपाण्याने केली" ह्यावर अनेक परिसंवाद घडत....

आज परिस्थीती अशी नाही, आज "Client" म्हणजे भगवान, तोच सर्वेसर्वा, आपला मायबाप. त्याचा "मेल" आला रे आला, आपला बॉस एकदम गडबडुन जातो, मग टीम मिटिम्ग काय, डिस्कशन काय, प्रोजेक्ट प्लानिंग काय नाही नाही ते चालते. तिकडे तो एकदा मेल टाकुन पुन्हा आपल्या विश्वात गुंग, इकडे काय रण पेटले आहे ह्याची त्याला काही खबर नसते. मग इथुन त्याला एक अर्जवीचा व आपल्या कामसुपणाची खात्री देणारा एक मेल पाठवला की आपल्या बॉसचा जीव भांड्यात पडतो, तोवर त्याला जेवायची शुद्ध नसते. त्या मेलचा मसुदा साधरणता असा असतो "We are working overnights to meet your deadline. Our most efficient resourses are working on this project. We will come back to you very soon with positive result. We really appreciate your patience.". बघा काळ कसा बदलला आहे ते, जुन्या काळच्या "मी काय त्याच्या बापाचा नौकर नाही" ह्या दमदार वाक्याची जागा "We really appreciate your patience" सारख्या पुचाट वाक्याने घेतली आहे.

आता एखाद्याला जर त्याच्या सध्याच्या कामाचे स्वरुप, त्याचा मोबदला, त्याची पोसीशन पसंत पडले नाही वा त्याच्या कंपनीकडुन अजुन काही अपेक्षा असतील तर तो डायरेक्ट बॉसशी बोलु शकतो. किंबहुना त्याच्यासाठी खास " H R Department" बनवले आहे. तिथे तो बिनधास्त आपले म्हणणे मांडु शकतो. त्यातुनही काही मार्ग निघाला नाही तर तो "पेपर टाकुन" लगेच निघुन जाऊ शकतो कारण सध्या उपलब्ध असलेल्या अनेक संधी. पुर्वी असे नसायचे, मुळात संधीच कमी त्यामुळे माणसे एकदा चिकटली की मग त्यापुढे "ठेविले तैसेची रहावे" ह्या तत्वानुसार वागत, फ़ार त्यांची तक्रार नसे....
त्यातुन कुणी तक्रार घेऊन साहेबाकडे [ हो, त्या काळी HR वगैरे असे लाड नव्हते ] गेलेच तर मग "जंगी खडाजंगी" ठरलेलीच. त्यावेळाच संवाद साधारणता असा ...

" साहेब एक विनंती आहे, २ मिनीटे बोलु का ?"
" बोल लवकर, मला वेळ नाही. काम सोडुन हे नस्ते धंदे ?"
" साहेब, ते जरा मला थोडी ......"
" हे बघ, रजा वगैरे काही मिळणार नाही. इथं कामाचा ढीग पडला आहे आणि तुम्ही हिंडा लेको सुट्ट्या घेऊन चैनी करत"
" रजा नाही साहेब, ते जरा पगारवाढीचे बोलायचे होते"
" कशासाठी रे पगारवाढ ? असे काय दिवे लावले आहेत ? नुसत्या पाट्या टाकता लेको आणि म्हणे पगारवाढ पाहिजे"
" साहेब घरखर्च परवडत नाही, महागाई ....."
नसती कारणे देऊ नकोस, काही पगारवाढ नाही आणि काही नाही, पळ कामे कर"
" साहेब, पोरगा झालाय, त्याच्या दुधा-औषधाचा खर्चाचा मेळ बसत नाही"
" बरं बरं, मी बोलतो हेड-डिपार्टमेंटशी, जा आता काम कर"
" धन्यवाद साहेब, तेवढे बघा नक्की, फ़ार ओढाताण होत आहे सध्या ..."
"........."
"........."
"........."

एवढ्यावर संवाद संपुन हिरमुसल्या चेहऱ्याने तो कारकुन परत जागी येऊन कामाला लागत असे व "पगारवाढीची व घरखर्चाची चिंता" करीत असे. मधल्या सुट्टीत साहेब स्वत: त्याच्या टेबलजवळ येऊन आपुलकीने खांद्यावर हात ठेऊन " हे पहा बंडोपंत, मी बोललो आहे, १०० रुपये मिळेल ह्या महिन्यापासुन. पोराची काळजी घ्या. त्याच्यासाठी गाईचे दुध लावा, तब्येतीला चांगले असते लहान पोराच्या. बाकी काही लागले तर सांगा. " असा आपुलकीचा सल्ला देऊन जात असे. त्यावर तो गेल्यावर "बंडोपंत" आपले डोळे बाहीने पुसत " साला बोलतो फ़डाफ़ड पण माणुसकी आहे त्याच्यात अजुन" म्हणुन सहकाऱ्यांना आपल्या साहेबाच्या "चांगुलपणाचा दाखला" देत।
आत्ताच्या कॉर्पोरेट विश्वास ह्या "माणुसकी व चांगुलपणाच्या पर्सनल रिलेशन्सला" स्थान नाही, तेथे फक्त आहेत "फॉर्मल रिलेशन्स"।

जास्त पाल्हाळ जाऊ दे, थोडक्यात पाहु....

लोक पुर्वीही कामं करायची, आताही करतात पण कामाची एक "Effiecient Work Policy" आली आहे. त्यामुळे कामाचा जास्त बाऊ होत नाही. पुर्वी सर्व गोष्टी ह्या आपपसातील संबंध व जुळवुन घेण्याच्या पद्ध्तीने चालत असल्याने एखाद्या चुकीचे खापर हे एखाद्या "गरिब कारकुनावर" फुटायचे व त्या बिचा-याची २ वर्षे वगैरे इंक्रीमेंट्स थांबायची, तिकडे साहेब मात्र नामानिराळा.
आज तसे नाही, इथे प्रत्येक गोष्टीचे एक कायमस्वरुपी रेकॉर्ड ठेवले जाते, जे काय आहे ते लिखीत स्वरुपात " ई-मेल" मधुन पाठवले जाते त्यामुळे जबाबदारी ढकलता येत नाही.एखाद्या मोठ्ठ्या चुकीबद्दल जशी इंजीनीअरवर आफत येते तसा डायरेक्ट " सी ई ओ" सुद्धा फायर होऊ शकतो, यामुळे कामात एक "सुसुत्रता व परफेक्शन" आले आहे.आजकाल कंपनी कर्मचा-यांबरोबरच त्यांच्या कुटुंबियांच्याही आरोग्याची काळजी घेते, पुर्वीही हे असायचे पण आज "माणसाला" जास्त किंमत आली आहे. त्यामुळे कर्मचा-यांचे आयुष्य नाही म्हटले तरी ब-यापैकी सुखाचे झाले आहे।
पुर्वी मुळात कमी पगार असल्याने कर्मचा-याची कुटुंब चालवताना खुप ओढाताण वगैरे व्हायची, त्यात बाहेर दुस-या संधीही उपलब्ध नसायच्या त्यामुळे आजची आमच्या वडीलांच्या वयाची पिढी एकाच ठिकाणी मरमर काम करुन पिचुन गेलेली दिसते।
आज तसे नाही, जागतीकीकरणामुळे कर्मचा-यांचे उत्पन्न वाढले आहे, तशा गरजाही वाढल्या आहेत म्हणा पण बाहेर अनेक संधी उपलब्ध असल्याने म्हणावे अशी "लागत नाही". जीवनपद्धती सुधारली, त्यांच्या मुलाबाळांना शिक्षणाच्या उत्तमोत्तम संधी मिळतील व ती ही शिकुन चांगल्या पदाला पोहचतील. पुर्वी ह्या गोष्टीसाठी अतोनात कष्ट व्हायचे, आज ह्या गोष्टी खुपच नसल्या तरी ब-यापैकी सुकर आहेत.

हे सर्व झाले फ़ायदे, परंतु काही अनिष्ट गोष्टीही आल्या ....
सगळीकडेच स्वत:च्या उत्कर्षासाठी जीवघेणी व गळेकापु स्पर्धा सुरु झाल्याने आजकाल कर्मचा-याचे मानसीक स्वास्थ म्हणावे एवढे स्थीर नाही. नेहमीच माणुस कसल्या ना कसल्या धांधलीत राहतो. आता या ओघाने "घाणेरडे अंतर्गत राजकारणही" येतेच, त्याचाही प्रचंड मानसीक ताण येऊन त्याचा परिंणाम त्याच्या अख्ख्या कुटुंबावर होतो ...पैसा जरी मिळत असला तरी या एक्स्ट्रा मनी साठी आजकाल ऑफीसमध्ये उशीरापर्यंत थांबणे ओघानेच येते आणि ह्यात त्याच्या "कौटुंबिक जीवनाचा" नेहमीच बळी पडतो.आपल्या मुलाबाळांबरोबर २ दिवस निवांत घालवायला त्याला ६ महिने आधीच प्लानिंग सुरु करावे लागते, प्रमुख तोटा म्हणजे ह्या लाईफ ने त्यांच्या वयोवॄद्ध आईवडीलांना ह्यांच्यापासुन दुर केले.आम्ही असतो इथे मस्त टेचात रहात पण तिकडे आमचे आईवडील "लेकरु कधी ८ दिवस निवांत गावाकडल्या घरात राहिल" ह्याची वाट बघत असतात आणि हो; फक्त वाटच बघत राहतात.कारण हे "कॉर्पोरेट कल्चर" त्याला एवढाही वेळ मिळु देत नाही.

थोडक्यात काय तर "हा ही टेन्शन मुळे सदैव काळजीत, भेट होत नसल्याने बायका-मुले नाराज व आईवडीलांचे काळीज तुटण्याला तर माझाकडे उपमाच नाही" ...
त्याच्या "सामाजीक जीवनाची" तर ऑलरेडी वाजलीच असते पण वेळ न मिळाल्याने नातेवाईकांच्या, आप्तांच्या समारंभाला न जाउ शकल्याने ती ही नाराज. याला सर्व कळते हो, अगदी तो काही अंध किंवा निष्ठुर नाही पण सध्यातरी ह्या प्रश्नांचे त्याच्याकडे उत्तर नाही. हे असेच चालायचे. मग कधीतरी त्याला ह्या सर्व दु:खाचां ताण असह्य होऊन तो एकटाच बेडरुममध्ये "हसमसुन रडुन" घेतो कारण तो ही एक माणुसच ना. पण ही गोष्ट त्याला उघडपणे बोलता येत नाही कारण त्याच्या असलेल्या "वरिष्ठ पदाचा व इमेज" चा बोजा, मग तो आतुनच जळत राहतो. आण असह्य झाल्याने लहान वयातच "हॄदयविकार व रक्तदाबाची" उदाहरणे कमी नाहीत, इनफ़ॅक्ट आता पेपरातुन "तिशीच्या यशस्वी युवकांच्या आत्महत्येच्या बातम्या" ही वाचायला मिळु लागल्या आहेत. फक्त ह्या बाबतीत अजुन सुधारणा हवी असे मनापासुन वाटते.

बाकी ह्या "कॉर्पोरेट लाईफ़ने" खुप काही दिले आम्हाला, अजुनही देतेच आहे फक्त आमच्या कुटुंबियांबरोबर मनोसोक्त वेळ घालवण्याचे स्वातंत्र्य जर मिळाले तर " जगी सर्व सुखी असा कोण आहे ?" ह्या प्रश्नाचे उत्तर मी मोठ्ठ्याने ओरडुन मनापासुन " मी आहे !!! " असे देईन।

असे म्हणातात की काही मार्ग तुम्हाला खुप काही देतील, सुख व दु:ख दोन्हीही, पण त्या मार्गावर जायचा "एक दरवाजा" असेल पण परत यायला "दरवाजाच नसेल" तर ???

तो मार्ग ह्या "कॉर्पोरेट लाईफचा" तर नाही ना ????

Wednesday, August 27, 2008

सिंग इज किंग : शुद्ध व निखळ मनोरंजन नव्हे तर "फसवणुक" !!!


.
समजा तुम्ही अतिशय पट्टीचे खवय्ये आहात. चवदार व लजीज अन्न हा तुमचा विक पॉइंट आहे. बाजारात आलेली नवी "चटपटीत डिश" चाखण्यासाठी तुम्ही पैशाचा विचार करत नाही. तुम्ही स्वतःच्या खिशातले पैसे टाकुन खास "हॉटेलात" जाऊन त्या डिशचा आस्वाद घेता, कुठेतरी नेटवरुन त्याची पाककॄती उतरवुन हेऊन त्याचे घरगुती प्रयोग करुन पैसे वाचवण्याचा नतद्रष्टपणा तुम्ही करत नसता. योग्य मालाच्या व लायकीच्या पदार्थासाठी पाहिजेतेवढा पैसा मोजण्याची तुमची दानत व तयारी असते. पण तुम्ही सध्या आयुष्याच्या कंटाळवाण्या कालखंडातुन मार्गक्रमण करत आहात. काहीच तुमच्या मनासारखे होत नाही. जाईल तिकडे निराशा पदरी पडत आहे. दिवसेंदिवस रटाळ, टाकाऊ, बोगस, बेचव अन्नपदार्थ तुमच्या नशिबी येत आहेत, त्यामुळे जिभेला व मनाला एक प्रकारची बाभळी आली आहे.

त्यात आशेचा किरण म्हणजे गेले काही दिवस एका "प्रसिद्ध हॉटेल" कडुन "लज्जतदार, चवदार व जिभेचे पांग " फेडु शकणार्‍या एका भुतोनभविष्यती अशा "फुडफेस्टीवलची जाहिरात" पेपरातुन प्रसिद्ध होत असते. तुम्ही दररोज त्याची चवदार वर्णने पेपरातुन वाचत असता, त्या जाहिरातीत सांगितल्याप्रमाणे खास झणझणीत पंजाबी स्टाईलचे, मराठमोठ्या साजाचे, मसालेदार मोगलाई पद्धतीचे, चायनीज चस्क्याचे व गुजराती मधुरपणाचे अनेक उत्तमोत्तम पदार्थ येथे तुमचे चोचले पुरवण्यासाठी उपलब्ध असणार आहेत। तुमच्या नजरेत एक वेगळीच चमक येते, मनाला एक उत्साह वाटु लागतो, शरिराला एक तरतरी येते व तुम्ही त्या "खाद्यमहोत्सवात " आपले सीट बुक करण्यासाठी धाव घेता, तुमच्या समव्यसनी मित्रांना पण तुम्ही पटवता व तुमच्या भाग्याने तुम्हाला बुकिंग मिळते सुद्धा. तुम्ही छाती वीतभर जास्तच फुगवुन त्या "बुकिंगची" आपल्या मित्रपरीवारात व इतर ओळखीच्या लोकात जाहीरात करता। काही लोक तुमच्याकडे "तुमची काय बाबा ऐश आहे, आमचे एवढे भाग्य कुठले " असे आसुयेचे उद्गार काढुन त्यांच्या दुर्भाग्याची हळहळ व्यक्त करतात तर काही जाणकार लोक "त्यात काय दम नसतो बाबा, आपली घरची मीठभाकरी बरी" असा निराशेचा सुर काढतात। पण तुम्हाला त्यांच्या प्रतिक्रीयेकडे लक्ष द्यायला वेळ नसतो व तुम्ही त्या मानसीक स्थीतीतही नसता. आता तुमच्या रक्तात त्या "खाद्यमहोत्सवाचे खुन सवार झाले असते" व डोक्यात त्याची नशा चढलेली असते.

मग तो सुदीन उजाडतो, तुम्ही अतिशय उत्साहाने त्या "कार्यक्रमस्थळी" जाता. वातावरण एकदम भारलेले आहे. आधी जाहीरात केल्याप्रमाणे सर्व पदार्थांची रेलचेल आहे. अनेक प्रतिष्ठीत व मोठ्ठी मंडळी जेवणासाठी रांगा लाऊन शिस्तीत उभी आहेत. तुमचाही नंबर येतो, तुम्ही तुमच्या जागेवर बसता व तोंडाला पाणी सुतलेल्या अवस्थेत आपल्या समोर डिश येण्याची वाट पाहता. शेवटी तो "सोनीयाचा क्षण" येतो, राजेशाही पोशाख केलेले वाढपी तुमच्यासमोर झाकलेली "सो कॉल्ड लज्जतदार डिश " आणुन ठेवतो। तुम्ही आधाशीपणाने त्याचे झाकण काढुन फेकता व वखवखलेल्या नजरेने त्या डिशकडे पाहता ....

पण हाय रे कर्मा ऽऽऽऽऽ

त्या गाढवांनी वेगवेगळ्या प्रकारच्या पदार्थांचे अन्नपदार्थ एकाच ताटात वाढण्याचा मुर्खपणा केल्याने त्याच्या चवीचा पार बँड वाजला असतो. सरमिसळ झाल्याने त्याची वेगळी चव अशी लागत नाहीच. जाहीरात केल्याप्रमाणे झणझणीत पंजाबी स्टाईलचे, मराठमोठ्या साजाचे, मसलेदार मोगलाई पद्धतीचे, चायनीज चस्क्याचे व गुजराती मधुरपणाचे अनेक उत्तमोत्तम पदार्थ खरेच तेथे असतात पण त्यांची सरमिसळ झाल्याने तुमचा अपेक्षाभंग होतो. तुम्ही पट्टीचे खाणारे असल्याने असल्या "भेसळीची" तुम्हाला सवय नसते त्यामुळे " श्रीखंड, चायनीज मंचुरीअन, पंजाबी पराठा व तंदुरी चिकन, खमणठोकणा, मटनाचा तांबडा रस्सा, हक्का न्युडल्स, वांग्याचे भरीत" असे उत्तमोत्तम पदार्थ एकाच बैठकीत एकाच ताटात व एकाच वेळी खाण्यास तुमचा तात्वीक विरोध असतो। खल्लास ऽऽऽऽऽ . तुमच्या मुडचा पार बोर्‍या वाजला असतो, आता भरल्या ताटावरुन उठण्यास तुमची तयारी नसते कारण "मोजलेले बक्कळ पैसे व जनलज्जा", त्यामुळे तुम्ही कशीबशी डिश संपवता व आयोजकांना शिव्या देत बाहेर पडता. त्याच तीरमिरीत आयुष्यात पुन्हा कधी असल्या कार्यक्रमाला जाण्याची [ व न पाळली जाणारी ] शप्पथ तुम्ही घेता. त्यानंतर ह्या अनुभवानंतर मित्रात झालेले तुमचे हसे वेगळेच ...एकंदरीत खिशाला चाट बसवणारा व मनोसोक्त मनस्ताप देणारा हा अनुभव ठरतो ...

नक्की चुक कोठे झाली ?
तुमच्या साईडने तर तुम्ही अगदी अचुक आहात, मग नक्की बिघडले काय ?
ह्याचे उत्तर आहे "कुटलीही पुर्वचौकशी न करता अन्नपदार्थावर भुलुन आयोजकांवर ठेवलेला अंधविश्वास" ....
ह्याला काही उत्तर नसते तुमच्याकडे कारण हा तर तुमचा "वीक पॉईंट" !!!

नेमके हेच "सिंग इज किंग" नामक सध्या "सो कॉल्ड गाजत असलेल्या व यशाचे अनेक विक्रम उद्धवस्त " करणार्‍या चित्रपटाबाबत घडते। त्यातल्या कलाकारांच्या पुर्वपुण्याईला भुलुन व प्रचंड जाहीरात होत असलेल्याने व त्यात दाखवलेल्या दॄष्यांना भुलुन तुम्ही पदरमोड करुन पिक्चरला जाता हीच ती "घोडचुक" ...

आता थोडेसे स्टोरी बद्दल, मुळात सगळ्यात मोठ्ठी बोंबाबोम्ब इथेच असल्याने मी काय लिहणार हा प्रश्न आहे।तरीपण जनरीती प्रमाणे काही तरी लिहावेच लागेल ...

तर त्याचे असे आहे की चित्रपटाचा नायक "हॅप्पी सिंग [ अक्षयकुमार ] " पंजाबातल्या एका कुठल्याश्या खेड्यात रहात असतो. तो लहानपणापासुनच थोडासा अर्धवट, महामुर्ख, अडाणी, बालीश, लाडोबा व तरीही इतरांच्या मदतीला धावून जाणारा, गावकऱ्यांच्या खोड्या करणारा काहीसा साधाभोळा, थोडास बनेल, मोकळा ढाकळा शीख तरुण आहे. आता एवढ्या भुमीका तो एकाच वेळी कशा सांभाळतो हा एक प्रश्न आपल्याला पडतो पण दिग्ददर्शक असल्या मुलभुत भावनेतुन दुर जाऊन अतिशय उच्च पदाला पोहचल्याने त्यांना हा प्रश्न पडला नसावा. त्याचा एक मित्र "रंगीला [ ओम पुरी ] ", हा हॅप्पी पेक्षा किंचीत कमी पण तसाच अर्धवट, महामुर्ख, अडाणी, बालीश. ह्या दोघांनी आपला " महान कॄत्यांनी" गावकर्‍यांना पुरते हैराण केले असते व ते बिचारे हतबल झाले असतात। पण मुळात हे दोघे "लाडोबा" असल्याने त्यांना कुणी समजावुन सांगण्याचा वा समज देण्याचे दुष्कॄत्य करत नाही व ह्यांचे चाळे चालु राहतात. ह्यांच्या हाताला काम व डोक्याला ताण नसल्याने ह्यांना अनेक अफाट कल्पना सुचत असतात, त्यातल्या एका प्रसंगात हॅप्पी सिंग एक कोंबडी पकडण्यासाठी निम्मे गाव खाली झोपवतो व त्यांच्या नुकसानीची पर्वा न करता " कोंबडी पकडली की नाही" असा आव आणुन ताठ मानेने फिरक असतो. गावकरी ह्यांना काहीतरी कारण काढुन गावाबाहेर हकलुन देण्याच्या संधीच्या शोधात असतात. त्यच्यामध्ये ह्यांचे चाळे चालुच असतात व इकडे आपली कवटी सरकत असते. कारण कुठल्याही अंगविक्षेपाला वा पाचकणाला पोट धरुन हासायला आपण काही युपी/बिहारचे भैय्या प्रेक्षक किंवा नवज्योतसिंग सिद्धु नसतो.असो.

त्याच्यादरम्यानच त्यांच्यांच गावचा एक सुपुत्र "लकी सिंग [ सोनु सुद - चांगला कलाकार आहे बिचारा ] " हा ऑस्ट्रेलियात जाऊन डॉन बनला असतो व त्याचे तिकडे ११ भाई गँग्स व ११ देशातल्या पोलीसांशी चांगलेच वाजले असते। त्यातुनच त्याच्यावर एक "खुनी हल्ला" होतो, तो जखमी होतो, ती खबर एकडे पंजाबातल्या गावात येते, त्याचे वडील आजारी पडतात व लकीला परत आणा असा हट्ट धरतात. गावकर्‍यांनी ही चांगली संधी वाटते, ते "हॅपी व रंगीला" यांना ह्या कामगिरीवर पाठवतात व आयुष्यात कधीही गावाची वेस न ओलांडलेले दोघे डायरेक्ट ऑस्ट्रेलियाला निघतात...

इथपर्यंत आपण पिक्चर कसाबसा सहन करु शकतो ...
त्यानंतर जो मुर्खपणाचा कळस सुरु होतो त्याला तोड नाही आणि उत्तर तर नाहीच नाही ...

त्या प्रवासाच्या दरम्यान ह्या २ अर्धवट गाढवांचे तिकीट दुसर्‍याशी अदल्याबदल झाल्याने ते इजिप्तला जातात व तिकडे "पटकथेच्या मागणीनुसार" त्यांना "सोनिया [ कतरिना कैफ ] " भेटते. आता हे इजिप्तला कसे जातात? त्यांना सोडते कोण ? तिकडे त्यांची व्यवस्था काय ? व्हिसाचे काय ?असले मला पडनारे क्षुल्लक त्यांना पडत नाहीत व ते त्याची काळजीही करत नाहीत। असो. त्यानंतर त्यांना मधीच आठवते की आपल्याला तर ऑस्ट्रेलियाला जायचे होते, मग पुन्हा गाडी ऑस्ट्रेलियात पोहचते व ह्यापुढचा समस्त गाढवपणा, हैदोस, पाचकळपणा हा ऑस्ट्रेलिया ह्या देशी घडतो [ व आपल्याला मस्त "देशी" पिऊन शांत झोपावे अशी इच्छा होते ]....
तर होते काय की ह्या गडबडीत त्या खर्‍या "किंग उर्फ लक्की" वर पुन्हा एक हल्ला होऊन तो जायबंदी होतो व त्यांच्यासमोर आता आपला नेता कोण हा प्रश्न पडतो. दुसरे कोणी "लायक" न सापडल्याने पुन्हा एकदा "पटकथेच्या मागणीनुसार" हे लोक "हॅप्पी सिंग उर्फ अक्षयकुमारला" नवा किंग म्हनुन घोषीत करतात. मला नाही झेपला हा प्रकार. ४ शब्द सरळ बोलता येत नसलेला, अक्षरश : अर्धवट, महामुर्ख, अडाणी, बालीश हा "हॅप्पी सिंग" कुठल्या कर्तुत्वाने "किंग" होण्यास लायक होतो. फक्त डोक्यावर पगडी हा नॉर्म असेल तर "हरभजसिंगने" काय घोडे मारलेय ? [ तसा तो पण थोडा अर्धवट आहे म्हणा पण तो आपला विषय नाही.]

आता आम्ही सावरुन बसतो, डोक्याने अधु ब बुद्धीने अर्धवट असलेला "हॅप्पी" त्याच्या अंगच्या गुणामुळे काही तरी धमाल उडवुन देणार व ज्यासाठी आपण एवढे रुपडे मोजले तो "अफाट विनोदी शिन्स" पहायला भेटणार ...
पण नाही। सगळे मुसळ शेवटी केरातच !

पण मुळात गुंडगिरीला विरोध असणारा हॅप्पी हा किंग झाल्याझाल्या एकदम "बापु, भय्या, अम्मा, महाराज" टाईप वागायला लागतो व कुत्र्याचे वाकडे शेपुट सरळ [ म्हणजे त्या गुंडांना सुधरवायच्या ] करायच्या मागे लागतो। त्याला संधीही तशी मिळते. आरंभीच्या त्याच्या ऑस्ट्रेलियात हलाखीच्या काळात म्हणजे जेव्हा " लक्की खाऊ घालीना व पगडी भीक मागु देईना" अशी परिस्थीती असते तेव्हा त्याला मदत करणार्‍या [ फुलाचे दुकान चालवणार्‍या ] एका बाईच्या पोरीच्या सुखासाठी एक नवे नाटक तो उभारायचे ठरवतो. त्याच्या सुदैवाने [ व आपल्या दुर्दैवाने] ती कन्या म्हणजे खुद्द "सोनिया" निघते। आता बोला ! काय बोलणार, ती तर पटकथेची मागणी, आपण हाताची घडी आणि कपाळावर बोट. त्यात भर म्हणुन ती बरोबर आपला बॉयफ्रेंड "पुनीत [ रणवीर शौरी , तोच तो थप्पडखाऊ अभिनेता. आठवा "अग्ली & पग्ली ". जाऊ दे, कशाला आठवताय, फुकट डोक्याला शॉट ] यालाही बरोबर आणते. मग त्या [ पुर्वाश्रमीच्या श्रीमंत ] बाई ची इज्जत जाऊ नये म्हणुन हा नवा किंग अख्ख्या गँगला एका पोरकट खेळात ओढतो व अख्ख्या पिक्चरचा खेळखंडोबा करतो.

इथुन पुढे मी माझे [ पगडी नसलेले ] डोके चालवण्याचा व वापरण्याचा निष्फळ प्रयत्न सोडला व "दाखविले किंगे तैसेची पहावे, चित्ती असु द्यावे असमाधान" ह्या उक्तीनुसार पुढचा चित्रपट पाहिला ...

नंतर जो प्रेमाचा त्रिकोण आणि त्यासाठीचा त्याग असा भंपक ड्रामा, जिकडे तिकडे फक्त सिंगच , किंग म्हणून कोणीच नाही, सोनिया आणि पुनितचं प्रेमप्रकरण व त्यात हॅप्पीच्या हितचिंतकांची लुडबुड व त्याला हॅप्पीने फटकारणे, काही अगम्य आणि अतर्क्य घटनातुन किंगच्या इरसाल आणि अस्सल गुंड साथ्यांचे मानसीक परिवर्तन, सोनियाला सच्च्या प्रेमाचा साक्षात्कार व तिच्या लग्नाच्या वेळी गोंधळात तिचे गडबडीने तिचा हॅप्पीशी होणार विवाह व तिनेही खेळकरपणे याला दिलेली मान्यता हे विनोद, प्रसंग मला नाही झेपले। मात्र ह्या घोळात पिक्चर "झोपला" हे नक्की ...शेवटी तर असा गोंधळ उडतो की "किंग" कुठेच दिसत नाही , सगळीकडे फक्त आणि फक्त पगडीवाले "सिंग" च दिसतात.त्यामुळे आपली डोक्याची पगडी सटकुन सिनेमागॄहात कुठेतरी हरवते ...

शेवटी एकदाचा [ कसाबसा ] सिनेमा संपल्यावर आपण आपली अकलेची पगडी जी तिकीट काढताना मोठ्ठ्या सन्मानाने घातली होती ती आता कुठे हरवली याचा विचार करत चित्रपटगॄहाच्या बाहेर पडतो।

माझा चित्रपटाच्या दिग्दर्शकाला, निर्मात्यांना व कलाकारांना एकच छोटा प्रश्न आहे की " एवढा टाकाऊ, टुकार, भंगार पत्रा लोखंड, पाचकळ, पुचाट सिनेमा तुम्ही कशाच्या जोरावर हिट म्हणता ? पगडी न घालणार्‍या बिनडोक मिडीयाला हाताशी धरुन अवाढव्य उत्पन्नाचे आकडे तोंडावर फेकले की सिनेमा चांगला कसा ठरु शकतो ? पब्लिकचे [ विना पगडेआवाले ] डोके काय पेंड खायला जाते का एवढे उत्पन्न मिळवुन द्यायला ?"

तात्पर्य : हा "सिंग" नावाचा "किंग" आपल्याला चांगलाच "हिंग" लाऊन जातो ...

---[ विना पगडीवाला किंग ] छोटा डॉन

Tuesday, August 5, 2008

प्रसिद्धी : जालकवींच्या कविता: एक आवाहन

ह्या कार्यक्रमाची मुळ संकल्पना " श्री. मिलिंद भांडारकर व श्री. चक्रपाणी चिटणीस" ह्यांची आहे.त्याला पाठिंबा व शक्य ती मदत म्हणुन आम्ही त्यांचे "निवेदन" जसे आहे तसे आमच्या ब्लॉगवर प्रकाशित करत आहोत ह्याची नोंद घ्यावी ....

धन्यवाद !

*******************************************************************

प्रसिद्धी : जालकवींच्या कविता: एक आवाहन

आरंभ: १४/०२/२००९ - ०९:००
समाप्ती: १६/०२/२००९ - २२:००
ठिकाण: सॅन होजे, कॅलिफोर्निया
माहितीचा स्रोत: मिलिंद भांडारकर व चक्रपाणी चिटणीस
.
सॅन फ्रान्सिस्को बे एरिया या आंतरजालाच्या उगमस्थानी होणाऱ्या पहिल्यावहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनात "काहीतरी वेगळे" स्वरूपाचा एखादा मराठमोळा कार्यक्रम आणि त्यानिमित्ताने आंतरजालीय साहित्याशी रसिकांची ओळख करून देणे या हेतूने मिलिंद भांडारकरांना सुचलेल्या एका कल्पनेला मूर्त स्वरूप देण्याच्या उद्देशाने हे आवाहन करीत आहे. याबाबतीत संमेलनाच्या संयोजकांशी प्राथमिक बोलणे झाले असून तुमच्याआमच्यासारख्या हौशागवशा जालकवी,जालसाहित्यिकांकडून मिळणाऱ्या प्रतिसादावर कार्यक्रमाचे यश अवलंबून असणार आहे.


कार्यक्रमामागील भूमिका:
आंतरजाल लोकप्रिय झाल्यानंतर प्रकाशनाच्या विविध संधी सहज उपलब्ध झाल्याने साहित्याची लोकाभिमुखता वाढली. मुद्रित साहित्याबरोबरच आणि प्रसंगी त्यापेक्षाही अनुदिन्यांवर प्रकाशित केलेले साहित्य अधिकाधिक लोकांपर्यंत सहज पोहोचू शकते. अद्याप मराठी साहित्यात हे आमूलाग्र परिवर्तन जरी दिसत नसले, तरी मराठी प्रकाशनाची वाटचालही त्याच दिशेने होत आहे, हे स्पष्ट आहे. मराठी अनुदिन्यांच्या संख्येत गेल्या दोन वर्षांत झालेली अमाप वाढ ही त्या वाटचालीचीच निदर्शक आहे. याकडे दुर्लक्ष करणे, किंवा ही वाटचाल थांबवण्याचा प्रयत्न करणे म्हणजे नवीन युगातील मराठी साहित्याच्या प्रसाराला खीळ बसण्यासारखे असेल. हा कार्यक्रम म्हणजे, मराठी साहित्याच्या भविष्याची नांदी.


कार्यक्रमाची रूपरेषा:
एकूण २-३ तास. काव्यवाचन आणि काव्यगायन. फक्त त्यातल्या कविता कुठल्याही पुस्तकांत, मासिकांत, किंवा वर्तमानपत्रात - अर्थात मुद्रित स्वरूपात - प्रसिद्ध झालेल्या नाहीत/नसतील. ह्या कविता फक्त अनुदिन्यांवर आणि इतर मराठी संकेतस्थळांवर प्रसिद्ध झालेल्या असतील.कवींची नावे / टोपणनावे देखील जालाबाहेर फारशी प्रसिद्ध नसतील.काव्यवाचन आणि काव्यगायन करणारे, आणि संगीत दिग्दर्शक देखील व्यावसायिक - "प्रोफेशनल" - नसतील.विडंबने चालतील. मात्र मूळ कविता आणि विडंबन दोन्ही जालप्रकाशितच हवे. तसेच, मूळ कवितेची निवड झाली, तरच तिच्या विडंबनाचीही निवड होईल; जेणेकरून दोन्हींचे एकत्र सादरीकरण व त्यायोगे अपेक्षित परिणाम साधता येईल.मदत हवी आहे:
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपल्या मदतीची आवश्यकता आहे.


आम्ही सर्व "जालकवींना" आवाहन करतो, की आपल्या ज्या कवितांचा ह्या कार्यक्रमात अंतर्भाव व्हावा असे आपल्याला वाटते, त्या आम्हाला विरोपाने (ई-मेल)पाठवावे (ई-मेल कृपया युनिकोडमध्येच ठेवा. कवितेसोबतच, तुमचे जाहीर करण्याचे नाव -टोपणनावही चालेल-, संपर्काचा ईमेल-पत्ता, आणि स्वत:बद्दल एक-दोन ओळी)जे जालकवी नाहीत, त्यांनी आपापल्या ओळखीच्या, आवडत्या जालकवींकडे हे आवाहन पाठवावे, इतर मराठी संकेतस्थळांवर, आणि स्वत:च्या अनुदिन्यांवर हे आवाहन प्रकाशित करावे, ही नम्र (पण आग्रहाची) विनंती.ह्या कार्यक्रमासाठी एखादे समर्पक नावही सुचवावे.आपापल्या कविता आम्हाला खालील पत्त्यांवर पाठवाव्यात.


मिलिंद भांडारकर (milind [DOT] bhandarkar [AT] gmail [DOT] com)चक्रपाणि चिटणीस (chakrapani [DOT] chitnis [AT] gmail [DOT] com)
([dot] ऐवजी ". ", आणि [AT] ऐवजी "@" वापरावे. )


आपल्या सर्वांच्या भरघोस प्रतिसादाची अपेक्षा आहे.
धन्यवाद!

Thursday, June 12, 2008

**** इंडीया-दी वन नेशन आणि धार्मीक, जातीय व प्रादेशिक अस्मिता ****


गेले काही दिवस मी अविनाश धर्माधिकारींचे "अस्वस्थ दशकाची डायरी" नावाचे एक अतिशय जबरदस्त पुस्तक वाचत होतो. आज ते पुस्तक संपुर्णपणे वाचुन, समजून व पचवून पुर्ण झाले. साधरणता १९८० ते १९९० च्या दशकातल्या देशाच्या सुरक्षेला धोकादायक घटना, सामाजीक आंदोलने, राजकीय उलथापालथ व या सर्वात सामान्य माणसाचा सहभाग ह्या सर्व बाबींचा अभ्यास धर्माधिकारींनी आपल्या नजरेतुन व जवळपास स्वत: त्या घटना जवळून पाहून अतिशय समर्पक पद्धतीने केला आहे. ह्या पुस्तकातला एक मुद्दा म्हणजे "भारत हे एक राष्ट्र आहे का ?" हा मुद्दा फ़ारच मनाला भिडला. आता तसे पहायला गेलो तर त्यांनी लिहलेले त्या "काळाला" सुसंगत असे होते पण आज घडणार्य्या विविध घटना पाहिल्या तर तो प्रश्न आज पण निर्माण होऊ शकतो असे मला काही क्षण वाटले. त्यातच "प्रादेशिक अस्मितेतुन" सुरु झालेली आंदोलने हा याचा उगम होऊ शकतो ही शक्यता नाकारता येत नाही.

१५ ऒगस्ट १९४७ साली मध्यरात्री १२ वाजता निम्मे जग झोपले असताना पंडीत नेहरुंनी "नियतीशी एक वायदा" केला होता तो म्हणजे " भारत हे अख्ख्या जगाला हेवा वाटेल असे एक महान राष्ट्र " बनवण्याचा. त्यासाठी त्यांच्यापासुन ते आत्तापर्यंत सत्ताधार्‍यांनी सच्च्या मनाने प्रयत्न केले असे जरी मानले तरी आजची परिस्थीती काही तरी वेगळेच सांगते आहे. मुळात एक लहान खंडा एवढा असणारा भारत हे "एक राष्ट्र" असणे ही संकल्पनाच अदभूत आहे. काश्मीरपासून कन्याकुमारी व गुजरातपासून ते ईशान्यपुर्व मिझोरम, नागालॆंड पर्यंत पसरलेला, एकंदरीत २८ सरकारमान्य भाषा व अनऑफ़ीशीयली १६०० भाषा बोलणारा, हवामानात प्रचंड विवीधता असणारा व प्रचंड सास्कॄतीक व वैचारीक विविधता असलेला भारत हे गेल्या "६० वर्षे एक राष्ट्र" म्हणून टिकून आहे हेच एक आश्चर्य मानायला हरकत नाही. भारत जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा "ह्या राष्ट्राचा डोलारा" किती काळ टिकेल ह्याबद्दल अनेकांना शंका होती व ती भारतीय जनतेने खोटी करुन दाखवली हे भारतीय "एकात्मिकेचे" यश मानायला हरकत नाही. स्वातंत्र्याच्या वेळी
जीन दिकसनने भविष्य सांगितले "भारताचे विभाजन लवकरच अनेक राज्यात होईल व भारताचे अनेक तुकडे होतील".
हेंन्री किसींजर म्हणाले " सध्या भारतात राहणाया पण मनात फ़ुटीर प्रवॄत्ती ह्या देशाचे विभाजन करतील".
त्यानंतर खरोखरच भारताला ह्या कसोटीला सामोरे जावे लागले. सर्वात आधी सरदार पटेलांनी "संस्थान विलीनीकरण" राबवून, १९४८ च्या रणात भारतीय सेनेने काश्मीर वाचवून व १९६२ च्या युद्धानंतर लालबहादुर शास्त्रींनी आपल्या प्राणाचे बलिदान करुन व इंदीरा गांधींनी काही कठोर निर्णय घेऊन व प्रसंगी आपल्या प्राणाचे बलिदान करुन ह्या देशाला " वन नेशन" म्हणून टिकवण्यात अनमोल योगदान दिले व भारत हा " वन नेशन " च राहिला . ह्यामागचे कारण म्हणजे ही सर्व आक्रमणे ही "परकीय" होती व भारताने त्याचा मुकाबला ह्या " वन नेशन" ने केला. पण आज आपल्याला ह्या "परकीय शक्तींची" जास्त भीती राहिली नाही अथवा फ़ारफ़ार तर जास्त काळजी करायची गरज नाही कारण "हा देश" त्यासाठी समर्थ आहे. सध्या देशासमोर मुख्य प्रश्न आहे तो नविनच उभ्या राहिलेल्या "प्रादेशिक अस्मिता , जातीय अस्मिता " ह्यासारख्या गोष्टींनी घेतली व परिस्थीती चिघळायला सुरवात झाली आहे.

आता मुळापासून अभ्यास करायचा म्हणजे बाहेरच्या शक्तींशी लढून त्यांचा यथायोग्य बंदोबस्त केल्यानंतर केल्यानंतर आपल्याला "सत्तेची पोळी भाजण्यासाठी" मुद्दे न राहिल्याने देशातील काही स्वार्थी राजकीय नेतॄत्वाने येथील काही "जातीय व धार्मीक असंतोषी" शक्तींना हाती धरुन एका नव्याच "वादाची " मुहुर्तमेढ रोवली व वेळोवेळी आपल्या "सत्तेची पोळी" भाजली. ह्या देशाची प्रमुख समस्या ही काही काळ "धार्मीक अस्मिता" ही होती. मग ती "हिंदु - मुस्लीम असो वा हिंदु - ख्रिश्चन वाद" ही असो पण ह्यामुळे ह्या देशाची एकात्मिका काही काळ धोक्यात आणली. मग हे हिंदुंचे "रामजन्मभुमी मुक्ती, रथयात्रा " आंदोलन असो वा मुस्लीमांचे "बाबरी मशीद , शहाबानो प्रकरण, समान नागरी कायदा, अल्पसंख्यक वर्गाला मिळणारे फ़ायदे असो वा शिखांचे स्वतंत्र खलिस्तान आंदोलन व त्यातुन झालेले ऒपरेशन "ब्यु स्टार" असो वा ख्रिश्चन मिशनयांची दुर्गम भागात चालणारी "धर्मांतर मोहीम" व त्याला विरोध म्हणून पडलेले काही मिशनयांचे खुन व त्यातुन निर्माण झालेली राजकीय महत्वकांक्षा असो ह्यातुन ह्या " वन नेशन" मधील जनता एकमेकांसमोर " शस्त्रे घेऊन" उभी ठाकली. ह्यामुळे भारतीय "एकात्मिकेला धोका" पोहचला. पण काहीश्या समंजस व हुशार नेतूत्वाने ह्या देशाचे तुकडे पडायची वेळ येऊ दिली नाही व ह्या सर्व घटनातुन तावून-सुलाखवून भारत राष्ट्र हे "वन नेशन" राहिले. ह्या प्रकारातील निरर्थकता लक्षात आल्यामुळे कदाचित सामन्य जनता ह्या प्रकारापासून दुर राहिल्याने आता काहिसे हे प्रश्न मिटले आहेत व त्यातुन "देश तुटण्याचा" धोका टळला आहे. आज शक्यतो सामान्य जनता अशा "धार्मीक समाजकंटकांना" आश्रय देईनाशी झाल्याने आपण समाधान मानायला हरकत नाही.

त्यानंतर काळ आला तो "जातीय आधारावर मांडल्या गेलेल्या असंतोषाचा", काही नेत्यांनी "जातीय आधारावर आरक्षण" ही कल्पना मांडून व ती राबवून आज पुन्हा देशाला यादवीच्या उंबरठ्यावर आणून ठेवले आहे. प्रारंभीच्या काळातील "मंडल आयोग" व त्यांनंतर झालेले दंगे, सध्या राबवू पहात असलेल्या "ओबीसी आरक्षणाची कल्पना" व त्यासाठी चालू असलेली लढाई व त्यातुन आज उभे राहिलेले " गुज्जर समाजाच्या हिंसक आंदोलन" व त्यासाठी त्यांनी वेठीस धरलेली सामान्य जनता ह्या काळजी करण्यासारख्या गोष्टी आहेत. त्याचा योग्य वेळी बिमोड केला नाही तर परिस्थीती चिघळायस वेळ लागणार नाही. सध्या "विमुक्त जाती व जमातींना" ऒलरेडी आरक्षण आहेच व आता "ओबीसी समाजाचा" प्रश्न जळता निखारा आहे व ह्यांच्या यशस्वी परिणांमांमुळे सध्या पुढारलेल्या मानल्या जाणार व उच्चवर्णीय वर्गाने म्हणजे ब्राम्हणांनी, मराठ्यांनी, ठाकुरांनी, पटेलांनी उद्या त्यांच्यासाठी "आरक्षणाची" मागणी केली तर आश्चर्य वाटायला नको. आज हे सर्व चलती नाणी आहेत हे पाहून "धार्मीक आरक्षणची" मागणी पुढे आली व ते लागू झाले तर आश्चर्यचकीत होऊ नका. सध्याच्या सरकारने आणलेला "सच्चर आयोग" ही त्याचीच नांदी आहे. ह्या सर्वांचा प्रमुख दुष्परिणाम असा की देशाच्या कल्याणासाठी एकत्र झटणाया सामान्य जनतेत ह्यामुळे एक "दुही" निर्माण होत आहे, त्यांची मने दुर जात आहेत, काही ठराविक वर्गाला चुचकारले जात आहे व काहींना उपेक्षीत ठेवले जात आहे हे भावना निर्माण होत आहे. थोडक्यात आधी "एक" असणारी मने आता "दुभंगली" जात आहेत. अशी दुभंगलेली मने जेव्हा देशाच्या विकासाठी एकत्र काम करतील तेव्हा त्यातुन निर्माण झालेला परिणाम केवळ शुन्य असेल. अशी दुभंगली मने देशाचा विकास करुन त्याला प्रगतीपदावर न्हेऊन त्याला "एक महासत्ता" बनवू शकत नाहीत हे लोकांच्या लक्षात येत नाही. समजा जरी लोक समजायला लागले तरी काही "हितशत्रू" बरोबर पुन्हा वाद निर्माण करतात ...
ह्या सर्व गोष्टींमुळे देशासाठी "विवीध पातळीवर काम" करणाया सामान्य जनतेच्या मनाच्या दोलनामय परिस्थीतीचा विचार कोणी करत नाही. ह्या देशाच्या सुरक्षेसाठी अणस्त्रे बनवणाया "अब्दुल कलामांच्या" मनात हा विचार येत नसेल का की आपण ज्या राष्ट्रासाठी झटतो आहोत त्या राष्ट्रामधील काही शक्ती आपल्याला व आपल्या जमातीला "उपरा" मानून त्यांच्या विरोधात शत्रे घेऊन त्यांच्या संहाराची भाषा बोलत आहेत, जेव्हा "युसुफ़ पठाण व इरफ़ान पठाण" हे हाती बॆट - बॊल घेऊन प्रतिस्पर्धी "पाकीस्तानी" संघावर तुटुन पडतात तेव्हा त्यांना वाटले की "अरे आपण ज्यांच्यासाठी आपल्याच जातीय भाईबंदाविरुद्ध उभे आहोत ते लोक आपल्याला उपरा मानतात" अशा परिस्थीतीत काय ? लियंडर पेस, सानिया मिर्झा ला वाटले की आपल्या धर्माबंधूंवर , धर्मगुरुंवर हल्ले होत असताना आपले ह्या देशासाठी खेळणे पटत नाही तर काय ? ह्या देशात काम करणाया हजारो मुस्लीम व ख्रीस्ती डॊक्टर्स, इंजिनीयर्सना हा देश आपला वाटला नाही तर त्यांच्या काम करण्यामागे "समर्पण" किती राहिल ? मागास आरक्षणाचा लाभ घेऊन आज देशाच्या यंत्रणेत मोठ्या पदावर काम करणाया अधिकायांना बाहेरचे "आरक्षण आंदोलन व त्यावर येणाया प्रतिक्रीया" याबद्दल काय वाटत असेल ? त्या परिस्थीतीत ते आपले काम पुर्णपणे "निष्पक्षपातीपणे" करतील का वा त्यांनी करावे का ? देशाच्या सुरक्षेसाठी सिमेवर बंदुकीच्या ट्रीगरवर बोट ठेऊन अहोरात्र उभे राहणाया विवीध जाती, जमाती मधल्या सैनीकांमध्ये दुहीची भावना वाढीस लागली तर काय ? तसे पहायला गेले तर ह्यांचा परिणाम त्यांच्या कामगिरीवर होणे अपेक्षीत नाही व मान्यही नाही. पण मी मानतो की आजूबाजूला घडणाया घटनांचा परिणाम निश्चितपणे त्यांच्या मनावर व पर्यायाने त्यांच्या "कामगिरीवर" होत असेल. अशा परिस्थीतीत आपला देश खरेच "एक वन नेशन" राहिल का ? याचा विचार आत्ताच परिस्थीती हाताबाहेर जाण्याआधी केला पाहिजे व काही तरी कठोर उपाय योजले पाहिजेत.

आता एक तिसरीच शक्ती आपले डोके वर काढू पहात आहे ती म्हणजे "प्रादेशिक अस्मितेचा" पुरस्कार करणायांची. भारतासारख्या एका मोठ्या देशात अनेक लोक राहतात, त्यांची संस्कॄती भिन्न आहे, भाषा भिन्न आहे, आचारविचार भिन्न आहेत. आपल्या जमातीची वा समुहाची ओळख टिकून रहावी यासाठी त्यांनी आपापल्या "संस्कॄती व मुल्यांची" जपणूक केली तर त्यात चुकीचे काही नाही पण पुढे जाऊन याचे परिवर्तन हे "प्रादेशिक अस्मितेत" झाले व हा प्रश्न संवेदनाशील झाला. भारताच्या विवीध भागात राहणाया "बंगाल्यांची अस्मिता, आसामी अस्मिता, मराठी अस्मिता , गुजराती अस्मिता [ हो, आता ही पण महत्वाची झाली आहे, लोकांनी निवडणूकी जिंकल्या त्याच्या जोरावर ] , दक्षिणेची वेगळी अस्मिता, युपी / बिहारची स्वता:ची वेगळी अस्मिता , वरच्या इशान्य भारताच्या जनतेची प्रादेशीक अस्मिता" असे अनेक आयाम या विषयाला मिळाले. जेव्हा व्यापार, व्यवसाय , नोकरीच्या निमीत्ताने ही लोक देशातल्या विवीध भागात पसरले व काही कारणाने तेथील लोकल अस्मिता व ह्या लोकांनी आपल्या बरोबर आणलेली स्वता:ची अस्मिता यांच्या संघर्षाची परिस्थीती निर्माण झाली व काही ठिकाणी "हिंसक आंदोलने" पहायला मिळाली. तसे पहायला गेले तर दक्षिण भारताचे पहिल्यापासून वरच्या भागात राहणाया व हिंदी बोलणाया लोकांशी पहिल्यापासून वाकडे होतेच, शक्यतो त्यांनी वरच्यांना "आपण उपरे आहोत" याची वेळोवेळी जाणीव करुन द्यायचा प्रयत्न केला. ७० च्या दशकात मराठी माणसाला त्याचे हक्क मिळवून देण्याच्या निमीत्तने उभारलेल्या आंदोलनातुन "मराठी अस्मितेची" नवी ओळख भारतला पटली व शिवसेनेसारख्या प्रादेशिक प्रश्नांवर उभ्या राहिलेल्या राजकीय पक्षांना राजकारणात चांगले दिवस येण्यास सुरवात झाली. तामिळनाडूत तर पहिल्यापासूनच "प्रादेशिक द्रमुक व अण्णाद्रमुक" ह्यांनी सत्ता आपल्याकडे ठेवली होती व कॊंग्रेस, भाजपा सारख्या राष्ट्रीय पक्षांना इथे पाय रोवायची संधी दिली नाही. त्यानंतर "आसामी अस्मितेच्या" निमीत्ताने आसामात झालेली हिंसक आंदोलने, आसु [ ऒल आसाम स्टुडंट युनियन ] सारख्या विध्यार्थी संघटना व त्यानंतर त्याचां राजकीय अवतार "आसाम गण परिषद" यासारख्यांनी पण "प्रादेशिक अस्मिता" जोपासली. सध्याच्या काळात सगळ्यात मोठ्ठी समस्या म्हणजे व्यापार व नोकरीच्या निमीत्ताने बाहेर गेलेल्या बिहारी / युपी जनतेने आपल्या बरोबर न्हेलेली आपली संस्कॄती व अस्मिता ह्यांचा तिथल्या लोकल अस्मितेशी झालेला संघर्ष. मग हे आसामात असो, महाराष्ट्रात असो वा दक्षिणेत असो ही एक राष्ट्रीय समस्या व्हायला सुरवात झाली, त्यातच त्यांच्या "नेत्यांनी" अनावश्यक विधाने व वाद निर्माण करुन ही परिस्थीती चिघळावली व ह्याचा परिणाम म्हणजे झालेली "हिंसक आंदोलने" व यासाठी वेठीस धरली गेलेली सामान्य जनता व विस्कळीत झालेले जनजीवन.प्रारंभी "मराठी माणसाचा विकास म्हणजे गुजरात्याच्या कानफ़ाडीत मारणे नव्हे" ही भुमीका मांडणाया राज ठाकर्‍यांना पण काळ बदलतोय म्हणून "बिहायांच्या थोबाडीत" मारण्याची कॄती करावी लागली व ह्या आंदोलनाला "प्रादेशिक द्वेशाची" एक वेगळी किनार मिळाली.ह्याचा त्रास पुढे कदाचित बाहेर राहणाया "मराठी माणसाला" होऊ शकतो ही शक्यता सध्या कुणीच जमेस धरत नाही....

आज परिस्थीती अशी आहे की ह्या "प्रादेशिक वादाला" बाजूला सारुन कुठलाही पक्ष "केंद्रात सत्तेची शिडी" चढू शकत नाही व त्यांना ह्या "प्रादेशिक पक्षांना" चुचकारावेच लागेल ...
अशीच परिस्थीती कायम राहिली तर आपण "इंडीया : दी वन नेशन " म्हणू शकतो का ???

"दी वन नेशन " म्हणजे काय नक्की ? नेशन म्हणाजे येथे राहणारे लोक, ह्या भारतात राहणारी १०० करोड जनता. ही नुसती १०० करोडाची गर्दी जमवून काही होणार नाही तर तिथे पाहिजे ह्यांच्यात "ऐक्याची भावना" , आपण एका "महाशक्ती असलेल्या समुहाचा भाग" आहोत ह्याचे समाधान देणारी भावना. अशी भावना निर्माण झाली की त्यांचे "शक्तीशाली गट" बनतात व हेच गट "हाच देश" पुढे न्हेतात. पण त्याच्यासाठी गरज आहे ती लोकांनी आधी " वन वेशन" ही संकल्पना आमलात आणण्याची ...
आपण सध्या भारताच्या "मिशन २०-२०" च्या मोठ्या मोठ्या गप्पा मारत आहोत, भारताला एक विकसीत राष्ट्र बनवायचा वायदा करत आहे पण ह्या गोष्टी भारत हा " वन नेशन" झाल्याशिवाय शक्य नाहीत .... विकास म्हणजे काय ह्याचेच सध्या कंफ़्युजन [वा फ़ारफ़ार तर अद्न्यान म्हणू शकतो ] आहे. विकास भारताच्या सर्वसामान्य जनतेने विदेशी ब्रॆंडेड कपडे घालून एका विदेशी कारमधुन जाऊन एका मल्टिप्लेक्स मध्ये आपल्या "फ़ॆमीली" सोबत "बर्गर खात व कोकाकोला पित" सिनेमा बघणे नव्हे. मोठेमोठे मॊल्स उभारले, सॊफ़्टवेअर कंपन्या सुरु झाल्या, फ़ारीनच्या कार भारतात आल्या, मोबाईलचे रेट कमी झाले, पर्यटन स्वस्त झाले म्हणजे विकास झाला असे नव्हे ....
विकास म्हणजे समुहातील प्रत्येक व्यक्तीच्या सर्जनशील शक्तींचा अविष्कार. ही प्रक्रीया आपल्या देशात चालू आहेच की, गेली ६०वर्षे यशस्वी पणे लोकशाही राबवून दाखवणारा, तंत्रद्न्यान व अन्नधान्याच्या बाबतील स्वयंपूर्ण, माउंट एव्हरेस्ट पासुन ते थेट अंटार्टीका व आता चांद्रस्वारी मोहीम आखणारा, एका वेळी १० उपग्रह यशस्वीपणे आकाशात सोडणारा, महापरम संगणक बनवणारा, माहिती तंत्रद्ब्यान क्षेत्रात एक महासत्ता असणारा, बाकीच्यानी नाही म्हतल्यावर स्वता:च्या दमावर अणूभट्टी उभारुन "पोखरणची अणूचाचणी" करणारा, वैश्विक शांतीचे धडे अख्ख्या जगाला देणारा, संगित आणि कलेची जगाला देणगी देणारा, देशाला "२०-२०" वर्ल्डकप जिंकून देणारा, बुद्धीबळ खेळाचा विशवविजेता असणारा असे कितीतरी चेहरे या विकासोन्मुख भारताचे आहेत.
पण त्याच्याबरोबरच "जातीयतावाद, धार्मीक दुही, प्रादेशिक अस्मिता जोपासणारा", सामाजिक व आर्थीक विषमता व दुही असणारा, उपलब्ध सोईंच्या विरतणात एकांगी, दारिद्र्य, अद्न्यान, बेकारी, मुलभुत शिक्षणाची दुरावस्था , भ्रष्टाचार यांनी बुजबुजलेला, हेही भारताचे चेहरे. याला आपण "विकासोन्मुख वन नेशन" म्हणू शकतो का ?

यातील बहुतेक प्रश्न सोडवायचे असतील व भारताला "एक आंतरराष्ट्रीय महासत्ता " बनवायचे असेल तर गरज आहे ती भारतीय जनतेने " वुई, दी वन नेशन" म्हणून उभे राहण्याची !!!

Friday, May 16, 2008

परवाच एका स्फोटात मेलो ...

परवाच एका स्फोटात मेलो,
पहिल्याच झटक्यात स्वर्गात गेलो,
स्वर्गात जाण्याचा एकच कायदा होता,
सरळ जगण्याचा हाच एक फायदा होता. -


स्वर्गात जाताच "टिळक" भेटले,
"नमस्कार" म्हणताच प्रसन्न हसले,


..... टिळकांनी विचारले.......
काय रे, स्वातंत्र्या नंतर बदलयं का काही?
म्हटलं , छे हो, सरकारच डोकं ठिकाणावर नाही,
तिथुन लगबगीने "सुभाषबाबु" आले,
विचारु लागले खाली नेमके काय झाले? -


मी म्हणालो, नेताजी काय काय म्हणुन घड्तय हल्ली
फक्त आमदारच म्हणतात चलो दिल्ली !!!
नेताजी ! आजही स्वातंत्र्यासाठी आम्ही रक्तच देतो
फक्त 'खुन' आमच असत आझाद कश्मीर होतो! -


तितक्यात....
दुरवर "सावरकर" दिसले म्हणुन धावलो,
म्हटलं 'तात्या', आज जन्मचा पुण्य पावलो ,
म्हणाले, सध्या तरी सगळ कसं निवांत आहे,
स्वर्र्गात "कांग्रेस" वाला नाही तर सगळं कसं शांत आहे -

त्यांनाच विचारल....
तात्या, इथे सध्या शिवराय कुठे हो राहतात?
म्हणाले, ते पहा सौधतुन आपल्याकडेच पाहतात!
छत्रपतिन्चा विजय असो, म्हणुन चटकन हात जोडले
पण घडलं भलतचं , ते माझ्यावरच ओरडले -


काय रे? कोण्या "जेम्स लेनने" म्हणे बत्तमिजी केल्ली
तुमची अक्कल, तेव्हा सांगा कोठे चरायला गेली? -
मान वर करायची हिम्मत नव्हती,
आणि महाराजांची नजर माझ्या वरुन ढळत नव्हती!


कबुल आहे महाराज, तुमची स्वप्न आम्हाला कळलीच नाही,
पैसा सोडुन आमची नजर, दुसरीकडे वळलीच नाही।
पण रक्षणकर्तेच लांडग्यांसारखे नेमके सावज हेरतात
ब्र म्हणयचा अवकाश, लगेच गाढवाचे नांगर फिरतात .

सगळे ऐकुन महाराजांच्या गालाचे कल्ले थरारले
आमच केविलवाण जगणं बघुन डोळ्यात पाणी तराराले
क्षणभर राजेपण विसरुन ते दु:खाने थाराथाराले
आणि मग आमचं असं वागणं बघुन रागाने बिथरले -


पाय लटपटले....
वाटलं आता, कम्बख्ति भरलिच म्हणुन समज,
चुकिची शिक्षा, गर्दन मारलीच म्हणुन समजपण,
मेलेल्याला मारायला ते 'खुर्चीतले' नेते नव्हते
न्याय-कठोर असले तरि ह्रुदय त्यांचे 'रीते' नव्हते .


म्हणले, नाव सांग फक्त, खाली जाउन समाचार घेतो,
सांगितलं खाली 'लोकशाहीत' प्रत्येकाचा विचार होतो
खाली आता न्याय बरेचदा विकत मिळतो,
आणि पैसेवाला दुसर्‍यांच्या जिवाशी खेळतो. -

फक्त एकच काळवीट मारले, म्हणत आपले माजोरडे नाक उडवतो,
कोणीही आपल्या गाडीखली गरिबानां चिरडतो
महाराजांनी मोठ्या मुश्किलीने, डोळ्यातल पाणी आडवलं
कळालं , हेच पातक आम्ही आयुष्यभर घडवल -

मान खाली घालुन तसाच पुढे गेलो............


अहो आश्चर्यम,स्वर्गात मला "औरंग्या" भेटला
म्हणे काफरांना मारुन तर स्वर्ग गाठला

"जिन्हा" सुध्हा होता तिथेच,
म्हणाला, लवकरच आमची संख्या इथे लाखावर जाईल
आणि मग स्वर्गाची सुद्धा फाळणी होईल -


डिसक्लेमर : ह्या कवितेचा "मुळ कवी अथवा लेखक" मला तरी अज्ञात आहे म्हणून त्याचे नाव देता येत नाही.मला ही कविता एका "ढकलपत्राद्वारे" आली व ती खुप आवडल्याने मी ती माझ्या "ब्लॉग" वर टाकत आहे।
कुणाला "मुळ लेखकाचे नाव" माहित असल्यास कळवावे, त्याच्या नावाचा उल्लेख करण्यात येईल व त्याच्या परवानगीने ही कविता इथे ठेवायची का नाही हे ठरवता येईल ...

Thursday, May 15, 2008

मी जर हा असतो तर : भाग २

ह्यावेळी मी मिपा कुटुंबियांवर लिहणार नसून एकंदरीत सामाजीक परिस्थीतीवर आपली छाप सोडणाऱ्या व्यक्तींवर लिहणार आहे...

मी जर कॉन्ग्रेसचा नेता असतो तर,
मी आपल्याला निवडणूकीत लोकांसमोर जायला कुठलेच विधायक कार्यक्रम उरले नाहीत का याचा विचार केला असता.
महात्मा गांधींनी स्थापन केलेया पक्षाची आपण लावलेली वाट पाहून व त्या बद्दल शरम वाटून राजघाटावर जाउन गांधींची क्षमा मागितली असती.
राहूलसाठी केलेल्या चापलूसकीमुळे आपली प्रतिमा बिघडत चालल्याबद्दल विचार केला असता. आरक्षणाच्या मुद्द्यावर एक ठाम भुमीका घेतली असती.
सत्तेसाठी आपण डाव्यांचे लाड करून देशाचे नुकसान करतो आहोत जे जाणून सत्तीला लाथ मारली असती व ताठ मानेने निवडणूकीला सामोरे गेलो असतो .....
******************************************************************************
मी जर राहुल गांधी असतो तर,
पहिल्यांद्या आपल्या भोवती असलेल्या चापलूसकांच्या चांडाळ चौकडीला लाथ मारून आपली जनमानसातील प्रतिमा सुधारली असती.
गांधी घराण्याच्या वलयाचा वापर देशाच्या व पक्षाच्या कल्याणासाठी केला असता. झालच तर स्वताच्या मनाने परिस्थीतीचा अभ्यास करून भाषणे दिली असती, सध्यासारखी नुसती वाचून दाखवली नसती.
दलितांबरोबर मिसळण्याचे नाटक बंद केले असते.
स्वताबद्दल पंतप्रधानपदासाठी उडणाऱ्या वावड्यांना आपण अजून तेवढे परिपक्व नसल्याचे नमूद करून पुर्णविराम दिला असता.
स्वताला आपण देशावर राज्य करणाऱ्या गांधी घराण्याचे युवराज नसुन देशाच्या कल्याणासाठी अनेक वेळा बलिदान करणाऱ्या गांधी घराण्याचा एक पुढचा सैनिक आहे असे समजावले असते....
********************************************************************************
मी जर भाजपा नेता असतो तर,
मी कुणा एकाचे नेतत्व मान्य करून पक्षबांधणीसाठी स्वताला वाहून घेतले असते.
उठसुठ गांधी घराण्यावर टिका करण्यापेक्षा आपल्या पक्षातल्या नाठाळांवर कसा काबू करायचा याचा विचार केला असता.
विरोधी पक्षाची भुमीका नुसती "विरोधासाठी विरोध " अशी नसते हे समजावून घेतले असते.
पुढच्या निवडणूकीसाठी आत्ताच तयारी सुरु केली असती व त्यासाठी जनतेच्या व देशाच्या कल्याणाचा एक कार्यक्रम लोकांसमोर ठेउन त्याआधारे निवडणूकांना सामोरे गेलो असतो.
पराभवानंतर मनाला लाजवेल असे आकांडतांडव केले नसते व विजयानंतर हुरळून पण गेलो नसतो ...
*********************************************************************************
मी जर गोपीनाथ मुंडे असतो तर,
महाजनांनंतर पक्षाला मी सोडून महाराष्ट्रात कुणीच वाली नाही ह्याचा गैरफायदा घेतला नसता.
पक्षाला उठसुठ ब्लॅकमेल केले नसते.
गडकरींशी एकदा काय आहे ते मिटवून शेवटी दोघांनी मिळून पक्ष पुढे न्हेला असता.
मिडीयाच्या व लोकांच्या मनात पाल चुकचुकेल अशी "जातीच्या आधारे पक्ष" काढण्याबद्दल हालचाल केली नसती....
*********************************************************************************
मी जर लालू प्रसाद यादव असतो तर,
उठसुठ कुणाला दमात घेण्यापेक्षा आपली भारतीय राजकारणात प्रतिमा "जोकर" कशामुळे झाली याचा विचार केला असता.
"राज ठाकरे" यांच्या घरासमोर "छटपुजा" घ्यायचा हट्ट टाकून ती सुधारलेल्या बिहारच्या भुमीत कशी घेत येईल यांसंबंधी विचार केला असता.
येवढी वर्षे सत्ता असुन आपण काहीच करू शकलो नाही याबद्दल शरम वाटून राजकारणातुन सन्यास घेउन स्वताच्या मालकीची मालकीची "गोपालनशाळा" काढली असती व राबडीला बरोबर घेउन मस्त धंदा संभाळला असता. आत्तापर्यंत पाळलेल्या साधू यादव सारख्या गुंडांचा वापर आपली गुरे सुरक्षीत ठेवण्यासाठी केला असता.
राज ठाकरेंवर टिका करण्याआगोदर "ते रस्ताने गेले तर लोक पाया पडतात व आपण रस्ताने चाललो तर लोक दगड का मारतात ?" याचा विचार केला असता ....
********************************************************************************
मी जर अबु आझमी असतो तर,
राज ठाकरेंना धडा शिकवायला थेट आझमगढहून २०००० माणसे आणण्यापेक्षा त्यांचे कल्याण तिकडेच कसे करता यीएल हे पाहिले असते।
समजा राजने त्या २०००० लोकां बरोबर आपल्या ही तंगड्या गळ्यात घालुन परत हाकलले तर कसे याचा विचार केला असता....
आपली लायकी काय आहे हे न समजता भैय्या चॅनेल्स वर अशा बेफाट मुलाखती दिल्या नसत्या.
परिस्थीती लै बिघडली व आपल्याला महाराष्ट्रात जाणे अशक्य झाले तर पोट कसे भरावे यासाठी प्लॅनिंग चालू केले असते....
**********************************************************************************
मी जर अमरसिंग असतो तर,
सगळ्यात पहिल्यांदा स्वताला अमिताभचा दत्तक भाउ, जयादिदींचा दत्तक कोणीतरी [ नवरा म्हणता येत नाही ना ] , अभिषेकचा दत्तक बाप, ऐश्वर्याचा दत्तक सासरा असे जाहीर करून टाकले असते. पुन्हा कुणी विचारले की बच्चन घराण्याशी तुमचा काय संबंध तर ही नाती त्याच्या तोंडावर फेकली असती.
त्यांच्यापैकी कुणाला साधी शिंक जरी आली तरी न्युज चेनेल्सना हाताशी घरून सगळे वातावरण पेटवले असते व राज ठाकरेच्या अटकेची मागणी केली असती.
उत्तर प्रदेशातली सत्ता गेलीच आहे आता लोकसभेत परिपत्य झाल्यावर पळायचे कुठे ह्याचा प्लॅन रेडी ठेवला असता.
कधीतरी वेळ काढून शिवसेनेच्या संजय राउतांबरोबर मिसळपार्ट्या झोडून "मी कसा मराठी संस्कृतीशी मिसळून राहतो " ह्याबद्दल न्युज चॅनेल्सवर अखंड बडबड केली असती.
थोडक्यात सध्या वागतो तसेच मुर्खासारखे वागलो असतो.....
***********************************************************************************
मी जर राज ठाकरे असतो असतो तर,
वर उल्लेख केलेल्या माकडांच्या चिडवण्याकडे लक्ष न देता आपले कार्य चालू ठेवले असते.
शिवसेनेशी न भांडता मराठी माणसाचा उत्कर्ष कसा करता यीएल हे पाहिले असते.
शक्यतो आपल्या आंदोलनात सामान्य माणसे भरडली जाणार नाहीत याकडे लक्ष ठेवले असते।
मराठी आणि मराठी माणसाच्या उत्कर्षाबरोबरच आपले कार्यकर्ते आलेल्या संधीचा गैरफायदा तर घेत नाहीत ना? ह्याची योग्य काळजी घेतली असती .....
*********************************************************************************
मी जर देवेगैडा असतो तर,
कोलांट्याउड्या मारण्यामध्ये आपला एक नवा जागतीक विक्रम झाला आहे असे गिनीस बूक वाल्यांना कळवले अस्ते व त्याची सगळीकडे जहिरात केली असती.
सध्या होणाऱ्या निवडणूकात पण ह्या विक्रमाच्या आधारे मते मागितली असती.
आम्हाला स्थिर सरकार द्या म्हणणाऱ्या लोकांना व पक्ष कार्यकर्त्यांना कर्नाटकच्या "विधानसौधेवरून" फेकून दिले असते.
समजा ह्या निवडणूकीत पराभव झाला तर मी पक्ष कार्यालयात "राईस सांबार" विकण्याचे दुकान काढले असते व शेजारी आपल्या मुलाला म्हणजे कुमारस्वामीला कॉफी व सिगारेट विकायची टपरी काधून दिली असती व दिवसभर गल्ल्यावर "फक्त कन्नड गाणी " ऐकत झोपा काढल्या असत्या.
समजा ह्या निवडणूकीत पराभव झाला तर मी पक्ष कार्यालयात संसदेत बसुन कामकाज चालू असतानाही झोपा कशा काढाव्यात ह्याचे खास वर्ग घेतले असतेस....
********************************************************************************
मी जर कुमार केतकर असतो तर,
सगळ्यात पहिल्यांदा राहुल गांधीच्या चापलूस गटाचे कायदेशीर सदस्यत्व घेतले आस्ते.
आपण जे मुर्खासारखी विधाने करतो अथवा लेख लिहतो त्यामागचे कारण म्हणजे आपल्याला लागलेला "म्हातारचळ" आहे का याचा विचार केला असता.
आपण खरेच निरपेक्षपणे लिहू शकत नाही हे ओळखून वर्तमानपत्राच्या सम्पादकपदाचा राजीनामा दिला असता.
कुठल्या संभेलना बोलावल्यास तेथे जाउन, आयोजकांबरोबर भांडणे काढून, कुढल्या जातीवर टीका करुन स्वताला पळून जायची वेळ येउ दिली नसती ...
लोक आपल्याला सुमार केतकर का म्हणतात याचाही अभ्यास केला असता.
******************************************************************************
मी जर संजय राउत असतो तर,
सामना हे फक्त शिवसेनेच्या बातम्याला वाहून घेतलेले वृत्तपत्र नव्हे हे दाखवून दिले असते.
ह्या गोष्तीमुळे आपल्या वर्तमानपत्राची प्रतिमा संध्यानंदसारखी होत आहे याची काळजी केली असती.
मराठी माणसाचे हित लक्षात घेउन राजच्या सभेचा पानभर वृत्तांत दिला असता.
दररोज शिवसेनेच्या विजयाबद्दल व विरोधकांच्या पराभवाबद्दल देमार बातम्या देउन स्वताचे हसे करून घेतले नसते.
एकेकाळी सामना हा मराठी माणसाचा मानबिंदु होता याची आठवण ठेवली असती ....
*******************************************************************************
मी जर न्युज चॅनेल्सवाला [ आजतक, स्टार न्युज इ. इ. ] असतो तर,
सर्वप्रथम आपले चॅनेल हे राष्ट्रीय नसुन फक्त बिहार, युपी साठी मर्यादीत असल्याचे जाहीर केले असते.
एक स्वतंत्र वेगळे चॅनेल्स काढून त्यावर अखंड महाराष्ट्र व दक्षिण भारत विरोधी बातम्यांचा रतीब चालू ठेवला असता.
देशाच्या समस्यांकडे लक्ष द्ययचे सोडून अमिताभची सर्दी, प्रिन्सचे खड्ड्यात पडणे, दी ग्रेट खलीचे भारतात आगमन अशा बातम्या जोमाने दिल्या नसत्या.
लै डोक्याला कटकट झाली तर बच्चनसाठी एक वेगळे चँएल, खलीसाठी अजुन एक वेगळे, ठाकरेविरोधी एक वेगळे, खड्ड्यात पडणाऱ्या मुलांसाठी वाहून घेतलेले एक वेगळे चॅनेल, राहूल गांधीच्या बातल्यांसाठी एक वेगळे चॅनेल , भुताखेतांच्या बातम्यांसाठी एक चॅनल अशी चॅनेल्सची रांग लावली असती.
हे सर्व होउन "आम्हीच कसे सबसे तेज व सच दिखाने वाले" याचा डांगोरा आख्ख्या जगात पिटला असता ....

Sunday, April 27, 2008

शौर्य : नितांतसुंदर चित्रपट


परवाच एक "इंडियन आर्मी" हा बेस असलेला नितांतसुंदर चित्रपट पाहण्याचा योग आला. सर्वसाधारणपणे हे असे चित्रपट म्हणजे रक्तरंजित, बटबटीत, टाळ्या घेणारे डायलॉग, प्रखर देशभक्तीचे सिन्स याने भरलेले म्हणजे थोडक्यात पैसावसूल असतात. पण "शौर्य" हा हटके आहे, हा कुठला युद्धपट नाही तर तो आहे बॉर्डर वर लढणार्‍या सर्वासामन्य सैनीकाची मानसिकता टिपणारा एक मस्त चित्रपट , भारतीय सैन्यदलाच्या काहीश्या काळ्याबाजूला उघड करणारा आणि तरीही पैसावसूल आणि हमखास पहावा असा ....

पिक्चरची सुरवात होते साधारणता मध्यरात्री चालू असलेल्या आर्मीच्या दहशतवाद्यांना हुडकन्यासाठी चालू असणार्‍या कोंबिंग ऑपरेशनपासून. तिथे अचानक गोळीबार होऊन आर्मीतल्या एका "मेजराचा म्हणजे मेजर राठोड यांचा मॄत्यु" होतो व त्याला मारण्याचा आरोप असतो त्याच्या हाताखालच्या एका अधिकार्‍यावर म्हणजे "कॅप्टन जावेद खान" वर. मग त्याचे कोर्टमार्शल सुरू होते. हा मुस्लीम असल्याने सर्व जण त्याला दहशतवादी ठरवून मोकळे होतात व त्याची शिक्षा सुनावण्यासाठी एका औपचारीक कोर्टमार्शल मिटिंगची वाट पाहतात ...

मग एंट्री होते एका आर्मीत पेशाने वकील असणार्‍या परंतु वॄत्तीने एकंदरीत गूलछबू व ऐशाआरामी तरूणाचा म्हणजे "मेजर सिद्धांत" ची, त्याला हे सर्व म्हणजे एक नसती कटकट वाटत असते. बळजबरीने ही केस त्याच्या गळ्यात मारली जाते व त्याला "कॅप्टन जावेद खान" चा डिफेन्स करण्यासाठी नेमन्यात येते. त्याला स्पष्ट सूचना असते की कही नाही ही केस आधीच सॉल्व झालेली आहे, शिक्षा ठरलेली आहे, तुझी वकीली म्हणजे फक्त एक फॉर्मालिटी आहे आणि त्याने पण ही परिस्थीती कबूल केली असते. आता ही केस मुळात मुस्लीम दहशतवादाशी निगडीत असल्याने सर्वजण त्याला त्याच्या जास्त खोलात न शिरण्याचा सल्ला देतात. पण जेव्हा हा त्याचा अशिलाला भेटतो तेव्हा त्याची मनाला सलणारी शांतता व त्याला दॄढनिश्चयी चेहरा त्याला एका विचारात पाडतो व तो ह्या केसचा मुळापासून तपास करण्याचा निर्णय घेतो. त्यादरम्यान त्याच्याकडून निष्काळजीपणाने एका रिपोर्टरला दिलेल्या एका मुलाखतीचा परिणाम त्याला त्याच्या वरच्या अधिकार्‍याक्डून झाडण्यात होतो. एकंदरीत सर्व वरिष्ठांची मानसीकता व ही केस दाबण्याकडे असलेली वॄत्ती पाहून त्याला नक्कीच कुठे तरी पाणी मुरते आहे याची खात्री पटते व याचा व्यवस्थीत तपास करायल सुरवात करतो ...

या केसशी संबंधीत व्यक्तींचा तपास करताना तो अनेकांची गाठ घेतो व त्यांच्याकडून सत्यपरिस्थीती जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. त्यात त्याला भेटतात त्या भागाचे सर्वेसर्वा असणारे अधिकारी म्हणजे "ब्रिगेडीयर प्रताप", ह्यांची त्याच्या झालेल्या संभाषनातून व वागणूकीवरून ते अतिषय उद्दाम, निष्ठूर, हेकट व मुस्लीमांविषयी अतिशय पूर्वगॄहधिष्ठीत असलली मानसीकता या गोष्टी समोर येतात. त्यानंतर त्याची भेट होते "मेजर राठोड" यांच्या पत्नीशी, तिच्या बोलण्यातून राठोडांचा असलेला एकसूरी, निष्ठूर व दिलेल्या आज्ञांचा कुठलाही विचार न करता त्याचे पालन करणाच्या स्वभावाची ओळख पटते, स्वता: राठोडाच्या पत्नी याला खूप कटाळलेल्या असतात व त्या एक तडाजोड म्हणून संसार करत असतात. राठोडांच्या मॄत्य नंतर त्यांच्या चेहर्‍यावर आलेली "मुक्तीची भावना" सिद्धांतच्या चाणाक्ष नजरेतून सुटत नाही. सर्वात शेवटी तो भेटतो "कॅप्टन जावेद खानच्या " आईला, तेथे त्यांच्या बोलण्यावरून व एकंदरीत त्यांच्या खानदानाच्या इतिहासावरून व जावेदच्या आत्तापर्यंतच्या कारकिर्दीच्या आलेखावरून त्याच्या राठोडांना मारण्यामागे एक वेगळे कारण असल्याची शंका सिद्धांतला येते व तो दिशेने तपास चालू करतो. शेवटी बरेच कोर्ट सिन्स झाल्यावर त्या हत्यकांडाचा खरा शोध लागतो आर्मीच्या कोर्टासमोर या सर्व गोष्टी मांडल्यावर योग्य तो न्याय होऊन चित्रपट संपतो ...
आता प्रश्न असा आहे की हा चित्रपट का बघावा ? याचे उत्तम म्हणजे राहुल बोससारख्या संयमी अभिनेत्याची पुन्हा एक उत्तम पेशकश , केके मेनन (ब्रिगेडीअर प्रताप) चा अभिनय तर उत्तमच. शेवटी ब्रि. प्रतापची साक्ष घेतानाचा त्याचा एक १० -१२ मिनीटाचा सलग संवाद आहे. एका संतूलित, सर्वं गोष्टी आपल्या पकडी खाली असायला हव्यात आणि आपण म्हणजे मुर्तीमंत शौर्य आहोत असं मानणार्‍या ब्रि. प्रतापचा एका दुखावलेल्या बापात आणि त्याच मुळे मुस्लीमद्वेष्ट्या अधिकारार्‍यात झालेला बदल दाखवणारा अभिनय, मनिषा लांबाचा नवा लुक , जावेद जाफरी कसलाही आचरटपणा न करता केलेला रोल, दोन-तीन आणि तीही समयोचित गाणी आणि शेवटचं शाहरूखच्या आवाजातील शौर्य क्या है तर एकदम झकास. ...

तर आता प्रश्न असा येतो की शौर्याचा याच्यशी काय संबंध ? आर्मीचे शौर्य जनरली हे रणात गाजवलेल्या पराक्रमाशी निगडीत असते पण इथे तर एक अधिकारी दुसर्‍या अधिकार्‍याची हत्या करतो, हेच का ते शौर्य ? होय, हेच ते, कुठल्याही परिणामाची पर्वा न करता सर्वसामन्य नागरीकांच्या कल्याणासाठी व त्यंच्या सौरक्षणासाठी कसलीही भिती न बाळगता जावेद ने आपल्या अधिकार्‍याला घातली गोळी हे शौर्य, कुठल्याही दबावाला बळी न पडता योग्य तपास करून जावेदची सुटका करणार्‍या व ब्रिगेडीयर प्रतापांना योग्य शिक्षा घडवण्यासाठी केलेल्या प्रयत्नातून मेजर सिद्धांअतने दाखवलेले शौर्य, हेच ते शौर्य !!!!

पिक्चरची पटकथा अतिशय उत्तम, मांडणी झकास, घेतलेले कलाकार अतिशय बॅलेन्स्ड ....

शेवटी "शाहरूख खानच्या" शौर्य म्हणजे काय हे स्पष्ट करणार्‍या एका गद्याच्या वाचना हा नितांतसुंदर चित्रपट संपतो ...
"शौर्य क्या है ?
थरथराती हुई धरती को रौंधती फौजींयोंकी पलटन का शोर,
या सेहमेसे आसमान को चिरता हुआ बंदूकोंकी सलामी का शोर,

शौर्य क्या है ?
हरी वर्दीपर चमकते हुए चंद पितल के सितारे,
या सरहद के नाम पर खिची हुई अनदेखी लकीरोंकी नुमाईशे ?

शौर्य क्या है ?
दुर खामोश उडते हुए परिंदे को भुंदनेका अहसास,
या गोलोंकी बरसात से पलभरमे एक शहरको समशान बनानेका अहसास ?

शौर्य !!!
बारूदसे धुंदले इस आसमान मे शौर्य क्या है ?
वादियोंसे गुंजते हुए एस गावमे मातममे शौर्य क्या है ?

शौर्य ,
शायद एक हौसला ,
शायद एक हिंमत,
हमारे बहूत अंदर ,
मजहबसे बनाये इस नारे को तोडकर किसीका हात थामनेकी हिंमत ,
गोलीयों के इस शोरको अपने खामोशीसे चिरनेकी हिंतत,
मरती-मारती इस दुनीयाने निहत्ते डटे रहने की हिंमत ...

शौर्य, आने वाले कल खातीर अपने हिस्सेकी कायनात को आज बचा लेने की हिंमत ...

Saturday, April 5, 2008

मिसळपाव पुणे खादाडी संभेलन - एक कल्पनाविलास : भाग १


डिस्क्लेमरः
लेखनातील पात्रे प्रत्यक्षातील असली तरी प्रसंग पूर्ण काल्पनिक आहेत, हे कळायला काही आईन्स्टाईनची बुद्धीमत्ता नको. लिखाणाच्या सोयीसाठी काही ज्येष्ठांचे उल्लेख एकेरी करावे लागले आहेत, त्याबद्दल क्षमस्व.
इथे वयाचा, ज्ञानाचा, सत्तेचा कसलाही मुलाहिजा राखला जाण्याची अपेक्षा करू नये. कुणी थट्टा केली तर आपल्या पगडीच्या झिरमिळ्या गळून पडतील असं वाटणार्‍यांना अगोदरच ही सावधगिरीची सूचना!!:))यासाठी "बेस" म्हणून "मिपा" वर लिहले गेले साहित्य तसेच त्याला पडलेले प्रतिसाद हा मसाला कच्चा माल म्हणून वापरण्यात आले आहेत तरी कोणी आमच्यावर "साहित्यचोरीचा आळ" घेऊ नये, तसे झाल्यास त्या निषेघांच्या खलित्यास केराची टोपली दाखवण्यात येईल असे आम्ही नमूद करू ईच्छितो ....

.

पुण्यातील "मिपा कट्ट्याच्या" उत्तुंग यशानंतर व त्याचसुमारास दिल्लीत गाजलेल्या व शिवसेनेच्या संजय राउतांनी आयोजीत केलेल्या "मराठमोळ्या खाद्यपदार्थाच्या मेजवानीच्या" पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा "मिपा कट्टा तोही खाद्यसंभेलनासगट [ म्हणजे थोडक्यात खादाडी ] म्हणजे ज्याची थीम मिसळपाव असेल असे संभेलन " भरवण्याची मागणी जोर धरू लागली. आख्या जगभरातून खरडींचा, व्य. निंचा व फोनचा तात्यांवर मारा सुरू झाला. शेवटी सर्वानुमते हा फस्कास कार्यक्रम आयोजीत करण्याचे ठरले. "काडीसम्राट छोट्या डॉनने" यावेळीही हा कार्यक्रम आयोजीत करण्यात पुढाकार घ्यायची तयारी केली पण मागच्या वेळेसचा त्याचा "काडी टाकून " पळून जाण्याचा अनूभव जमेस धरून त्याला "तू फक्त [ जमल्यास] हजर रहायचे बघ " म्हणून परस्पर टोलवण्यात आले. शेवटी "महामहिम तात्यासाहेब, 'धुरं'धर; महापराक्रमी असलेला देशमुखांचा छावा सर्वस्वी धमाल मुलगा , इनोबा ठाकरे , विजूभाउ, डॉक्टरसाहेब, पेठकर साहेब व कांदळकर काका " अशी कार्यकारणी ठरवण्यात आली...........

आता कट्ट्यासाठीचा कारभारीपणा आपल्याकडे आहे म्हणून तात्यांनी लगेच हा कार्यक्रम "ठाण्यातच" आहे असे समजून पुढची आखणी करायला सूरवात केली पण यामुळे मोठ्ठा गोंधळ होउन शेवटी चर्चा करून सर्वमान्य ठिकाणी संभेलन घेण्याचे ठरवले. त्यानुसार चर्चा सुरु झाली. सहाजीकच त्याला अनेक फाटे फुटले, तात्या; सृलाताई; पेठकरसाहेब व बाकी मुंबईकरांच्या मते हा कार्यक्रम केव्हाही "मराठी माणसाचा मानबिंदू असलेल्या ठाण्यात किंवा गिरगावात" घ्यावा तर इनोबांनी हा कार्यक्रम "गेली १०००० वर्षे मराठी संस्कृतीची जपणूक करणाऱ्या पुण्यात घ्यावा" अशी मागणी केली व त्याला आपसूकच आनंदयात्री, केशवसुमार, छत्रपती, चित्तर, विजूभाउ, मनस्वी, भुईनाळा, संजोपराव यांचा पाठिंबा लाभला. त्यामुळे विनोबांनी आपली मागणी मान्य न झाल्यास " कार्यक्रमामध्ये घूसून राडा करण्याची धमकी" दिली. याउप्पर छोटा डॉन, स्वयंभू, आर्य, अबब च्या मते हा कार्यक्रम "दक्षिणेत घेणे योग्य" कारण त्यानिमीत्ताने आपल्याला तेथेही हातपाय पसरता येतील. त्याबरोबर लगेच डांबिसकाका, प्राजू, सर्कीट, नंदन, बेसनलाडू, कोलबेर, टिंग्याच्या मते हा कार्यक्रम म्हणजे " मराठी संस्कृतीला सातासमुद्रापार न्हेण्याची सुवर्णसंधी " आहे म्हणून तो "यक्षनगरीत" घेणे चांगले असा त्यांचा प्रतिवाद सुरु झाला. "धमाल मुलाला" काय सगळेच सारखे होते त्यामुळे त्याने "कुठही घ्या बायलीला, आपण नक्की येतेओ" असे आश्वासन दिले. आता या घोळात "कार्यक्रमाचा बोऱ्या वाजतो काय ?" या शंकेने व कदाचित विनोबांच्या धमकीचा परिणाम असेल म्हणून तात्यांनी हा कार्यक्रम "पुण्यनगरीत होणार" असे जाहीर केले. शेवटी प्रत्येकाने समझोता म्हणून "पुण्यात" यायचे ठरवले. कांदळकार काका पण औरंगाबाद वरून येण्यास तयार झाले....
तरी शेवटी सृलाताईंनी "शी बाई, काय ते पुणे ? आमच्या मुंबईत रात्री २.३० ला चहा मिळतो, पुण्यात दुपारी २.३० ला मिळायची मारामार" असा सूर लावला. त्यावर भडकून धमाल व विनोबाने दिवसाच काय पण रात्रीपण कितीही वाजता आणि काय काय म्हणजे " कॉफी, ब्रेड बटर, सॅ॑डविच, सामोसा, पोहे, अ॑डा / चिकन बिर्याणी, ऑम्लेट, भुर्जी पाव, चिकन मसाला, चिकन कलेजी, कटलेट, लस्सी, प॑जाबी डिशेस, खर्डा-झुणका भाकरी आणि सर्व प्रकारच्या दारवा " असा आख्खा पुण्याचा रात्रीचा मेनू तिच्यासमोर आदळला. त्यावर सृला ने "मला पुण्याबद्दल असे म्हणायचे नव्हते, माझ्या विधानाचा विपर्यास झाला." असे म्हणने मांडून विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला व शेवटी "पुणे तिथे काय उणे ?" हे मान्य करून आपली काहीही हरकत नसल्याचे कबूल केले....

मागच्यावेळीस साध्य न झालेली गोष्ट म्हणजे "मिपाची मालकीण सर्वश्री अनुष्काभाभी" यांचा सहभाग या वेळी नक्की असेल असे तात्यांनी आश्वासन दिले त्यासाठी तात्यांनी तिला फोन केल्याची व ती "हो" म्हणाली याची खात्री पटावी म्हणून काही "फोटो" प्रसिद्ध केले. तर या कार्यक्रमाचे प्रमूख आकर्षण "अनुष्काभाभी" असणार ही जवळजवळ "काळ्या दगडावरची पांढरी रेघ " आहे अशी सर्वांची खात्री झाली.पण यात एक गोम होती, तात्यांनी " मी अनुष्काला आणतो पण या संपूर्ण कार्यक्रमासाठी बल्लवाचार्याची भूमिका सर्वश्री पेठकरकाकांनी संभाळावी " अशी अट घातली. त्यावर उसळून पेठकर साहेबांनी " आयला..... हे बरंय! आपण स्वतः अनुष्काच्या कुशीत आणि प्रभाकर पेठकर स्वयंपाक घरात काय? अन्याय आहे हा.... घोर अन्याय. थांबा... आता जेवण असे तिखट ज्ज्ज्ज्जाळ्ळ्ळ्ळ बनवून ठेवतो की दुसर्‍या दिवशी चांगलाच 'पश्चातताप' होईल. (पश्चातताप = 'मागून' होणारा ताप.)" अशी धमकी दिली. त्यावर "पुण्याच्या पेशव्यांनी" हा पश्चाताप कमी करण्यासाठी 'अस्सल बेळ्गावी लोणी (पिठ मिसळलेले का होईना!)' आणण्याचे कबूल केले.


*** शेवटी सगळ्यांच्यात "दिलजमाई" होउन शेवटी हा " कार्यक्रम पुणे मुक्कामी अनुष्काच्या उपस्थीतीत व पेठकरकाकांच्या हातून बनलेल्या मिसळीला साक्षी ठेउन होईल" असा फतवा जारी करण्यात आला.***


क्रमशः ...

Thursday, April 3, 2008

"वळू":- मराठी महासिनेमा ...

परवाच्या अतिशय छोट्या पुणे ट्रीप मध्ये "वळू" नावाचा अतिशय मोठा [ महान या अर्थी] सिनेमा बघण्याचा योग आला. त्याआधी "नेटवर" व वॄत्तपत्रातून याविषयी बरेच वाचले होते त्यामुळे सिनेमाबद्दल बर्‍याच अपेक्षा निर्माण झाल्या होत्या. यामुळेच कदाचित सिनेमाला जाताना तो एकदम तद्दन बकवास निघण्याची शक्यता वाढली होती कारण पुर्वानुभव ... पण नाही "वळू" खरच झकास आहे. खूप वर्षांनी एवढा सुंदर मराठी सिनेमा बघितल्याचे सूख लाभले ....
सिनेमाची पटकथा [ अथवा थीम ] = गावातल्या ग्रामदेवतेला वाहिलेला व आता मोकाट सुटलेला आणि डोईजड झालेला एक "बैल" पकडून त्याचा बंदोबस्त करणे. आता येवढी एका ओळीची स्टोरी असलेल्या सिनेमात हे दाखवणार काय हा प्रश्न पडू शकतो. पण बघाच ....

आता प्रथम मी जनरली आपण मराठी "अशा सिनेमाला का जात नाही ?" यासंमंधी थोडे स्पष्टीकरण देतो. काय आहे, मुळात सिनेमा आहे एका "वळू" वर, आजकालच्या "सो कॉल्ड सोफॅस्टीकेटेड मी मराठी" लोकांना "वळू" म्हणजे नक्की कोण हे माहित नसण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि समजा माहित असले तरी आजकालच्या "डायनॉसॉर, ड्रॅगन, ऍनाकोंडा, गॉडझीला" सारख्या महाअतिकाय व ग्लोबल जनावरांच्या जगात तुम्ही "वळू" सारख्या "गावठी व पुचाट प्राण्यावर [ सॉरी जनावरावर] कसला पिक्चर काढता ही शंका येणे रास्त आहे. दुसरे म्हणजे जर "वळू" दाखवायचा म्हणला तर तो तुम्हाला "लंडन, लॉस एंजलीस, पॅरीस, स्विर्त्झलँड" सारख्या मनमोहक ठिकाणी दाखवता येणार नाही तो तुम्हाला एखाद्या "मागास खेडेगावातच" दाखवावा लागेल मग असे मागास खेडेगाव व ते जनावर बघण्यासाठी आम्ही कशाला पैसे घालवू असे पण वातण्याची शक्यता आहे. अजून सांगायचे म्हटल्यास पिक्चरमध्ये कुणी बडा स्टार म्हणजे हॄतीक, सलमान, शाहरूख [ आता हा आला की त्यामागोमाग अख्खे बॉलीवूड व जमल्यास काही क्रिकेटपट्टू आलेच] नसल्यामुळे पिक्चरला "फेसव्यॅल्यु" नाही. बरं, पाहायला गेले तर त्याचा दिग्दर्शक कोणी "रामू, भंसाळी, फराह खान, बडज्यात्या वा घाई" मंडळीपैकी कोणी नसल्यामुळे पिक्चरला तेवढे "ग्लॅमर" पण नाही. आता हे सर्व नसतील तर ऑबविअसली मसाला , आयटेम साँग, मनोसोक्त हाणामारी , २-४ बेड सीन्स, काही टाळ्या मिळवणारे डायलॉक, जबरदस्त लोकेशन्स नाहित. आता या सर्व गोष्टी नसतील तर कशाला आम्ही खिशाला चाट लावून थेटरात पिक्चर बघण्याचा नतद्रष्टपणा दाखवू ?
आता तुम्हाला सांगतो "वळू" का बघायचा ते ...

पिक्चरमध्ये आहे एक "सरकारी वनअधिकारी [ अतुल कुलकर्णी ] " जो महाराष्ट्राच्या एका दुर्गम भागात एका खेड्यात इमानदारीने आपली ड्युटी करत असतो. त्याच्या अखत्यारीतल्या भागात असलेल्या एका खेड्यात एका मोकाट सुटलेल्या "वळू" ला पकडायची जबाबदारी त्याच्यावर येते. आत्तापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक कर्तबगारीची कामे केलेया स्वानंदला [ बाय द वे, स्वानंद हे त्याचे नाव ] हे असले फालतू काम म्हणजे त्याचा अपमान वाटतो पण "बॉस इज ऑलवेज राईट" या ब्रिदाला स्मरून तो या " कामगिरीवर" निघतो. निघताना त्याच्या लहान भावाच्या हट्टामुळे त्यालापण बरोबर घेतो. हा भाऊ म्हणजे "हौशी माहितीपट बनवणारा" असल्याने तो "वळू कसा पकडला ?" याचा माहितीपट [ पिक्चरच्या भाषेत डॉक्युमेंट्री ] बनवायचे सर्व साहित्य बरोबर घेतो. आता ही सर्व टीम निघाली आहे एका खेड्यात आणि ते तेथे पोहचून तिथल्या ग्रामस्थांची मदत घेऊन शेवटी एकदाचे त्या "वळूला पकडण्यात" यशस्वी होतात. अशी साधारणता थीम आहे पिक्चरची.
तसे पाहायला गेले तर स्टोरीत काहिच दम नाही पण खरी कमाल आहे ती "दिग्दर्शकाची" ...

कशी ? सांगतो ...
आता आधीच सांगितल्याप्रमाणे स्वानंदच्या भावाला "डोक्युमेंट्री" बनवाय्ची असल्याने तो "स्वानंद" तिथल्या ग्रामस्थांकडून वळूबद्दल माहिती मिळवण्यासाठी त्यांच्या मुलाखती घेत असतानाच्या प्रसंगाची "डॉक्युमेंट्री" बनवायचे हा भाऊ ठरवतो. पिक्चरची सुरवात होते या प्रसंगातूनच ... यातून दिग्दर्शकाने त्या डॉक्युमेंत्रीवाल्याचा समजूतदारपणा व उत्साह, ग्रामस्थांचा उत्साह; गडबड्; अज्ञान्; चौकसपणा, त्यांचे मानसन्मान; इगो; निरागसता हे सर्व गूण अगदी चपलखपणे दाखवले आहेत. "डॉक्युमेंट्री शूट" करताना दिलेल्या सूचना "माझ्याकडे बघा, लाजू नका, फक्त डूरक्याबद्दल बोला [ बाय द वे, "डूरक्या" हा पिक्चरचा हिरो पक्षी वळू ], असे वळून बघून बोला" केवळ अप्रतिम. यावर कडी म्हणजे ही "डॉक्युमेंट्री" आपल्या टीव्ही वर दिसणार या कल्पनेने प्रत्येकाचा त्यात चमकण्याचा प्रयत्न, दूसर्‍यावर कडी करण्यासाठी खेळलेल्या चाली, ही डॉक्युमेंट्री म्हणजे आपल्या समस्या सरकारला कळवण्यासाठीचे व्यासपिठ समजून भाबडेपणाने लोकांचे "विहरीतला गाळ काढा, रस्ते सुधारा, लायटीची व्यवस्था करा, शेताबद्दलच्या समस्या" मांडणे , समजा आपली लहान पोरगी ह्यात नाचलेली दिसली तर मोठेपणी तिच्यासाठी उघडणारी फिल्मसॄष्टीची दारे असा समज , त्यावर स्वानंदने फक्त "डूरक्याबद्दल बोला" असा दिलेला दम .... सारेच उत्तम, लाजबाब ... सगळ्यात मनाला भावणारी गोष्ट म्हणजे लोकांचा निरागसपणा ....
वळू पकडण्यासारख्या शूल्लक घटनेतून त्या छोट्या गावात जे "राजकारण घडते" व ते दिग्दर्शक्शाने ज्या ताकतीने दाखवले आहे त्याला तोड नाही. गावात २ मुख्य राजकीय फळ्या , १ म्हणजे सध्या "सरपंच" असलेया वयोवॄद्ध आण्णांची [ मोहन आगाशे ] व दुसरी म्हणजे गावातले "असंतुष्ट तरूण धडाडीचे नेतॄत्व" आबा. या दोघांचीही रोल जबरदस्त, त्यांची ऍक्टींग जबरदस्त, टायमिंग जबरदस्त. त्याचबरोबर या दोघांचे के कार्यकर्ते दाखवले आहेत ते तर अजूनच "अवली आणि भाबडे" त्याला जबाब नाही ....
सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पिक्चरमध्ये दाखवलेला वनअधिकार्‍याचा उत्साह, इंप्रेशन मारायचे त्याचे प्रयत्न, प्रत्येक गोष्ट एकदम सिस्टिमॅटीक पद्धतीने करण्याकडे त्याच असलेला कल, सरपंचांची प्रत्येकाला सांभाळून घेण्याची सवय, गावठी माधुरी दिक्षीत [ अमॄता सुभाषने या रोलमध्ये जान ओतली आहे ] व तिची प्रेमकहाणी , आण्णांचा विरोधक असलेल्या आबाचे त्यांच्यावर कुरघोडी करण्याचे प्रयत्न , गावातील अतिउत्साही कार्यकर्त्यांचे वळूला पकडसाठीचे प्रयत्न, त्यांची दिरंगाई व ढीली कार्यपद्धती, त्यांचा निरागस भाबडेपणा व अज्ञान आणि त्यांचे एकमेकावर असलेले प्रेम व आत्मियता यांचे चित्रण या सर्व गोष्टींचे उत्तम रसायन जमून एक मस्त पिक्चर बघितल्याचे सुख आपल्याला लाभते ...
सर्वात शेवटी एका माणसाचा उल्लेख केला नाही तर त्याच्यावर अन्याय होईल , तो म्हणजे गावातील एक खंदा कार्यकर्ता "जगन्या ". त्याची एकूण पळापळ, उत्साह, कार्यक्षमता या सर्व गोष्ती उत्तम रितीने त्याच्या रोलमधून दिसून येतात ...

"प्रत्येक मराठी माणसाने मरण्याच्या आधी हा पिक्चर बघावा" असा आदेश देणार्‍या व परमेश्वरावर विश्वास नसणार्‍या "श्रीराम लागूंवर" आमचा विश्वास नाही तरीपण आम्ही सांगतो "हा पिक्चर थेटरातच जरूर बघा ....".