आज फक्त २ गोष्टी काळजी करण्यासारख्या आहेत ......
एक म्हणजे तुमची तब्येत चांगली आहे का तुम्ही आजारी आहेत ?
जर तुमची तब्येत ठणठणीत असेल तर मग काळजी कशाची करता, मस्त जीवनाचा आनंद घ्या .......
पण जर तुमची तब्येत बरी नाही, तुम्ही आजारी आहात तर तुम्हाला २ गोष्टींची काळजी करायला हवी.....
एक तर तुम्ही बरे व्हाल का आजारपणातच मरून जाल ?
जर तुम्ही बरे होणार असाल तर काळजी करण्यासारखे काही नाही.........
पण जर तुम्ही आजारपणातच मरण्याची शक्यता असल्यास तुम्हाला काळजी करण्यासारख्या २ गोष्टी आहेत.....
त्या म्हणजे तुम्ही स्वर्गात जाल की नरकात ?
जर स्वर्गात गेलात तर त्यासारखे उत्तम काहीच नाही ........
आणि समजा चुकून नरकात गेलात [ जातालच ना ....] तर तुम्ही तुमच्या जुन्या मित्रांना भेटण्यात येवढे मग्न व्हाल की तुमच्याकडे काळजी करण्यासाठी वेळच ऊरणार नाही.........
तेव्हा काळजी सोडा आणि मस्त जीवनाचा आनंद घ्या !!!!!!!
Monday, December 3, 2007
काळजी करण्यासारखे काय आहे त्यात ???
Posted by
छोटा डॉन
at
1:20 AM
Subscribe to:
Post Comments (Atom)

0 comments:
Post a Comment