"कसं जगायचं , कसं वागायचं ?
कोणी सांगेल का मला ? "
अशीच माझी अवस्था झाले आहे आज। का म्हणून काय विचारता ? सांगतो ..........काल मस्त सुट्टी घेतली आणि आज जरा फ्रेश मूड मध्ये कार्यालयात आलो . आल्यावर नेहमीच्या प्रघातासारखे काही महत्वाच्या व्यक्तींना "गूड मॉर्निंग घालून" झाल्यावर [ त्या बाबतीत आम्ही अगदी 'बापू काण्यांच्या' हातावर हात मारला आहे] आमचा 'मेलबॉक्स' ऊघडला. पाहतो तर काय एकूण ५२ 'अनरीड मेल्स ". म्हटलं बरं झाले, लोकांना आमची अनुपस्थीती जाणवल्याने त्यांनी प्रेमाने चौकशी करण्यासाठी केल्या असतील ....
पण हाय रे कर्म , बहूसंख्य 'मेल्स' आमच्या दोस्तांनी / सहकार्यांनी पाठवलेल्या आणि सगळ्या अनंत वेळा "रिपीट" झालेल्या.... च्यायला डोक्याची पार मंडई झाली यामुळे, मूडचा पार **** वाजला ....तुम्ही म्हणाल "काय असतं हो या मेल्समध्ये ? " की ज्यामुळे माझी येवढी चिडचिड झाली ..........
सगळे सविस्तर सांगतो .......
ऊठसूट आज कोणीही कोणाच्याही बंगल्याचे फोटो पाठवतो , हा काय तर फ्रेंच राजवाडा की जिथे 'मित्तलच्या पोरीचे लग्न झाले , हा पहा 'दुबईच्या किंवा ब्रुनोईच्या सुलतानाचा १७६० खोल्या असलेला महाल , हा बिल गेट्सचा प्रासाद , हे जगातील एकमेव '७ स्टार' दर्जाचे हॉटेल , हा जगातला सगळ्यात मोठ्ठा 'कॅसिनो' , हा पाण्यावरच तरंगता महाल , इत्यादी इत्यादी
............................ मला सांगा काय करायचे हो आपल्याला त्याच्याशी ? एकदा पाहिले ठीक , दुसर्यांदाही ओके पण अरे पण कितीदा ?ईथे घरापासून दूर राहता जिव किती तडफडतो ते आम्हालाच माहित। ते सोडा, ह्या नोकरीमुळे घराची संकल्पना फक्त 'दिवसभर कंपनीत राबल्यानंतर रात्री पालथे पडण्यासाठी वापरली जाणारी जागा' अशी उरली असताना काय करायचे हो दुसर्याचे राजवाडे बघून ?आम्हाला तर आमची 'गावाकडची चंद्रमौळी झोपडीच प्यारी ' असे असताना हे 'जूलमाचे प्रासाद दर्शन' कशासाठी ? का फूकटची 'मेल्स' चीसुविघा आहे म्हणून तिचा आधाश्यासारखा वापर कशासाठी ?
अजून एक गोष्ट म्हणजे "प्लीज डोन्ट इग्नोर " या शिर्षकाखाली ढिगाने येणारे मेल्स। यात नेहमी कुठल्या तरी 'मुलीला अथवा मुलाला त्याच्या गंभीर आजारातून मुक्त होण्यासाठी त्वरीत मदतीची अपेक्षा असते', मग तूम्हाला जर खरच कळकळ वाटत असेल तर कुठल्यातरी अलाण्याफलाण्या 'स्वयंसेवी संस्थेला' संपर्क करा अशी तळतीप असते. .............
.............. मला माहित आहे की ही बाब काही वेळेला खरी आणि गंभीर असू शकते पण किती वेळा मदत मागाल ? मी स्वता अशा वेळी गंभीर होऊनआत्तापर्यंत २ वेळा मदत केली आहे. पण आता वाटते की कसली खात्री की मदत योग्य ठिकाणी पोहचते व त्या गरजवंताची गरज भागते ?तुम्हाला सांगतो की "ऍमी ब्रूस नावाच्या ७ वर्षाची मुलगी की रक्ताच्या क्षयाने आजारी आहे व तिला मदत हवी आहे " या आशयाचा मेल मलागेली ३ वर्षे नियमाने येत आहे, "त्या" संस्थेचे नाव घेत नाही कारण फारच 'स्वंयंसेवी ' असल्याचा ते आव आणतात। तुम्ही पैसे कमवा हो ,आम्ही तर दुसरे काय करतो , पण त्यासाठी हा मार्ग कशासाठी ?
"हा मेल तुम्ही १० जणानां 'फॉरवर्ड' करा तुम्हाला नोकियाचा लेटेस्ट मोबाईल मिळेल , 'डेल' चा लॅपटॉप मिळेल, मलेशियाच्या ५ स्टार हॉटेलचे फ्री पासेस मिळतील , सोन्याचे नाणे मिळेल , गोव्यामध्ये क्रूझवर ऐश करायला मिळेल " तत्सम मेल्स् ..........अथवा "तुम्हाला 'मायक्रोसॉफ्ट्ची लॉटरी लागली आहे , गूगलकडून तुमच्या 'आय सी आय सी आय " च्या खात्यावर १०००० रुपये जमा होतील "............
...................... काय अर्थ आहे याचा ? पैसा खरचं का इतका 'ईसी मनी आहे ?" ज्याला खरचं अश्या गोष्टींपासून लाभ झाला आहे अशी एकही व्यक्तीमाझ्या पाहण्यात अथवा संपर्कात नाही । मग हे सगळे का ?आम्हाला जेवढी अक्कल्ल परमेश्वराने दिली आहे आणि आम्ही जेवढे कष्ट करतो व त्यातून आम्हाला जो काही मोबदला मिळतो त्यात जर आम्हीखूष असेन तर ही मोहाची आवताणे कशासाठी ? लहानपणी दिक्षा घेताना " आरामाचा आणि हरामचा पैसा पचत नाही " असे बाळकडूमिळाले असताना हा मोह कशासाठी ? स्वकमायीत घेतलेला साधा 'नोकिया फोन', पोटाला चिमटा काढून वडिलांनी घेऊन दिलेला 'पहिलाकॉम्पुटर ' , कामाच्या रगाड्यातून वेळ काढून घरच्यांबरोबर घालवलेली ४ दिवसांची 'साघीच सुट्टी ' यातिल मजा त्यात आहे का हो ?
"हा मेल डायरेक्ट शिर्डीवरून, सिध्धीविनायकाकडून, तिरूपतीहून, हाजीअली अथवा असल्याच कुठल्या ठिकाणावरून आला आहे त्यात सांगितल्याप्रमाणे करा तुमच्या सगळ्या 'विश ' पूर्ण होतील , तुमच्या स्वप्लातील 'मलिका' तुम्हाला मिळेल ...."
" ही तिबेटीयन टेस्ट पास करा तुम्हाला तुमची आवडती मुलगी मिळेल ".............
................ खरं सांगतो , कशाला रिस्क घ्या म्हणून आत्तापर्यंत कमीत कमी ५०० मेल पाठवले . त्या हिशोबाने 'श्रीक्रीष्णा' येवढ्या १६१०८ नाही पणकमीत कमी १०० मुली तरी मिळायला हरकत नव्हती , पण केलेल्या प्रयत्नातच दम नव्हता हे सत्य मला आत्ता उकलले .....कमाल आहे की नाही या गोष्टीची ?
सगळ्यात डोक्याला किडा आणणार्या गोष्टी म्हणजे " हे वापरा व ते वापरू नका " असा उपदेश करणारे मेल्स. कोणी सांगते 'कोकोकोला ' हा उत्तम पचनास मदत करतो तर लगेच दूसर्या मेल मध्ये असते की तो 'फक्त संडास साफ करण्यास वापरतात '. 'डिओ मधल्या घटकांनी कॅन्सर होईल म्हणून वापरणे बंद करावे तर शरीराला मेलेल्या 'उंदरासारखा वास ' येतो. तब्येतीस चांगले असताना पण ' बाहेर कापलेली फळे खातान आपल्याला पण संसर्गजन्य' रोग होईल काय अशी भीती वाटते. कूणी 'एड्स' चे इंजेक्शन टोचेल अशी भिती नेहमी थेटरात गेल्यावर वाटते. कुणी सांगते गररोज एक ग्लास 'वाईन' प्या तर कोणी म्हणते 'दारूच्या एका ग्लासामागे ' तुमचे आयुष्य ३ तासांनी कमी होते [ मग मी आज जिवंत कसा ?]. "सिगारेटचे दूष्परिणामचे ' तर एवढे मेल्स आले की आपण तर कंप्लीट सोडून दिले, "सिगारेट " नाही असे " मेल्स" वाचणे ......वास्तूशात्राप्रमाणे , फेंग्-शूई प्रमाणे मेल्समधून मिळाल्या सल्याप्रमाणे मी जर घर बांधले तर ते घर न होऊन 'एक तर ते राहण्याच्या लायकीचे राहणार नाही आणि वर ते एक एंटीक पिस बनून प्रसिद्ध होईल"आजकाल तर फोनवर येणारे अनोळखी नंबर चे कॉल ऊचलताना कोणी आपला फोन हॅक करत नाही ना अशी शंका येते कारण तसे झाल्यास तुम्हाला 'मेल्समध्ये लिहल्याप्रमाणे युरोप , कॅनडा , सोमालिया , कुवेत .... या थिकाणी कॉल लेल्याबद्दल ३५००० बिल येईल".
म्हणून मला असा प्रश्न पडला आहे की .......... "कसं जगायचं , कसं वागायचं ?कोणी सांगेल का मला ? "सगळं पूराण ऐकवण्याचे कारण म्हणजे आपणच कळत्-नकळत असे मेल पाठवत असतो। त्यामुळे अनावश्यक होणारा कंपनीचा खर्च , आपला कालपव्याय , येणारं टेन्शन , मानसीक तणाव याचा विचार आपण कधीतरी केला पाहिजे । आपलं आहे फूकट म्हणून पाठवा अशी व्रुत्ती असू नये हाच यामागचा उद्देश आहे ...........
या मेल्सला कंटाळलेला , त्रासलेला ......... छोटा डॉन .............
अवांतर : ह्या मेलची 'प्रेरणा' आलेल्या अशाच एका विरोपातून मिळाली ..........
2 comments:
are tu misalpav varcha chhota don ka? mi Juna Abhijit.
Chhan ahe blog.
chaan blog aahe
Post a Comment