सूहासने एक दणदणीत अणि मुद्देसुद प्रतिसाद देऊन ह्या विचारवंतांच्या धोतरालाच हात घातला व अवलियाशेठनी त्यांच्या निषेधाद्वारे ह्यांच्य वर्मावरच घाव घातला.
त्याच पार्शभुमीवर आम्ही ४ ओळी खरडल्या आहेत, मुळ प्रेरणा हे "मंगेश पाडगावकरांची एक कविता" ...
जे आहे ते गोड मानुन घ्या ... ;)
********************************************************
- (राडेबाज) छोटा डॉनयांच असं का होतं ते कळतं नाही
किंवा ह्यांना कळतयं पण वळत नाही ?
नव्या रक्ताचे सुशिक्षीत युवक
'नवनिर्माणासाठी' जमणार,
चर्चा, निदर्शन, आंदोलन, निषेध
करीत प्रवाहात उरतणार !
यांच सुख नसतच मुळी
कधी ह्यांच्यासाठी,
एकच गोष्ट यांची असते
कपाळावर आठी !
कधीसुद्धा यांचा संयम ढासळत नाही
यांच असं का होतं ते कळतं नाही
किंवा ह्यांना कळतयं पण वळत नाही ?
'मराठी अस्मिते'चे बोला तुम्ही
यांना नैतिक त्रास होतो.
'जय महाराष्ट्र' म्हणल्यावर यांना
देश तोडल्याचा भास होतो ?
यांचा धोशा सुरु असतो
'रस्त्यावर उतरणं वाईट,
त्यानं ट्राफिक ज्याम होतं !
आंदोलनं मुळीच करु नका,
त्याने सामान्यांचं जीणं हराम होतं !
क्रांत्या-बिंत्या सगळं झुट,
त्याने करदात्यांना वैफल्य येतं! '
संयमाचे पुतळेच हे
यांच रक्त चुकुनही सळसळत नाही !
यांच असं का होतं ते कळतं नाही
किंवा ह्यांना कळतयं पण वळत नाही ?
सगळेच कसे ऑफिसातुन
लंबेचौडे तात्विक लेख लिहणार ?
किंवा हातामध्ये गीता घेऊन
'चिंता विश्वाची' करीत बसणार?
पांढरपेशी सुखवस्तु कोष झुगारुन कोणी
अन्यायाविरुद्ध उभारतचं ना ?
हातात फलक घेऊन जयघोषात
रस्त्यावर उतरतंच ना?
असं काही दिसलं की
यांच माथं भनकलचं,
यांच्या वैचारिकतेचं गळु
अवघड जागी ठणकलचं !
वांझोट्या शाब्दिक चर्चांचं यांच्या
वेगवाग घोडं असतं !
पण यांना समविचारी भेटतात कसे
हे एक कोडं असतं ?
या कठिण कोड्याचं उत्तम मात्र मिळत नाही
यांच असं का होतं ते कळतं नाही
किंवा ह्यांना कळतयं पण वळत नाही ?
कसल्याही राड्याला
हे सतत भीत असतात
एरंडेल प्यावं तसं
आयुष्य पीत असतात
एरंडेल प्याल्यावर
आणखी वेगळं काय होणार ?
एकच क्षेत्र ठरलेलं
दुसरीकडे कुठे जाणार ?
कारण आणि परिणाम
यांच नातं टळत नाही
यांच असं का होतं ते कळतं नाही
किंवा ह्यांना कळतयं पण वळत नाही ?
5 comments:
एकदम बरोबर छोटा डॉन भाऊ. स्वतः काही करायचं नाही अन दुसरे कोणी करतायत तर त्यालाही नावं ठेवायची. अबू टेररिस्ट बरोबर अशा स्वतःला मराठी म्हणवणाऱ्या लोकांचाही धोका आहेच मराठीच्या प्रगतीत.
raje hi misalpav.com website konachi aahe? tumhi tyachi link tumchya post madhhe sodata yacha tumhala kay fayada?
google page rank of your blog is 1 out of 10.
If this growth continues definitely you will beat MARMIK- by sena like magazine one day.
Guide me also.
BEST LUCK!!!!!!!!
chota don
"who is it"
he vakya ka engrajit....
@ प्रविण आणि ओंकार :
धन्यवाद मित्रांनो ...
@ चैतन्य :
मित्रा, तु ब्लॊगवरचे लेख वाचतोस की ब्लॊगवरचे इतर बिगरमहत्वाच्या गोष्टी पहात बसतोस ?
ते इंग्रजीतले मराठीत का बदलावे ह्याचे स्प्ष्टीकरण देऊ शकशील ?
Post a Comment