बेंगलोरला आल्यावर व काही दिवस इथे मुक्त हुंदडल्यावर एक गोष्ट लक्षात आली की येथे "मराठी भाषा" जास्त कुणाला गम्य नाही. कशी असणार हो, इथे पहायला गेलात तर हिंदीचीच बोंबाबोंब आहे तर मग मराठी कोण बोलणार ? ह्या गोष्टीचा फायदा असा होतो की बाहेर फिरताना एखादी गोष्ट [ जनरली सुंदर कन्या ] आपल्याला आवडली किंवा दिसली तर आपण लगेच आपल्या भावना [ म्हणजे आपले जनरल, दिसायला अशी काटा आहे, फटाका आहे, कामाची नाही, काकूबाई आहे इ.इ...] आपल्या मित्रांना आपल्या मातृभाषेत सांगू शकतो व सगळे मिळून त्या गोष्टीवर डिस्कस करून अर्थपूर्ण निष्कर्ष काढू शकतात. याचा दुसरा फायदा असा की समजा एखादी गोष्ट आपल्याला नाही आवडली म्हणजे हॉटेलची सर्वीस, रिक्षावाल्याचे अथवा बसकंडक्टरचे मुजोर वागणे, इथल्या काही लोकांचे प्रादेशिकपणे वागणे व मुद्दामुन बाहेरच्या लोकांना त्रास देणे तर अशा गोष्टींवरच्या आपल्या रागाचा कढ आपण आपल्या मातृभाषेत मनोसक्त शिव्या देउन काढू शकतो कारण समोरच्याला आपण काय बोलतो हे घंटा कळत नाही. [ मला वाटते की ते पण हाच मार्ग अवलंबत असावे. असो.] बरोबर आहे ना, कारण त्यांना कळेल अशा भाषेत आपण असे काही विवादास्पद बोललो तर फटके पडतील. म्हणून आम्ही अशा गोष्टीसाठी मराठीची कास पकडली. आमच्या तिथे आधिच २ वर्षापासून राहणाऱ्या मित्रांनी आम्हाला "जपून" असा सल्ला दिला पण ऐकेल ते आम्ही कसले ? आमचे हे प्रयोग चालूच होते पण एके दिवशी आमची मस्त लागली.... [ खूष होउ नका लगेच, मार वगैरे खाण्याची पाळी नाही आली ...]
साधारणता बेंगलोरला येउन १ महिना झाला असावा. एके दिवशी सुट्टीच्या दिवशी माझ्या एका मित्राला त्याच्या "व्यवस्थापनाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी द्याव्या लागणाऱ्या प्रवेशपरिक्षेचे फॉर्म्स [ त्यापेक्षा एम बी ए एंट्रन्स म्हतलेले काय वाईट ? ] " आणायचे होते. ते फॉर्म्स साधारणता सरकारी बँकांच्या शाखात मिळतात. तसा आमचा "शनिवारचा " काही खास प्रोग्राम नसल्यामुळे त्याने मला "चल तुला बेंगलोर दाखवतो !" असे लालूच दाखवले. मला पण तसे बोअर झाले होते म्हटले चला मस्त फूक़टचे फिरायला मिळेल [ कारण मधल्या सर्व वाहतूक, चहा-पाणी-बिडी इ. खर्चाची जबाबदारी त्याने उचलली होती.] व तो म्हणतोय त्याप्रमाणे बेंगलोरही पाहणे होईल म्हणून मी तयार झालो. आता ती बँक एका "हाय-प्रोफाईल रोड ज्याला ब्रिगेड रोड" म्हणतात येथे येत असल्यामुळे तेथे मस्त सुंदर मुलींचा ताटवा फुललेला असतो अशी एक नवीन माहिती एका मित्राने दिली. बहूतेक यामुळेच का काय आमचा अजून मित्र बरोबर यायला तयार झाला...
तर अशी मजलदरमजल [ म्हणॅजे नक्के काय कोणाला माहित ? व ती कशी करतात हे उपरवाला जाने ] करत आमची स्वारी त्या बँकेत साधारणता १०.३०-११ ला पोहचली. अजून फॉर्म्सची मुदत बरीच असल्याने बँकेत जास्त गर्दी नव्हती कशाला आम्ही तिघेच कडमडलो होतो. साधारणता बँकेचे सर्वेक्षण केल्यावर आमच्या असे लक्षात आले की ही बँक जास्त काही "बिसी" वाटत नाही व त्यामुळेच तिथले कर्मचारीही आम्हाला एकदम निवांत वाटले. आमच्या कामाच्या मित्राला "तू तेरा रास्ता नाप " असे सांगून आम्ही दोघांनी कोपऱ्यातला एक रिकामा [ तसे सगळेच रिकामे होते ] कोच पकडला व त्याच्या आसपास पडलेली बँकेची कागदपत्रे वाच, पेपर चाळ, कन्नडमध्ये लिहलेल्या अगम्य सुचनांचा अर्थ लावण्याचा निष्फळ प्रयत्न कर असे कुटाणे करत बसलो. व त्याच्याबरोबरच आमच्या निर्धास्तपणे "मराठीतून बँकेच्या सद्यस्थितीबद्दल कमेंट्स" चालूच होत्या ।
आता तुम्हाला सांगायचेच म्हटले तर ...........
" च्यायला बँकेचे दुकान काय जास्त चालत नाही असे दिसतेय ?""हा ना, बघ सगळे कसे निवांत पडले आहेत ""आत्ताच पोतभरून इडली-डोसा हादडून झाला आसेल , मस्त आत एसी चालू आहे , द्या ताणून तिच्यायला ....""खरच राव, आपण गेल्यावर पुन्हा एकदा राईस हाणतील आणि खरच टेबलं जोडून झोपतील राव ..."" खी खी खी ...""ह्या ह्या ह्या ...... "यावर आमच्या समोरच बसलेल्या एका पोक्त बाईने डोळे वटारून आमच्याकडे पाहिले व हातानेच "शूउउउउ" अशी खूण केली ।
यावर माझा मित्र
" गप ना भो *** [ आता याला पर्याय नाही. पटकथेची गरज म्हणून आम्हाला असे शब्द ताकावेच लागतील. "हे एकदा म्हटले की झाले तुम्ही मोकळे कसे पण **नाच घालायला. तर असो....], झोप मोडलीना त्यांची ...""सॉरी मॅडम , झोपा तुम्ही निवांत [हे हळू आवाजात ...]""खी खी खी !!!!"
त्यातूनच आमच्या एका मित्राचे त्या पोक्त बाई शेजारी बसलेल्या एका तरूण व सुस्वरूप म्हणाव्या अशा कन्येवर "टप्पे टाकणे " चालू होते. मीच त्याला "गप ना भा ***" म्हणून दटावले.
तेवढ्यात आमच्या कामाच्या मित्राला खिशात आवश्यक पैसे नसल्याचा साक्षात्कार झाला. यावर "भाड्या, तुला आधी अक्कल नव्हती का ? करा तुम्ही येड्यासारखे बाहेरपण, म्हणून तुला आम्ही कोठे न्हेत नाही " अशी मुक्ताफळे ऐकल्यावर तो बँकेच्या तळमजल्यावर असणाऱ्या त्याच "बँकेच्या ए टी एम " मध्ये गेला. आम्ही आपले तो गेल्यावर "ए टी एम" किती जूने असेल, त्यावर किती धूळ बसली असेल, त्यामुळे मित्राला चक्कर येउन तो बेशूद्ध पडेलि इ.इ. लांबड लावायला सूरवात केली. आमचा आवाज थोडा वाढल्याने व कदाचित त्यांची झोप मोडल्याने बँकेचे कर्मचारी उठून आमच्याकडे पहायला लागले. मग मात्र आम्ही आवरते घेतले. ५ च मिनिटात खाली गेलेला आमचा दोस्त "मशिनमध्ये कार्ड अडकल्याची तक्रार" घेउन आला....
तेवढ्यात आमच्या कामाच्या मित्राला खिशात आवश्यक पैसे नसल्याचा साक्षात्कार झाला. यावर "भाड्या, तुला आधी अक्कल नव्हती का ? करा तुम्ही येड्यासारखे बाहेरपण, म्हणून तुला आम्ही कोठे न्हेत नाही " अशी मुक्ताफळे ऐकल्यावर तो बँकेच्या तळमजल्यावर असणाऱ्या त्याच "बँकेच्या ए टी एम " मध्ये गेला. आम्ही आपले तो गेल्यावर "ए टी एम" किती जूने असेल, त्यावर किती धूळ बसली असेल, त्यामुळे मित्राला चक्कर येउन तो बेशूद्ध पडेलि इ.इ. लांबड लावायला सूरवात केली. आमचा आवाज थोडा वाढल्याने व कदाचित त्यांची झोप मोडल्याने बँकेचे कर्मचारी उठून आमच्याकडे पहायला लागले. मग मात्र आम्ही आवरते घेतले. ५ च मिनिटात खाली गेलेला आमचा दोस्त "मशिनमध्ये कार्ड अडकल्याची तक्रार" घेउन आला....
पुन्हा एकदा जोरदार हास्याचा बहर ओसरल्यावर व " माझ्या मित्राची व बँकेच्या जुन्या सिस्टीमची व्यवस्थीत काढून झाल्यावर " मी व माझा मित्र ते कार्ड परत मिळवून देण्याची जबाबदारी असलेया माणसाच्या शोधाला लागलो. त्या महाभागाने आम्हाला " कोण ? कुठले? कसे काय कार्ड अडकले ? कोणाकडून आडकले ? कुणाचे आहे ? कोठे काम करता ? काय काम करता ? कोठे राहता ? फुकट राहता की विकत राहता ? वापरता येते का नाही ? पुन्हा अडकल्यास काय करायचे? आम्हाला तेवढ़ेच काम आहे का ? " अशा अनेक सरकारी व असंबद्ध प्रश्नाची फैरी झाडल्यानंतर कार्ड काढून देण्याची तयारी दाखवली. आम्ही तो म्हणतोय ते सगळे कबूल असल्याचे व पुन्हा असे करणार नाही अशी ग्वाही दिल्यावर त्याने कार्ड काढून दिले. आमचा मित्र ते घेउन पुन्हा पैसे आणायला गेल्यावर मी तिथे बसलेल्या माझ्या मित्राला ही हकिकत ऐकवली व आम्ही दोघे पोट धरून हसलो.
हे सर्व चालू असताना तेथील कर्मचारी आमच्याकडे थोडे रागाने पहात असल्याचे लक्षात आल्यावर आम्ही शांत बसलो. मित्र पैसे घेउन आल्यावर व आवश्यक ती कागदं भरून झ्याल्यावर ज्या ठिकाणी पैसे भरायचे आहेत तो "कॅशिअर" जागेवर नसल्याचे लक्षात आले. यावर " तो झोपला असेल, चहा पित असेल, घरी गेला असेल, भाजी निवडत असेल, भांडी घासत असेल , पोराला आंघोळ घालत असेल , चौकात बिड्या फुंकत बसला असेल " असे तर्क लढवून झाल्यावर १० मिनीटांनी तो 'सद्ग्रहस्थ' आला. माझ्या मित्राने सर्व सोपस्कार पूर्ण करून फॉर्म्स ताब्यात घेतले व आम्ही निघण्याची तयारी केली...................
आता निघाणार तेवढ्यात समोर बसलेली ती पोक्त बाई [ हो तीच आम्हाला शूउउउउ करणारी ] चक्क मराठीत माझ्या मित्राला म्हणाली " बाळ, फॉर्म्स व्यवस्थीत चेक करून घे . नाहितर पुन्हा घोळ करशिल..... " आमचा पार फ्युज उडला. माझा दुसरा मित्र तर चक्क बाहेर पळून गेला. मग उरलेल्या आम्ही दोघांनी आपले " आपण मराठी का ? कुठल्या ? मग इथे कशा ?" असे पांचट व सावरासावरी करणारे प्रश्न विचारले व बाजू संभाळायचा प्रयत्न केला. त्यावर ती बाई मुळची "पुण्याची" [ कळले ना, आत्तापर्यंत गप्प का होती ते ?] असल्याची माहिती दिली. आम्ही मग " बरं आहे, अच्छा मग, येतो " मह्णून तिथून काढता पाय घेतला. बाहेर पडताना चोरून वळून पाहिले तर ती पोक्त बाई व ती सुस्वरूप कन्या काहितर गुलुगुलु बोलत हसत होत्या, मग मात्र आम्ही जोराने धूम ठोकली
आता निघाणार तेवढ्यात समोर बसलेली ती पोक्त बाई [ हो तीच आम्हाला शूउउउउ करणारी ] चक्क मराठीत माझ्या मित्राला म्हणाली " बाळ, फॉर्म्स व्यवस्थीत चेक करून घे . नाहितर पुन्हा घोळ करशिल..... " आमचा पार फ्युज उडला. माझा दुसरा मित्र तर चक्क बाहेर पळून गेला. मग उरलेल्या आम्ही दोघांनी आपले " आपण मराठी का ? कुठल्या ? मग इथे कशा ?" असे पांचट व सावरासावरी करणारे प्रश्न विचारले व बाजू संभाळायचा प्रयत्न केला. त्यावर ती बाई मुळची "पुण्याची" [ कळले ना, आत्तापर्यंत गप्प का होती ते ?] असल्याची माहिती दिली. आम्ही मग " बरं आहे, अच्छा मग, येतो " मह्णून तिथून काढता पाय घेतला. बाहेर पडताना चोरून वळून पाहिले तर ती पोक्त बाई व ती सुस्वरूप कन्या काहितर गुलुगुलु बोलत हसत होत्या, मग मात्र आम्ही जोराने धूम ठोकली
बाहेर आलो तर आमचा पळालेला मित्र बँकेच्या १०० पाउले दूर जाउन कोपऱ्यात उभा होता. आमच्या पळालेल्या मित्राला बाहेर आल्यावर तो "गुलुगुलु गप्पांचा " किस्सा सांगितल्यवर तो एकदम दिगमुढ का काय म्हणतात तसा झाला व म्हणाला "च्यायला, म्हणूनच एवढ़्या खुन्नस ने बघत होती ...." मग पून्हा आम्ही "खदाखदा हासून घेतले" व वाटेस लागलो [ कसले, आमचीच वाट लागली म्हणा ना ]...
त्यानंतर आम्ही बरेच इकडे तिकडे हिंडलो, बरेच काही पोटात ढकलले व पोट व डोळे अगदी मनोसोक्त भरल्यावर आम्ही रूम वर परत निघालो. जाताना रिक्षाने जायचे ठरवले. रिक्षात बसल्यावर सकाळची घटना आठवून व दिवसभरात दिसलेल्या काही प्रेक्षणीय गोष्टींविषयी आमची चर्चा आपल्या "मायमराठीतून" चालूच होती. आमच्या असे लक्षात आले की रिक्षावाला आम्ही काहि विनोदी बोललो की हसत आहे व सारखे सारखे आरशातून मागे वळून पहात आहे. मला तो मराठी असल्याचा संशय आल्याने मी मित्रांना "जपून" अशी खूण केली. त्यावर आम्ही बोलण्यातून सगळे "हिंदी व इंग्रजी शब्द वगळून" शुद्ध मराठीत बोलणे सुरु केले. आमचा मित्र त्यावर म्हणालासुद्धा " ऐक आता, घंटा कळणार नाही तुला ".
या गोष्टीमुळे आमचा थोडा चर्चेचा ट्रॅक बदलून तो "रिक्षावाला" यावर केंद्रित झाला।
या गोष्टीमुळे आमचा थोडा चर्चेचा ट्रॅक बदलून तो "रिक्षावाला" यावर केंद्रित झाला।
मग नेहमीप्रमाणे
अशी आमची मुक्तफळे चालू होती. शेवटी घर आल्यावर आम्ही उतरलो, जेवढे झाले तेवढे पैसे दिले व आता निघणार तेवढ़्यात तो मला म्हणाला "भाउ, किती वाजले रे ?" आता मात्र एक सेकंद न थांबता माझे दोन्ही मित्र पळाले, माझ्याजवळ तोही ऑप्शन नव्हता. मग मी आपले " नमस्कार, मराठी का ? कुठले ? आमचे बोलणे समजले का ? तुमच्याविषयी बोललेल्याचा राग नाही ना आला ? सॉरी " अशी सावरासावर केली . त्यावर तो म्हणाला "मला आधेच कळले होते पण म्हणले बघु काय बोलतात ते, राग नाही आला पण लै मज्जा वाटली " मी आपले " बरयं , ठिक आहे ..." म्हणून रूमवर गेलो व पाहतो तर काय "रूमवरचे सगळे चांडाळं चांगले गडाबडा लोळत हसत आहेत. मग काय करता , मी पण त्यांच्यात सामील झालो ...."त्याला म्हणावं समोर बघून चालव""च्यायला बघतय एकीकडे, ऐकतय एकीकडे , चालवतयं तिसरीकडे ""नाही पण, चालवतोय चांगलं, एकदम निवांत चालू आहे""त्याला वॉर्निंग आहे, कुठल्याही परिस्थितीत ओव्हरटेक करायचा नाही व स्पीड ४० च्या वर न्यायचा .............नाही ""बहूतेक नवीन असावा ....""तो नवीन नाही , रिक्षा नवीन आहे ....""नवीन म्हणजे सेकंडहॅन्ड नवीन आहे असे तुला म्हणायचे आहे का ?""जावू दे, मी झोपतो, घर आले की उठव मला ""भा ** , झोपतो काय ? तो बघ पडीकडच्या गाडीवरचा माल .... "
तर तात्पर्य काय ? बचके रहना रे बाबा . आपल्या माउलींची मराठी पार कानाकोपऱ्यात पोहचली आहे आणि ती केव्हा तुमचा कान पकडेल याचा काही नेम नाही .....
3 comments:
गांधीनगर मधल्या महाराष्ट मंडाळात जावुन आलात की नाही अजुन ?
मजा आली वाचून. आमच्याबरोबर पण बेंगलोरमध्ये असंच काहीसं घडलं होतं. त्याबद्दल ब्लॉगवर एखादी पोस्ट टाकावी म्हणतो.
Nice one! enjoyed it. I am also new to B'lore.
Post a Comment