सध्या म्हणे क्रिकेटचा विश्चचषक सुरु आहे आणि त्यात "भारत" म्हणे आघाडीचा दावेदार आहे, आम्ही हे क्रिकेट वगैरे पहातो अशातला काही भाग नाही पण उगाच काहीबाही ४ लोक बोलतात ते आमच्या कानी पडते व त्यावर आम्ही ( कधीमधी ) भाष्य करत असतो. मुळात इन मीन ८-१० (रिकामटेकडे) देश आपला वेळ जात नाही म्हणुन दिवस दिवस जो निरर्थक खेळ खेळतात त्याच्या चक्क विश्वचषक स्पर्धा ?
नाही, मी मान्य करतो की एकुण १०० च्या आसपास देश म्हणे ह्या "आय सी सी ( ही आमच्या पवारकाकांची बरं, नाद नाय करायचा )" शी संलग्न आहेत, पण त्याने कुठे खेळ मोठ्ठा होतो का ? बरं, ह्या १०० तले किती देश नुस्ते नाममात्र क्रिकेट खेळतात हा दुसरा मुद्दा, उरलेल्या मन लाऊन खेळणार्या देशांमध्ये ( बरं का, ह्या देशांमध्ये जनरली पॉलिटिशियन जन्तेला चुना लावत असतात व त्यांचे लक्ष ह्या मुद्द्यांकडे जाऊ नये म्हणुन क्रिकेटसारख्या रिकामटेकड्या खेळाला इथे उगाच प्रमोट केले जाते ) मेन ४ देश आशियातलेच ( किंवा भारतीय उपखंडातले, त्यातले ३ म्हणजे स्वातंत्र्यापुर्वीचा भारत, आता बोला) आहेत आणि एकुण उत्पन्नामधला निदान ८०% भाग इथुनच येतो, आता पैसा आला की प्रमोशन आलेच व म्हणुन असल्या स्पर्धेचा गाजावाजाही आला, असो हरकत नाही.
नाही, मी मान्य करतो की एकुण १०० च्या आसपास देश म्हणे ह्या "आय सी सी ( ही आमच्या पवारकाकांची बरं, नाद नाय करायचा )" शी संलग्न आहेत, पण त्याने कुठे खेळ मोठ्ठा होतो का ? बरं, ह्या १०० तले किती देश नुस्ते नाममात्र क्रिकेट खेळतात हा दुसरा मुद्दा, उरलेल्या मन लाऊन खेळणार्या देशांमध्ये ( बरं का, ह्या देशांमध्ये जनरली पॉलिटिशियन जन्तेला चुना लावत असतात व त्यांचे लक्ष ह्या मुद्द्यांकडे जाऊ नये म्हणुन क्रिकेटसारख्या रिकामटेकड्या खेळाला इथे उगाच प्रमोट केले जाते ) मेन ४ देश आशियातलेच ( किंवा भारतीय उपखंडातले, त्यातले ३ म्हणजे स्वातंत्र्यापुर्वीचा भारत, आता बोला) आहेत आणि एकुण उत्पन्नामधला निदान ८०% भाग इथुनच येतो, आता पैसा आला की प्रमोशन आलेच व म्हणुन असल्या स्पर्धेचा गाजावाजाही आला, असो हरकत नाही.
आता तुम्ही म्हणाल की काही आफ्रिकन आणि इतर अरबी देश क्रिकेट खेळतात आणि शिवाय ऑस्ट्रेलिया, न्युझिलंड आणि खुद्द इंग्लंडचा पण संघ इथे खेळतो.
अरबी देशांचे काय हो, त्यांच्याकडे मनोरंजन व्हावे म्हणुन कोंबड्यांच्या झुंजी, उंटांच्या शर्यती पासुन ते थेट माणसांच्या ( पक्षी : विकत घेतलेल्या गुलामांच्या ) झुंजी लावतात, मग मला सांगा क्रिकेट खेळवणे ही काय त्यांना अवघड बाब आहे का ?
बाकी त्या शारजाच्या मैदानात मॅच पहायला जमलेले ( काळा गॉगलवाले) रसिक पाहुन आजही आम्हाला ह्या 'जंटलमेन गेम'चे आश्चर्य वाटते बरं.
( बाकी सध्या काही लक्ष्मीपुत्रांनी "आय पी एल" नामक स्पर्धेत असेच प्लेयर्स 'विकत' घेऊन ते आपापल्या गावात मनोरंजनासाठी खेळवणार असल्याचा घाट घातला आहे, ह्यावरुन एका कॅबिनेट मंत्र्याला आणि बीसीसीआय मधल्या एका दिग्गज आसामीचा गुल्ल व्हावे लागले ह्यावरुन आम्हाला ह्या स्पर्धेच्या 'स्पिरीट्'ची अंधुकशी कल्पना येते आहे, असो पण सध्या विषय तो नाही, नंतर ह्यावर सविस्तर भाष्य करु )
असो, भारताने म्हणे १९८३ साली ही स्पर्धा जिंकुन हा विश्वचषक भारतात आणला होता, नाही नाही, ही गोष्ट अभिनंदन करण्यासारखीच आहे त्याबद्दल वाद नाही, त्या संघाचे अभिनंदन आहेच.
अहो पण त्यानंतर त्या स्पर्धेत खेळलेले खेळाडु, मैदानात बाटल्या उचलायला असणारा दुय्यम खेळाडु, सपोर्ट स्टाफ, त्यावेळी मैदानाबाहेर गोळ्या-बिस्कीटे विकणारे ह्यापासुन ते थेट तो सामना झाडावर बसुन फुक्कट पाहणारे हे सगळेच आजकाल मिशीला तुप लाऊन 'क्रिकेट एक्सपर्ट' म्हणुन हिंडतात व काहीही मुक्ताफळे उधळतात ह्याचे आम्हाला मनोसोक्त हसु येते.
आणि बरं का, सन १९८३ नंतर दर ४ वर्षांनी आपल्या इथल्या जनतेला "विश्वचषक विजेते" होण्याची स्वप्ने दाखवुन जो बेमालुम चुना लावण्याचे कार्य इथल्या 'इव्हेंट मॅनेजर्स'नी हाती घेतले आहे त्याला तोड नाही.
असो, पैसा म्हटले की हे आलेच नै का ...
अजुन एक किस्सा सांगु का, मागच्यावेळी की नै आपण ना ( पक्षी : भारत ) पहिल्या फेरीतच धुळ खात गारद झालो ( भेंडी काय दमदार वाक्य होते हे ) असे एका पेप्रात वाचले होते, मग काय हो, धंदाच बसला की ह्या क्रिकेटवाल्यांचा. कारण ह्या पराभवानंतर भारत आणि पाकीस्तान ( ते ही आपले भावंड, पडले पहिल्याच फेरीत बाहेर ) मधले तमाम रसि भयंकर निराश झाल्याच्या बातम्याही आम्ही वाचल्या.
मग काय झाले तर एक गंमतच घडली, २०-२० नामक ह्या क्रिकेटचे एक छोटेसे पिल्लु जन्माला घालण्यात आले, त्याचाही अचान्क विश्वचषक भरवण्यात आला आणि त्यात ना भारत-पाकिस्तान ही 'फायनल' खेळवण्यात आली ( हो हो, खेळवण्यात आली हे बरोबर आहे ) आणि बरं का त्यात ना भारत जिंकला, पुन्हा इथे क्रिकेटचे रोपटे जोमाने फोफावले व पुन्हा पैशाच ओघ सुरु झाल. कालांतराने मग लोकांना हा '२०-२० नशेचा डोस' फार आवडला असे उत्पादकांचे मत झाले व त्यासाठी खास त्यांनी 'आय पी एल' नामक स्पर्धा दरवर्षी भरवण्याचे ठरवले, बघा लेको किती क्रिकेट बघताय ते................................. परफेक्ट बिझीनेस, नै का ?
असो, आम्ही एकदा लिहीत गेलो मी मुळ विषय हरवुन काहीतरी तिसरेच लिहण्याची आम्हाला ( राऊतांसारखी ) सवय आहे, सबब आता आम्ही 'बॅक टु विषय' येतो.
सध्या म्हणे क्रिकेटचा विश्चचषक सुरु आहे आणि त्यात "भारत" म्हणे आघाडीचा दावेदार आहे,पुन्हा असोच.
आमचा तसा ह्याला विरोध वगैरे नाही बरं का पण ह्या निमित्ताने जे 'रान पेटवले' गेले आहे ते पाहुन आम्हाला अंमळ काळजी वाटत आहे की ह्या आगीत आपले किती महत्वाचे विषय उगाच भक्षस्थानी पडणार आहेत.
ह्या महान देशातले लोक आता कामंधंदे सोडुन जिथे मिळेल तिथे क्रिकेट बघत बसणार आणि बाकीचे विषय आपोआप फाट्यावर मारले जाणार.
- आता युनियन बजेट, रेल्वे बजेट आणि अन्य घटना ह्याच कालावधीत घडतील व आपण आणि मिडिया (ह्यांना क्रिकेटचेही देणे नाही आणि बजेटशीही घेणे नाही, पैसा बोल्ता है साब ) ह्याकडे चक्क दुर्लक्ष करु.
- आता सरकारी कार्यालये, खासगी कचेर्या, इतर महत्वाच्या सेवा इथले कर्मचारी 'ऑनड्युटी' मॅच बघत बसणार व कामे तुंबणार
- जे लोक आधीच रिकामटेकडे आहेत ते आता चौकाचौकात टीव्ही लाऊन किंवा एखाद्या दुकानासमोर रस्त्यावर उभे राहुन मॅच बघणार, आरडाओरडा करणार व त्यामुळे काय नुकसान होते ते तुम्हीच सांगा, आम्हाला सांगण्याची इच्छा नाही.
- मार्च / एप्रिल म्हणजे परिक्षांचा सिझन हो, आता कसला अभ्यास आणि कसल्या परिक्षा ? मारुन मुटकुन अभ्यासाला बसवणे म्हणजे त्रासच ना ?
- मेन म्हणजे आता ह्या कालावधीत 'वेळ आणि सेवेची गणिते' धडाधड चुकणार
( ( आमची तक्रार नाही, आम्हाला केवळ गंमत वाटते हे आधीच कबुल करतो ) किस्सा पहिल्या दिवशीचा, शनिवारी दुपारनंतर आमच्या भागातली बहुसंख्य दुकाने उगाच बंद किंवा इनअॅक्टिव्ह झाली, इतर सेवापुरवठादारांनी हक्काची 'मॅच बघायची सुट्टी' घेतली, बाहेर निघालो असतो २-३ ठिकाणी रस्त्यावरच टीव्ही लाऊन भारत्-बांग्लादेश ह्यांच्यातले महायुद्ध(?) पाहण्याचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि जोशात चालु होता, त्यामुळे झालेल्या ट्रॅफिकच्या गमतीत आम्हाला उशीर झाला, नंतर एका हॉटेलात जेवायला गेलो असता तिथे चक्क मोठ्ठी स्क्रीन लाऊन सामने पहाणे चालु होते व सर्व सेवापुरवठा करणारे कर्मचारी ते पाहण्यातच व्यस्त होते, सामने पाहण्याचा त्यांचा मुलभुत हक्क मान्य केला तरी 'ऑनड्युटी' हे असे वर्तन आता अजुन ४० दिवस चालणार आहे का ? हे राम ! )
असो, उगाच जास्त वितंडवाद घालत नाही !
क्रिकेट हा एकेकाळी 'बघण्यालायक' खेळ होता, आम्ही बघयचो व तो आता 'बघवेना' असा झाला म्हणुन ही ४ वाक्ये.
बाकी ही सुरवात आहे.
आम्ही आमच्या ह्या आवडत्या खेळावर असेच भाष्य करत राहु, स्पर्धा अजुन ४० दिवस आहे म्हणतात
मध्यंतरी 'धोबीघाट' हा अत्यंत प्रगल्भ, सामाजिक जाणिवा असणारा, आंतरिक संवेदनांना हात घालणारा, आधुनिकोत्तर साहित्यात मानाचे पान असणारा असा लै भारी अभिजात सुंदर चित्रपट आहे असे ऐकले होते ( व म्हणुनच आम्ही तो पाहिला नाही हा भाग वेगळा ).
म्हणुनच आम्ही ही आमची लेखमाला "धोबीघाट" ह्या संकल्पनेच्या स्वरुपात सादर करणार आहोत व एकेका विषयाची मनोसोक्त धुलाई करणार आहोत.
पुढचे आकर्षण : 'धोबीघाट' विश्वविजेतेपदाच्या दावेदारांचा - भाग # १ : भारत
धन्यवाद !