Sunday, March 2, 2008
आळस, कंटाळा व फिरंग्याची भेट !!!!
[ खालील रटाळ व निरर्थक लेख वाचून कुणाला कंटाल व आळस आल्यास त्याची जबाबदारी लेखकावर राहणार नाही. आपापल्या रिस्क वर वाचन करा अथवा सोडून द्या, कसे !!!]
आज एकदम काहितरी वेगळेच वाटत आहे, खूप कंटाळा आला आहे. काहिच करण्याची इच्छा होत नाहीये [ तसे नहितरी आम्ही दररोज काही तीर मारीत नाही, तरिपण ...]. मला वाटतं या सगळ्याचे कारण सोमवार असावं . पण सोमवारच का ? हा काही नोकरीतला पहिला सोमवार नाही , मग अशी अवस्था कशामुळे झाली याचा गुंता काही केल्या सुटत नाही ...
नोकरी लागल्यावर म्हणजे कंपनी जॉईन केल्यावर सुरवातीला ह्या सोमवारच्या दिवशी लै चिडचीड व्ह्यायची कारण ती मस्त सुट्टी घालवल्यावर इथे ऑफीसमध्ये सकाळी लवकर उठून झक मारण्याचा मूड नसायचा. तसे पाहायला गेले तर आम्ही 'सुट्टीच्या दिवशी' असे फार काही "रॉकिंग' करत नव्हतो पण मस्त वाटायचे, च्यायला मस्त पैकी सकाळी पहाटे १० पर्यंत पडून रहा , त्यांनंतर इठण्याची ईच्छा व अंगात ताकद असेल तर [ ही नसण्याला बऱ्याच गोष्टी कारणीव्हूत असायच्या जसे काही रात्रीची "जश्न-ए-बहार' , उगाच गावभर बोंबलत हिंदले, एखादा लेट नाईट शो व ह्य्यतले काही नसेल तर तासनतास रात्रभर त्या "एज ऑफ़ एंपायर किंवा क्रिकेटची गेम तर ठरलेली ] जास्तीत-जास्त तोंडावर पाणी मारून चहा-पोहा हादडायला जा , येताना पेपरची अख्खी चळत आणून रूमवर टाका व ती अख्खा रूमवर पसरून ठेवा , टीव्हीवर नावापूरता कुठला तरी भिकार सिनेमा अथवा तद्दन बाजारू गाणी लागलेले एखदे चॅनेल लावा व मस्तपैकी लोळत पडा , संध्याकाळी आपल्यासारखीच चांडाळ चौकडी जमवून पुन्हा तेच भटकणे इत्यादी इत्यादी ..... तसे पाहायला गेले तर या गोष्टीतही फार काही अर्थ नव्हताच पण एकदम मस्त वाटायचे .....
असो। तर खूप विषयांतर झाले. प्रश्न असा आहे की आज का आळस आला ? खरच आळस आला की मी स्वताच्या सोईसाठी तशी समजूत करून घेतली ? बर मग ही सोय तर कशासाठी ? ऑफीसमध्ये काम करायला नको म्हणावे तर इथे तसे काही मानेवर जू ठेवले नसतेच. वाटले तर करा अथवा निवांत पडा अशी आमच्या ऑफीसची अवस्था आहे [ तुम्ही म्हणाल मी काय "ऑन बेंच असलेला सॉफ्टवेअर प्रोफेशनल " आहे का ? नाही पण तसेही नाही ]. मला वाटते की या परिस्थीतीचा जरास्सा 'डिटेलवारी आभ्यास करावा" म्हणजे थोडा मूड पण फ्रेश होईल आणि टाईमपास पण होईल ....
तर कालच्या दिनक्रमाप्रमाणे साधारणता ९ वाजता उठल्यावर [ न उठून काय करता ? काल मॅच ना फायनल - भारत वि. ऑस्ट्रेलियाची, सचीन ने काय चोपाला राव ... हाना तिच्यायाला ] जी टीव्ही समोर मांड ठोकली [ म्हणजे गादी टाकून पसरलो ] ते थेट मॅच संपल्यावर चहा पियायलाच उठलो. मधीच 'चाट ' खायची लहेर आल्यामुळे रूमवरच मस्त 'रगडा पॅटीस' बनवले. जबरा झाले होते एकदम. मग संध्याकाळी [ कशीबशी ] आंघोळ वगैरे उरकल्यावर पुन्हा एकदा 'ते शिंचे फिल्मफेयर अवॉर्ड्स ' पाहायला बसलो. कंटाळा आल्यामुळे रूमवरच जेवण मागवले. एकंदरीत अख्खा दिवस झक्कास गेला. येवढ्या सगळ्या पूराणातून निष्कर्ष असा निघतो मी मुळातच आळशी असलो पाहिले पण तसे नाही, आठवडाभर मरमर काम केल्यावर असा सुट्टीचा दिअस जर आमच्यासारख्या 'अविवाहित पोरांनी' घालवायचा नाही तर कुणी ?
तर असा मस्त कालचा दिवस घालावाल्यावर आज सक़ाळी अगदी पहाटे ५ वाजता उठून ऑफीसला आलो कारण 'फिरंग्यांची ऑफीसला सदिच्छा भेट ". लवकर येण्याशिवार दूसरा पर्यायच नव्हता, आल्याबरोबर सगळ्यांना 'रितसर मेल्स , प्रेझेंटेशन व प्रोटोक़ोल्स" ची तयारी होउस्तोवर ८ वाजले. म्हटले बरे झाले ९ ला गेस्ट येतील मग मस्त टाईमपास होईल पण हाय रे कर्म, त्यांच्या अतिमहत्वाच्या अनियोजीत कार्यक्रमामुळे त्यांची आजची भेट पून्हा उद्यावर ढकलण्यात आली आहे. झालं! मूडचा पार **** वाजला . म्हणजे पून्हा उद्या ही तगतग आलीच , काय करणार आलीया भोगासी असवे सादर ....
ही 'फिरंग्यांची भेट' म्हणजे एक मस्त प्रोग्राम असतो बाबा. एकतर दिवसभर काही काम नाही केले तरी चालते फक्त कसले तर 'प्रेझेंटेशनची तयारी केली आणि ते एकदा त्याच्या समोर बडॅबडले की झाले काम, तो पण खूष [???], साहेब पण खूष आणि मी तर लै लै लै खूष. ऑफीसचे वातावरण कसे एकदम चकचकीत होते. ऑफीसमधल्या पोरी भारी भारी नेत्रसूखद ड्रेस घलून येतात [ आजच्या बॉसच्या " पी ए" च्या ड्रेसने तर डॉळ्याचे पारणे फेडले राव ...], ज्या लोकांना 'टेक्निकल मधले' घंटा कळॅत नाही असे पोपट लोक तर सकाळ पासूनच आपले केस व टाय सावरत पळापळ करत असतात, बॉसलोक सारखे आमच्या क्युबिकलकडे चक्कर मारून ते स्वच्छ ठेवण्याची तंबी देत असतात [ म्हणजे आम्ही काही क्युबिकलमधेय रविवारचा बाजार भरवत नाही तरीपण.......], काही चाटू लोक आज कोणत्या तर्हेने पुढेपुढे करण्याचा चान्स मिळेल याची चाचपणी करत असतात, या व इतर अशा अनेक गोष्टी ....
मग तो गरिबांचा मसिहा, जिल्ली ईलाही 'फिरंगी आल्यावर' नेहमीप्रमाणे "हाय, हॅल्लो , हाउ [ उच्चारी हाव ] आर यु ?, लग टाईम नो ? हाउ यु आर डूइंग ? इट वॉस वेरी टायरी जर्नी ।" यासारखे निरर्थक प्रश्नोत्तरे घडतात। त्याच्यासमोर मग आम्ही आत्तापर्यंत काय केले, अश्या काय करण्याचा प्रयत्न करत आहोत व पुढे काय प्लानिंग आहे याचे एक झक्कास 'प्रेझेंटेशन' होते। तो पण मग एकदम मूडमध्ये येउन 'तुम्ही लै भारी काम करता , तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत, तुमचे महत्व किती आहे, तुम्हाला पुढे कुठल्या संधी आहेत, कंपनीची स्थिती कशी आहे व त्यापुढे कुठली आव्हाने आहेत " यावर एक तासभर तरी निर्थक व कंटाळवाणे प्रेझेंटेशन देतो. त्यानंतर आमच्यात व त्याच्यात गप्पागोष्तींचे एक सत्र घडते ज्यात आम्ही काय म्हणतो ते त्याला कळत नाही आणि त्याला काय म्हणायचे ते आम्हाला कळत नाही. तो हसला की आम्ही हसतो, आम्ही हसलो की तो पण हसतो ....
तर असा हा एकंदरीत मस्त टाईमपास असलेला सेशन आज रद्द झाल्याने "पुढे आता दिवसभर काय करायचे?" हा प्रश्न आहे। कामाचा तर बिलकूल मूड नाही. तेव्हा म्हटले की चला काही ओळी खरडाव्यात म्हणजे कसे मस्त वाटेल .... तुम्हाला वाचले वाटू तर वाचा नाहितर सोडून द्या. जास्त मनावर घेउ नका नाहितर तुम्हाला पण माझ्यासारखा कंटाळा येण्याची शक्यता आहे ....
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment