आज सकाळी सकाळीच आमच्या एका अस्सल पुणेकर मित्राचा आमच्या मोबाईलवर फ़ोन आला, च्यायला म्हणलं आता सकाळ सकाळ शिव्या खाव्या लागणार.
पण अहो आश्चर्यम, त्याने २-३ माफ़क शिव्यातच आपला मायना आवरता घेऊन "तुला स्टार माझाच्या ब्लॊग माझा ह्या स्पर्धेत बक्षिस मिळाले आहे" अशी बातमी दिली.
ऒफ़िसमध्ये जाऊन ई-मेल्स चेक करुन बघितले असता स्टार माझाचे संपादक "श्री. प्रसन्न जोशी" ह्यांची अभिनंदन करणारी व निकाल घोषीत करणारी मेल दिसली.
खुप आनंद झाला मित्रानों.
खुप खुप आभारी आहे.
एवढा व्यापक आणि अवाढव्य आवाका असलेली स्पर्धा भरवुन ती यशस्वीपणे पेलल्याबद्दल स्टार माझाचेही अभिनंदन व आभार ...
अशा संस्थांकडुन मिळणा-या प्रोत्साहनामुळे आणि कौतुकामुळे लिहायला हुरुप येऊन नवे अजुन ब्लॊग्स ह्या मराठी ब्लॊगर्सच्या विश्वात दाखल होतील असा आमचा विश्वास आहे.
धन्यवाद स्टार माझा ...
ह्याबरोबर आम्ही आमच्या ह्या यशाचे श्रेय मिसळपाव.कॊम लाही देऊ इच्छितो.
कारण आमच्या भल्या-बु-या लेखनाची सुरवात, कौतुक, विकास हा इथेच घडला.
आजसुद्धा मिपाकरांनी आमचे भरपुर कौतुक केले. धन्यवाद मित्रांनो ...
नॊट दी लिस्ट, आमच्या ब्लॊगच्या तमाम वाचकांचे व हितचिंतकांचे आभार कारण तुमच्या कौतुकामुळे व पाठिंब्याच्या जोरावरच आम्ही नवनविन विषयावर उत्साहात लिहीत असतो.
असाच लोभ राहुद्यात ...
स्पर्धेतल्या इतर विजेत्यांचेही मनापासुन अभिनंदन ...!!!
असेच लढा दोस्तांनो.
धन्यवाद ... !!!
- ( आभारी ) छोटा डॊन
12 comments:
Abhinandan!!!
हार्दिक अभिनंदन! Don bhai aap great ho :D :D :D
अभिनंदन!!!
abhinandan
अभिनंदन डॉन्राव :-)
Abhinandan saheb...
keep blogging... :)
"Star" zalyabaddal abinandan.....
Asech marathi blog vishwa samruddha karat raha....
minanath.blogspot.com
congo!!!!!!!!!!!!!!!
अभिनंदन!
खरं म्हणजे हा त्या पुरस्काराचाच मान झाला!
धन्यवाद मित्रांनो तुमच्या कौतुकासाठी.
गेले १५ दिवस काही वैयक्तिक कामांमुळे अजिबातच आंतरजालावर येणे जमले नाही त्यामुळे ह्या प्रतिक्रियेस बराच उशीर झाला.
आपले प्रेम आणि लोभ आहेच, तो असाच वॄद्धिंगत होऊद्यात.
धन्यवाद ...
- छोटा डॊन
डाँन राव ..... अभिनन्दन ...... अभिनन्दन ..... अशीच प्रगति चालु ठेवा....
Abhinandan. Ek complaint aahe. Atishaya kharab aani awachaniya colour combination ahe blog war. Specialy B&W background. Dolyansathi changle nahi. Kripaya badlave.
Post a Comment