Thursday, February 28, 2008

मी जर "हा" असतो तर ......... मिसळपाव स्पेशल




आमचे अजून एक कुटुंब आहे, www.misalpav.com

यावर आम्ही अगदी मोकाट सुटलेल्या जनावरासारखे हुंदडत असतो कारण ते आमच्यासाठी जणू दुसरे घरच आहे। तर अशा या मिसळपाववर सध्या आपुलकी व कौटुंबिक भावना , अगदी घरच्यासारखा वावर व जशी आपल्याला आपल्या घराशी वाटते तशी पारवारिक ओढ या भावना वाढिस लागल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे.....थोडक्यात काय तर , मिपा आता एक कुटुंब बनले आहे....

त्याच धर्तीवर माझा हा 'शेखचिल्लीची स्वप्ने ' पाहण्याचा प्रयत्न. समजा मी मिपा वरची कोणती दुसरी 'व्यक्ती' असतो तर काय केले असते याचे हे पूराण. याची प्रेरणा आम्हाला आमचे गुरु 'शिरीष कणेकर' यांच्या लेखनातून मिळाली. असो ......
यात कोणावरही मुद्दामून , तिरस्काराच्या हेतूने टिका केलेली नाही , फक्त मज्जा यावी म्हणून हा सगळा खटाटोप . तरी आपण सर्व सुज्ञ, माझा हा 'मुर्खपणा' आपल्या 'मिपा' चे 'धाकटे शेंडेफळ' समजून माफ करताल अशी अपेक्षा आहे....................

जर मी "तात्या " असतो तर , जागतीक मिपा संभेलन ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे भरवून त्यात 'अनुष्का' ला प्रमूख पाहूणी म्हणून बोलावले असते। 'प्रभाकर पेठकरांना' बल्लावार्यांची भूमिका देऊन सर्व कुटुंबाला 'सणसणीत मिसळपावची पार्टी ' दिली असती।वर्षातून एखादा दिवस तरी 'ह्याला माझा नमस्कार आहे, शतशा वंदन आहे, मी सांष्टांग नमस्कार घालतो' असे म्हणायचे टाळले असते।

पण मी 'तात्या' एवढा मोठा नाही ......
**************************************************************************************
मी जर "प्राजू" असतो तर सगळ्यांनी माझ्या वाढदिवसाला 'विश' केल्याचे लक्षात ठेऊन सगळ्यांना मस्त 'पार्टी' दिली असती [ त्यातल्या त्यात 'मिसळपाव' हा मेनू ठेवला असता] व 'पार्टी' झोडण्यात मग्न असलेल्या गाफील सदस्यांना पकडून 'एकरकमी कमीत्-कमी १० तरी नव्या चारोळ्या ' सुनावल्या असत्या ....

पण मी 'प्राजू' एवढा दिलदार व कवीमनाचा नाही.....

*************************************************************************
मी जर 'विनायक अनिवसे' असतो तर माझे नाव बदलून 'मी मराठी' ठेवले असते. एका नवीन 'मराठी भाषा पुनर्निमाण सेने' ची स्थापना केली असती. त्या सेनेचा जोरावर 'मुंबई' ही भारताची राजधानी व्हावी व भारताची राष्ट्रभाषा 'मराठी' व्हावी यासाठी अंदोलने केली असती. आपल्या बहूमताच्या जोरावर इथुन पुढे 'अमराठी लोकांना' मुंबईमध्ये प्रवेश करण्यास 'बंदी' असल्याचे विधेयक संमत करून घेतले असते।

याला जे लोक [भय्ये] विरोध करतील त्यांची माझ्या कार्यकर्त्यांच्या मार्फत 'टकूरी' फोडण्यास मागे पुढे पाहिले नसते।
पण मी 'विनायक' येवढा 'कट्टार मराठीभीमानी' नाही ........
*****************************************************************************************
मी जर 'डांबीसकाका' असतो तर आपल्यामुळे धमाल, छोटा डॉन सारखी पोर बिधडायला लागली हे ऊमजून 'मद्यप्राशन' सोडून दिले असते. 'मद्यप्राशनविरोधी जनजागरण अभियान' चलू केले असते. अख्ख्या अमेरिकेत मी ' मद्यपानाचे तोटे व टाळण्याचे सहजसोपे मार्ग' या विषयावर परिसंवाद आयोजित केले असते.....
आयुष्याच्या संध्येला मी 'माझे मद्यपानाचे प्रयोग'[गांधीजींच्या माझे सत्याचे प्रयोग च्या धर्तीवर ] नावाचे आत्मचरीत्र लिहले असते।त्यातून मी नवशिक्यांना 'ऊत्तमोत्तम कॉकटेल्स' कशी बनवावी याचे मार्गदर्शन केले असते..........
पण मी 'डांबिसकाकां' एवढा शौकीन नाही ......
************************************************************************************
मी जर 'धमाल मुलगा' असतो तर प्रथम माझे नाव बदलून 'ईब्लिस कार्टे' ठेवले असते. ठिकठिकाणच्या पोरांना पकडून 'जश्न - ए- बहार' चे बेत रचून ते तडीस न्हेले असते। 'डांबिसकाकांनां' च्या दारूबंदी अभियानात सामिल झालो असतो.मी 'मद्य रिचवायच्या उत्तमोत्तम पद्धती' यावर एक 'प्रेझेंटेशन दिले असते.
सरकारी हूकूम न मानता 'मार्च' मध्ये 'शिवजयंती' साजरी केली असती।
पण मी 'धमाल मुला' एवढा 'दिलखूलास नाही .......
***************************************************************************************
मी जर 'वरदा' असतो तर 'प्रेम म्हणजे काय?' ह्या वादात कधीतरी 'मुलांच्या' बाजूने विचार केला असता व 'प्रॅक्टिकल लाईफ' चा विचार न करता 'भावनेच्या' आधारे मुलांचे बरोबर आहे असा निर्वाळा दिला असता।
मी 'ऑफिसमध्ये काम नसल्यावर टाईमपास करायचे १०० उपाय' नावाचे पूस्तक काढले असते व तेच वाचून मस्त ताईमपास केला असता। मी टाईमपास करण्यासाठी माझी बदली 'बेंगलोरला' करून घेतली असती......
पण मी 'वरदा' एवढा 'मॅच्युअर' नाही ........
********************************************************************************************
मी जर सकाळचा 'आपला अभिजीत' असतो तर नियमाने दर आठवड्याला "नव्या नव्या सिनेमांची परीक्षणे" लिहली असती.कोणता सिनेमा कुठे पाहण्याचा लायकीचा आहे याबद्दल स्पष्ट मत व्यक्त करून 'भिकार सिनेमा' थेटरात पाहणार्‍या जनतेचे ऐसे वाचवले असते.मी 'तसल्या नजरा' सारखे लेख लिहून लोकात मस्त चर्चेचा बार ऊडवून मस्त मजा बधत बसलो असतो .....
पण मी 'अभिजीत' एवढा 'व्यासंगी व परिपूर्ण' नाही.......
**************************************************************************************
मी जर 'जुना अभिजीत' असतो तर दर १० दिवसाला माझे नाव 'अभिजीत , मोठा डॉन , जुना अभिजीत ' असे चेंज केले नसते।पुरंदर व लोहगडाच्या पायथ्याशी असलेल्या 'मिसळभक्षण यज्ञातून' वेळ काढून मिपा वर नवे नवे साहित्य प्रसवले असते....
पण मी 'अभिजीत' येवढा 'कट्टर मिसळप्रेमी' नाही ........
******************************************************************************************
मी जर 'स्वाती राजेश' असतो तर मस्तपैकी 'कूकिंग स्कूल' सुरु करून होतकरू लोकांना त्यांच्या जिभेचे चोचले पूरवण्यास मदत केली असती.आपले 'स्कील' सिध्ध करून 'संजीव कपूरच्या' पोटावर पाय दिला असता। कधीमधी मिपा परिवाराला आमंत्रीत करून मस्त मस्त स्वादिष्ट पदार्थ खाऊ घातले असते.
पण मी 'स्वाती राजेश' एवढा 'सिद्धहस्त' नाही .....
**************************************************************************************
मी जर " केशवसुमार" असतो तर माझ्या 'विडंबनांचे एक पूस्तक' प्रकाशित केले असते व नंतर त्या पूस्तकातील कवितांचे पून्हा 'विडंबन' केले असते।
मी एखादे तरी विडंबन शेवटी 'केश्या , किश्या ' असे नाव न घालता लिहले असते व लोकांच्या आग्रहास्तव पून्हा ते अद्ययावत केले असते.....
पण माझ्यावर 'केशवकुमारां' एवधी 'सरस्वतीची कॄपा' नाही .....
*****************************************************************************************
मी जर खरच 'छोटा डॉन' असतो तर मिपाच्या कौतुंबियांचा मनाचा मोठेपणा लक्षात घेऊन लेखाच्या सुरवातीस "कोणाच्या भावना दूखावण्याचा हेतू नाही " अशी सूचना केली नसती.ऊलट आमचे कोण काय बिघडवणार अशी दर्पोक्ती केली असती.

आपले नम्र शेंडेफळ
छोटा डॉन .......................

1 comment:

choti-tingi said...

आपण वरील ब्लॉगमध्ये आमची दखल न घेतल्याने आम्ही आपला जाहीर निषेध करीत आहोत ;)
अवांतर - ह्.घ्या. बाकी लेख जोरदार हाये....असेच अनेक येउ देत.